संजय राऊत राष्ट्रपती झाल्यास महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट चालेल, कुणाल कामराचे भाजपला चिमटे
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, या मागणीवर स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराने व्यंगात्मक ट्विट करुन भाजपला डिवचले
मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) राष्ट्रपती होतील, तेव्हा मला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट चालणार आहे, असे तिरकस बाण स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराने (Kunal Kamra) सोडले आहेत. ‘शट अप या कुणाल’ पॉडकास्टमध्ये राऊतांची मुलाखत झाल्यापासून कामरा त्यांच्या प्रेमात असल्याचे दिसत आहे. (Kunal Kamra says ok with presidents rule in Maharashtra the day Sanjay Raut becomes president)
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशा मागणीचा सूर विरोधीपक्ष भाजपकडून करण्यात येत आहे. त्यावर कुणाल कामराने व्यंगात्मक ट्विट करुन भाजपला डिवचले आहे. ज्या दिवशी संजय राऊत राष्ट्रपती होतील, तेव्हा मला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झालेली चालेल, अशा एका वाक्यात कुणाल कामराने भाजपला टोचले. नुकतेच सुप्रीम कोर्टाने मुंबईतील एका अभिनेत्याच्या आत्महत्येवरुन महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी करणं चुकीचं आहे, असं सांगत याचिकाकर्त्याला फटकारले होते.
I’m ok with presidents rule in Maharashtra the day @rautsanjay61 ji is our president ???
— Kunal Kamra (@kunalkamra88) October 18, 2020
कुणाल कामराने संजय राऊत यांना ‘शटअप या कुणाल’ शोच्या दुसऱ्या सिझनचे पहिले पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. ‘शटअप या कुणाल’ शोसाठी कुणालने गेल्या रविवारी (11 ऑक्टोबर) संजय राऊत यांच्यासोबत मुलाखतीचे चित्रिकरण केले. राज्य ते देशाच्या राजकारणातील घडामोडी, मोदी सरकार ते महाविकास आघाडी सरकार, सुशांतसिंह प्रकरण ते कंगनाशी झालेला वाद, राज्यातील कोरोनाची स्थिती, कन्हैया कुमार ते मनसे या मुद्द्यांवर मुलाखत रंगली. खार येथील ‘द हॅबिटेट स्टुडिओ’त दीड तासांची ही मुलाखत झाली.
‘संजय राऊत सरांनी ‘शटअप या कुणाल’ या पॉडकास्टच्या दुसऱ्या पर्वाचे पहिले पाहुणे म्हणून सहभागी होण्याची तयारी दर्शवली, तरच मी पुन्हा कार्यक्रम सुरु करेन, अन्यथा कुणालाही संधी नाही’, असे ट्वीट कुणाल कामराने केले होते. कुणालचे निमंत्रण स्वीकारत संजय राऊत यांनी मुलाखत देण्याचे कबूल केले. मुलाखतीची पूर्वतयारी म्हणून आधी हॉटेल ग्रँड हयातमध्ये दोघांची ‘मुलाकात’ झाली. त्यावेळी जवळपास दीड तास दोघांची चर्चा रंगली होती. (Kunal Kamra says ok with presidents rule in Maharashtra the day Sanjay Raut becomes president)
शट अप या कुणाल नेटीझन्समध्ये लोकप्रिय
कुणाल कामरा नेटीझन्समध्ये चांगलाच लोकप्रिय आहे. कुणाल स्टॅण्ड अप कॉमेडीसोबतच ‘शट अप या कुणाल’ या कार्यक्रमात मोठमोठ्या सामाजिक तसेच राजकीय व्यक्तींच्या मुलाखती घेतो. कुणालने यूट्यूबवर 2017 मध्ये हा शो सुरु केला होता. भाजप यूथ विंगचे उपाध्यक्ष मधुकिश्वर देसाई यांच्या मुलाखतीने ‘शट अप या कुणाल’च्या पहिल्या सिझनला सुरुवात झाली होती.
कुणालने आतापर्यंत शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी (तत्कालीन काँग्रेस प्रवक्त्या), जेएनयू विद्यार्थी नेते कन्हैया कुमार आणि उमर खलिद, एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी, गीतकार जावेद अख्तर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार, काँग्रेस नेते मिलिंद देवरा, खासदार तेजस्वी सुर्या यांच्या मुलाखती घेतल्या आहेत.
संबंधित बातम्या :
Shut Up Ya Kunal | कुणाल कामराची साद, संजय राऊतांचा प्रतिसाद, कुणालचं निमंत्रण स्वीकारलं
कुणाल कामराकडून राज ठाकरेंना वडापाव ऑफर, कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विनंती
मुलाखतीआधी ‘मुलाकात’, संजय राऊत-कुणाल कामराची दीड तास चर्चा
(Kunal Kamra says ok with presidents rule in Maharashtra the day Sanjay Raut becomes president)