Shivsena : कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शिवसेना कार्यकारणी बरखास्त, 31 ऑगस्ट पर्यंत पक्षाची पुनर्बांधणी

शिवसेनेतून बंडखोरी वाढत असताना आता पक्षाच्यावतीनेही कारवाईला सुरवात झाली आहे. कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शिवसेना कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे. येथील विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला असून खासदार संजय मंडलिक यांनी केली घोषणा केली. यामध्ये सर्वच कार्यकरणी ही बरखास्त करण्यात आली आहे. तर 31 ऑगस्ट पर्यंत पक्षाची पुनर्बांधणी केली जाणार आहे. गुरुवारी त्या अनुशंगाने कोल्हापुरात शिवसेनेचा मेळावा होणार आहे.

Shivsena : कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शिवसेना कार्यकारणी बरखास्त, 31 ऑगस्ट पर्यंत पक्षाची पुनर्बांधणी
उद्धव ठाकरे, Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Jul 10, 2022 | 4:07 PM

कोल्हापूर : (Shivsena) शिवसेनेतून बंडखोरी वाढत असताना आता पक्षाच्यावतीनेही कारवाईला सुरवात झाली आहे.  (Kolhapur) कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शिवसेना कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे. येथील विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला असून खासदार संजय मंडलिक यांनी याची घोषणा केली. यामध्ये सर्वच (Executive dismissed) कार्यकरणी ही बरखास्त करण्यात आली आहे. तर 31 ऑगस्ट पर्यंत पक्षाची पुनर्बांधणी केली जाणार आहे. गुरुवारी त्या अनुशंगाने कोल्हापुरात शिवसेनेचा मेळावा होणार आहे. पक्ष पुनर्बांधणीच्या अनुशंगाने शिवसेना आता कठोर पावले उचलत असताना दिसत आहे. एकीकडे बंडखोरांमुळे पक्षाचे नुकसान होत असले तरी आता ताकही फूंकुन अशी भूमिका घेतली जात आहे. त्याच अनुशंगाने हा बदल दिसून येत आहे. कार्यकरणी बरखास्तीची घोषणा झाली असली तरी नवीन कार्यकरणी 31 ऑगस्टपर्यंत नेमली जाणार आहे.

खासदार सेनेतच, अफवांमुळे संभ्रम

शिवसेनेचे सर्व खासदार हे पक्षातच आहेत. कोणीही वेगळी भूमिका घेतलेली नाही. आता राष्ट्रपती निवडणुका समोर आल्याने याबाबत अफवा पसरवल्या जात आहेत. पण शिवसेनेचा एकही खासदार हा शिंदे गटाच्या संपर्कात नसल्याचे खा. संजय मंडलिक यांनी सांगितले आहे. पक्षाला बळकटी देण्याच्या अनुशंगाने सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत. जे गेले त्यांच्याशिवाय पुन्हा शिवसेना पक्ष भरारी घेणार यामध्ये शंका नसल्याचे मंडलिक यांनी सांगितले आहे. कार्यकरणी बरखास्त करण्यामागेही पक्षाचे एक धोरण आहे. त्यामुळे नवी कार्यकरणी आणि नवे विचार लवकरच समोर येतील असेही त्यांनी सांगितले आहे.

गुरुवारी शिवसेनेचा मेळावा

पक्ष संघटनेच्या अनुशंगाने कोल्हापूर हा सेनेसाठी महत्वाचा जिल्हा मानला जातो. पक्ष प्रमुखांच्या आदेशाने कार्यकरणीबाबत निर्णय घेण्यात आला असला तरी पक्षाची भूमिका ही गुरुवारीच स्पष्ट होणार आहे. कारण गुरुवारी शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विनायक राऊत,अरुण दुधवडकर यांची उपस्थिती असणार आहे. गेल्या काही दिवसांमधील राजकीय घडामोडी आणि पक्षाचा विस्तार त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे मंडलिक म्हणाले आहेत.

हे सुद्धा वाचा

31 ऑगस्टपर्यंत नवी कार्यकरणी

पक्षाचे संघटन करीत असताना आता विशेष काळजी घेतली जात आहे. मध्यंतरी शिवसेनेकडून प्रतिज्ञापत्र देखील घेण्यास सुरवात झाली होती. त्यामुळे आमदारांच्या बंडानंतर कोणतिही बाब काळजीपूर्वक करण्याचे पक्षाचे धोरण आहे. आणि त्यानुसारच आता कार्यकरणी बरखास्त करण्यात आली असली तरी 31 ऑगस्टपर्यंत नवे चित्र निर्माण होणार आहे.

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.