…आणि मंगेशकरांना काढून टाकलं! मोदींकडून लता दीदींचा उल्लेख, काँग्रेसला आरसा दाखवला, गोव्यावर डोळा?

Narendra Modi on Goa & Hridaynath Mangeshkar : काँग्रेसनं किती अन्याय केलाय यावर निशाणा साधताना मोदींनी राज्यसभेतील भाषणात वेगवेगळ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवर बोलताना त्यांचं वक्तव्य हे काँग्रेसला जोरदार चिमटे काढणारं होतं.

...आणि मंगेशकरांना काढून टाकलं! मोदींकडून लता दीदींचा उल्लेख, काँग्रेसला आरसा दाखवला, गोव्यावर डोळा?
मंगेशकर कुटुंबीयांवरील झालेल्या अन्यायाचा पाढा मोदींनी राज्यसभेत वाचला
Follow us
| Updated on: Feb 08, 2022 | 2:11 PM

नवी दिल्ली : काँग्रेसनं किती अन्याय केलाय यावर निशाणा साधताना मोदींनी राज्यसभेतील (Narendra Modi speech in Rajyasabha) भाषणात वेगवेगळ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यांवर बोलताना त्यांचं वक्तव्य हे काँग्रेसला (Congress) जोरदार चिमटे काढणारं होतं. आगामी गोवा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही त्यांनी गोवा मुक्तीच्या संग्रामावरुन आणि नेहरुंच्या भूमिकेवर टीका केलीच. शिवाय गोव्याचेच असलेल्या मंगेशकर कुटुंबीयांच्या माध्यमातून मोदींनी केलेलं वक्तव्य हे गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं आहेत. लता मंगेशकर यांचे धाकटे बंधू पंडीत हृदयनाथ मंगेशकर (Narendra Modi on Pt. Hridaynath Mangeshkar) यांची गळचेपी करण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केला, असा थेट आरोप मोदींनी केलाय. गोव्याचे सुपुत्र असलेल्या हृदयनाथ मंगेशकरांच्या देशभक्तीवर काँग्रेसनं संशय घेत त्यांच्यावर केलेली कारवाई ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर एक प्रकारचा घाला होता, अशी थेट टीका नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत केलेल्या भाषणात केली आहे.

नेमकं मोदींचं वक्तव्य काय होती?

राज्यसभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय, की…

लता मंगेशकरांच्या निधनानं देश दुःखी झालय. पण लता मंगेशकर यांचं कुटुंब हे गोव्यातील होतं. त्यांच्या परिवारासोबत कशाप्रकारे अन्याय करण्यात आला.. हे जाणून घ्या.. पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांना ऑल इंडियो रेडिओच्या नोकरीवरून काढून टाकण्यात आलं.. हृदयनाथ मंगेशकर यांनी देशभक्तीवर कविता रेडिओवर प्रस्तुत केली म्हणून त्यांना काढून टाकण्यात आलं होत, असं हृदयनाथ मंगेशकर यांनी एका मुलाखतीत सांगितलंय..

सावरकरांनी हृदयनाथ यांना सांगितलं होतं की माझी कविता सादर करुन तुला जेलमध्ये जायचंय का… तेव्हा हृदयनाथ यांनी त्यांच्या देशभक्तीपर कवितेचा चाल देत सादर केलं होतं.. यानंतर दहाच दिवसांच्या आत हृदयनाथ मंगेशकर यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आलं होतं, असा दावा मोदींनी केलाय..

काँग्रेस काळात कशाप्रकारे अन्याय झाला, याची यादी मोठी आहे.. मज्नू सुलतानपुरी यांना पंडित नेहरु यांच्यावर टीका केल्यामुळे एक वर्ष कारावासाची शिक्षा देण्यात आल. धर्मपालजी यांनाही जेलमध्ये टाकण्यात आलं होतं. किशोर कुमार यांना इंदिराजींच्या समर्थनात न बोलल्यामुळे त्यांनाही काढून टाकण्यात आलं होतं.

गोवा विधानसभेच्या निवडणुकांमुळे थेट विधान

लता मंगेशकरांच्या निधनावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे स्वतः अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. तर दुसरीकडे नरेंद्र मोदी यांनीही लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारावेळी हजेरी लावली होती. अशातच आता राज्यसभेत केलेल्या भाषणात गोवा आणि मंगेशकर कुटुंबीय यांचा धागा जोडत काँग्रेसवर निशाणा साधण्याची रणनिती ही एका महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडीचा भाग आहे, असंही मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

गोवा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही या वक्तव्याला महत्त्व प्राप्त होतंय. येत्या 14 फेब्रुवारी रोजी गोव्यातील 40 विधानसभा मतदारसंघासाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. गोवा हे छोटं राज्य जरी असलं, तरी या राज्यावर आपली सत्ता असणं हे भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचं असल्यानं मोदींच्या भाषणात गोव्याबद्दल करण्यात आलेल्या वक्तव्यांचा अतिशय बारकाईनं अर्थ काढला गेला नाही, तरच नवल!

मोदींनी नेमकं काय म्हटलं? – पाहा व्हिडीओ

संबंधित बातम्या :

Modi on Pawar | अवघ्या काही मिनिटात शरद पवारांचं मोदींकडून तीनदा कौतुक, काय म्हणाले पंतप्रधान?

अगर काँग्रेस ना होती तो.. PM नरेंद्र मोदींनी सभागृहात पाढा वाचला, काँग्रेसच्या जखमेवर मीठ, प्रचंड गदारोळ

प्रधानमंत्रीजी आपसे नाराज नही, हैरान हूँ, तुम्ही आम्हाला सुपर स्प्रेडर का म्हणालात?; सुप्रिया सुळेंचा सवाल

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.