AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राणेंच्या स्वागतासाठी बालेकिल्ला कणकवली सज्ज, शहरांत गुढ्या उभारल्या, ‘दादांच्या’ समर्थनार्थ सगळीकडे फ्लेक्स

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या स्वागतासाठी त्यांचा बालेकिल्ला असलेलं कणकवली शहर सज्ज झालंय. अगदी पहिल्यापासून राणेंना ज्या कणकवलीने डोक्यावर घेतलं, त्यांना कधी अंतर दिलं नाही, त्याच राणेप्रेमी कणकवली शहरांत चौकाचौकात राणेंच्या स्वागताला गुढ्या उभारल्या गेल्या आहेत.

राणेंच्या स्वागतासाठी बालेकिल्ला कणकवली सज्ज, शहरांत गुढ्या उभारल्या, 'दादांच्या' समर्थनार्थ सगळीकडे फ्लेक्स
नारायण राणेंच्या स्वागताला कणकवली शहर सज्ज
| Edited By: | Updated on: Aug 25, 2021 | 1:58 PM
Share

रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या स्वागतासाठी त्यांचा बालेकिल्ला असलेलं कणकवली शहर सज्ज झालंय. अगदी पहिल्यापासून राणेंना ज्या कणकवलीने डोक्यावर घेतलं, त्यांना कधी अंतर दिलं नाही, त्याच राणेप्रेमी कणकवली शहरांत चौकाचौकात राणेंच्या स्वागताला गुढ्या उभारल्या गेल्या आहेत. कालच्या राणे-सेना राड्यानंतर दादांचं जंगी स्वागत करण्यासाठी राणे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांनी कंबर कसलीय.

नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेतील नियोजित कणकवली दौरा होता. परंतु त्यांनी केलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील वक्तव्याने मंगळवारी दिवसभर राडा झाला. पोलिसांनी त्यांना अटक केली. रात्री उशिरा त्यांना जामीन मिळाला. जामीन मिळाल्यानंतर मध्यरात्री त्यांनी महाडवरुन मुंबईकडे प्रयाण केलं. दोन दिवस आराम करुन ते पुन्हा जनआशीर्वाद यात्रा सुरु करणार आहेत.

राणेंच्या स्वागतासाठी बालेकिल्ला कणकवली सज्ज

नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेसाठी कणकवली सज्ज झालेली आहे. कणकवली हा राणे परिवाराचा बालेकिल्ला आहे. कणकवलीत राणेंच्या होणाऱ्या स्वागताची सर्वांना उत्सुकता आहे. शहरभर यात्रेच्या स्वागताचे आधीच फलक लागले आहेत. रात्री राणेंना जामीन मंजूर झाल्यानंतर मध्यरात्री शहरात गुढ्या उभारण्यात आल्या आहेत. शहरात पटवर्धन चौकात रस्त्याच्या बाजूला रात्री गुढ्या उभ्या केल्या गेल्या. मुख्य चौकात आकाशकंदील लावले गेलेत. एकंदरितच कणकवलीतील राणेंचं स्वागत जंगी होणार आणि राणेसमर्थक जोरदार शक्तीप्रदर्शन करणार हे नक्की…!

राणे मीडियाशी संवाद साधणार

संगमेश्वर ते महाडपर्यंत रंगलेल्या अटक आणि सुटकेच्या नाट्यानंतर नारायण राणे पहिल्यांदाच मीडियाशी संवाद साधणार आहेत. आज दुपारी ते मीडियाशी बोलणार असल्याने राणे ठाकरे सरकारला ‘करारा जवाब’ देणार का?, राणेंच्या रडारवर आज कोण असणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

नारायण राणे आज दुपारी 4 वाजता जुहु येथील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी राणे काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या पत्रकार परिषदेतून राणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच राणे यावेळी काही नवे गौप्यस्फोट करणार असल्याची चर्चा आहे.

या शिवाय राणे जन आशीर्वाद यात्रेच्या पुढील कार्यक्रमाबाबतही बोलणार असल्याचं सांगितलं जातं. सिंधुदुर्गात संचारबंदी लागू करण्यात आल्याने सिंधुदुर्गात जन आशीर्वाद यात्रा होणार की नाही? असा सवाल केला जात आहे. त्यावर राणेंच्या आजच्या पत्रकार परिषदेतून उत्तर मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

(Konkan Kankavali is ready to welcome Minister narayan Rane Jan ashirvad yatra)

हे ही वाचा :

अटक आणि सुटकेच्या नाट्यानंतर नारायण राणे मीडियाशी संवाद साधणार; ‘करारा जवाब’ देणार?

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.