Video | कुडाळमध्ये भांडले सेना-भाजप आणि मलाई काँग्रेसला! सेना-भाजपच्या राड्याचं फलित काय?

Kudal Shiv sena vs BJP : याबाबतचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एका फॉरच्युनर कारला आधी अडवण्यात आलं. त्यानंतर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धाऊन जाताना दिसलेत.

Video | कुडाळमध्ये भांडले सेना-भाजप आणि मलाई काँग्रेसला! सेना-भाजपच्या राड्याचं फलित काय?
कुडाळमध्ये शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते भिडले!
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 1:35 PM

सिंधुदुर्ग : कुडाळमध्ये आज भाजप आणि शिवसेनेचे (Shiv sena vs Congress) कार्यकर्ते भिडले आहेत. यावेळी पोलिसांसमोर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. पोलिसांनीही दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना शांत होण्याचं आवाहन केलं. मात्र नगराध्यक्ष निवडणुकीवरुन (Election) तुफान राडा झाला. शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये यावेळी धक्काबुक्कीदेखील झाली. याबाबतचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एका फॉरच्युनर कारला (Toyota Fortuner) आधी अडवण्यात आलं. त्यानंतर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धाऊन जाताना दिसलेत. यावेळी पोलिसांनीही वेळीच हस्तक्षेप करत वाद रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र आक्रमक झालेल्या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमुळे तुफान बाचाबाची झाल्याचं यावेळी पाहायला मिळालंय.

पाहा राड्याचा संपूर्ण व्हिडीओ

आमदार वैभव नाईकांचा राणेंवर आरोप!

कुडाळ नगराध्यक्षपदाची आज निवडणूक होता. या निवडणुकीच्या मतदानाला महाविकास आघाडीच्या समर्थनात असलेल्यांना मतदान करायला मिळू नये, यासाठी दबावाचं राजकारण करण्यात आलं असल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केलाय. नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रानं पैशांचा बाजार मांडला होता, असं वैभव नाईक यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना म्हटलंय. नगराध्यक्ष पदासाठी घोडेबाजार सुरु होता. मतदान करायलाच मिळू नये, यासाठी प्रयत्न केले जात होते, असं म्हणत राणेंवर वैभव नाईकांनी हल्लाबोल केलाय. दरम्यान दबावाच्या राजकारणाला बळी पडणार नसल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय.

दोघांचं भांडण तिसऱ्याला लाभ?

शिवसेना आणि भाजपच्या भांडणात कुडाळमध्ये काँग्रेसचा नगराध्यक्ष निवडून आला आहे. कुडाळ नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या आफ्रीन करोल यांची निवड झाली आहे. काँग्रेस नगरसेवक असलेल्या करोल यांना 9 मते तर भाजपच्या प्राजक्ता बांदेकर यांना 8 मतं पडली. अवघे दोन नगरसेवक असलेल्या काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष कुडाळमध्ये विराजमान झाला आहे.

कुडाळ मध्ये एकूण 17 पैकी 8 जागांवर भाजप, तर 7 जागांवर शिवसेना आणि 2 जागांवर काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले होते. कुडाळात कोणत्या पक्षाचा नगराध्यक्ष होणार याची सर्वांना उत्सुकता होती. अखेरच्या क्षणी चमत्कार होईल हा भाजपचा दावा होता. मात्र भाजपचा दावा फोल ठरवत महाविकास आघाडीने कुडाळमध्ये आपला नगराध्यक्ष निवडून आणला आहे.

संबंधित बातम्या :

बँकेची सत्ता हाती येताच बाळासाहेबांचा फोटो उतरवला, फक्त राणेंचा फोटो लावला; शिवसेनेकडून संताप व्यक्त

मराठा आरक्षणासाठी पुन्हा एल्गार, 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण, संभाजी छत्रपतींकडून घोषणा

VIDEO: हमने बहोत बर्दाश्त किया, बर्बाद भी हम करेंगे; शिवसेना नेते संजय राऊतांची डरकाळी

VIDEO: नाना पटोले नौटंकीबाज, मोदी नव्हे काँग्रेसनेच देशाची माफी मागावी, देवेंद्र फडणवीसांचा पलटवार

थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.