Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वीस बँकेतील पैसा केव्हा येणार?, लालुप्रसाद यादव यांचा पंतप्रधान मोदी यांना सवाल

मतदारांशी खोट बोलून भाजप सत्तेत आलं. देशातील नेत्यांचा पैसा स्वीस बँकेत जमा केला होता. स्वीसमधून पैसे आणून लोकांना पैसे देण्याचे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी दिले होते. आम्हीसुद्धा आमचे खाते खोलले होते.

स्वीस बँकेतील पैसा केव्हा येणार?, लालुप्रसाद यादव यांचा पंतप्रधान मोदी यांना सवाल
Follow us
| Updated on: Sep 01, 2023 | 8:30 PM

मुंबई, १ सप्टेंबर २०२३ : मोदी विरोधक पक्षांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत इंडियातील प्रमुख नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना बिहारचे माजी मुख्यमंत्री लालुप्रसाद यादव म्हणाले, देशातील सर्व पक्षांचे नेते येथे आहे. मोदी यांच्या पक्षाला सोडून सर्व पक्षांचे इंडियात स्वागत आहे. आधी देशातील विविध पक्षाचे नेते वेगवेगळे बसले होते. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले. तेव्हा आम्ही एकत्र नव्हतो. त्यामुळे मोदी यांना फायदा झाला. सुरुवातीपासून भाजपा हटावो देश बचावो, असं आम्ही म्हणत असतो. भा भारतीय, ज म्हणजे जलावो आणि पा म्हणजे पार्टी, अशी टीकाही लालुप्रसाद यादव यांनी केली. या देशात अल्पसंख्यांक सुरक्षित नाहीत. देशात काय सुरू आहे हे सर्व तुम्हाला माहीत आहे. देशात महागाई वाढत आहे. ६० रुपये भेंडी झाली. टमाटरही महाग झाले. सतत लढाई लढत लढत आम्ही एकत्र आहोत. पाटणा, बंगळुरु, कोलकाता येथील वेगवेगळ्या पक्षांचे नेते एकत्र आलो. संघटन निर्माण केले आहे, असं यादव यांनी सांगितलं.

स्वीस बँकेतील पैसे लोकांना केव्हा मिळणार

मतदारांशी खोट बोलून भाजप सत्तेत आलं. देशातील नेत्यांचा पैसा स्वीस बँकेत जमा केला होता. स्वीसमधून पैसे आणून लोकांना पैसे देण्याचे आश्वासन नरेंद्र मोदी यांनी दिले होते. आम्हीसुद्धा आमचे खाते खोलले होते. देशभरातील लोकांना खाते खोलले. पैसे मिळतील, असं वाटलं. पण, तसं काही झालं नाही.

मोदी यांना शांत बसवणार

चंद्रयानवर लोकं गेले. देशाचं नाव मोठं झालं. त्याचं स्वागत केलं पाहिजे. पण, आता नरेंद्र मोदी यांना शांत बसवल्याशिवाय राहणार नाही. मोदी यांना सूर्यलोकात पोहचवा, असं आवाहन लालुप्रसाद यादव यांनी इस्त्रो शास्त्रज्ञांना केले. लालुप्रसाद यादव म्हणाले की, अटल बिहारी वाजपेयी चांगले नेते होते. तसे नेते आम्ही पाहिले नाही.

राहुल गांधी, शरद पवार यांच्या पाठीशी

आम्ही सर्व एक आहोत. राहुल गांधी यांच्या पाठीशी उभे आहोत. आमचे नुकसान झाले तरी चालेल. पण, इंडियाचा फायदा झला पाहिजे. मोदी को हटाएंगे, देश को बचाएंगे, असा नारा लालुप्रसाद यादव यांनी दिला. शरद पवार हे जुने नेते आहेत. त्यांनी पार्टीला मजबूत ठेवावे. आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, असंही त्यांनी म्हंटलं.

टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ
टोळक्यासोबत डान्स, अन् गर्दीवर पैशांची उधळण; कुख्यात टिपूचा व्हिडिओ.
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.