VIDEO | दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या नातवाचे आजोबांच्या आठवणीत हृदयस्पर्शी गाणे
व्हिडीओमध्ये आद्यने आजोबा प्रमोद महाजन, आजी रेखा महाजन यांच्यासोबत फोटोंचा कोलाजही शेअर केला आहे. (Pramod Mahajan Grandson Aadya Video )

मुंबई : दिवंगत नेते प्रमोद महाजन (Pramod Mahajan) यांच्या नातवाने आजोबांच्या आठवणीत गाणे लिहिले आहे. भाजप खासदार पूनम महाजन राव (Poonam Mahajan) यांचा सुपुत्र आद्य राव वजंदला (Aadya Rao Vajandla) याने शब्दबद्ध केलेल्या गाण्याचा व्हिडीओ यूट्यूबवर शेअर केला आहे. प्रमोद महाजन यांच्या नातवाने आपल्या वाढदिवशी आजोबांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. (Late leader Pramod Mahajan Grandson Aadya Rao Vajandla shares YouTube Video in fond memories of Grandfather)
आद्यची गायकी आणि लेखनही
16 वर्षांच्या आद्यने मालसन्स (Malsons) या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून डिजिटल पदार्पण केलं आहे. त्याच्या शॅडो (Shadow) या गाण्याला पाच तासांत 30 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हे गाणं आद्य राव वजंदला यानेच लिहिले असून गायलेही आहे. या गाण्याच्या व्हिडीओमध्ये आद्यने आजोबा प्रमोद महाजन, आजी रेखा महाजन यांच्यासोबत फोटोंचा कोलाजही शेअर केला आहे.
आजोबांच्या आठवणींना उजाळा
प्रमोद महाजन हे भाजपचे राष्ट्रीय पातळीवरील दिग्गज नेते होते. त्यांनी लोकसभा आणि राज्यसभेवरही पक्षाचे प्रतिनिधित्व केले होते. धाकटा भाऊ प्रवीण महाजनने त्यांच्यावर राहत्या घरी गोळ्या झाडल्या होत्या. 13 दिवसांच्या झुंजीनंतर उपचारादरम्यान 3 मे 2006 रोजी महाजन यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनावेळी नातू आद्य जेमतेम एक वर्षाचा होता.
प्रमोद महाजन यांची कन्या पूनम राव या उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजप खासदार आहेत. वडिलांच्या निधनानंतर त्या राजकारणात सक्रिय झाल्या.
पाहा व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
कुंकवाविना सुवासिनी तशी खडसेंविना विधानसभा, महाजनांच्या आठवणीने खडसे भावनिक
पूनम, तुझ्या बापाला तुझ्या चुलत्याने का मारलं? : अजित पवार
(Late leader Pramod Mahajan Grandson Aadya Rao Vajandla shares YouTube Video in fond memories of Grandfather)