AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BJP MLA Abhimanyu Pawar Corona | भाजप आमदार अभिमन्यू पवार यांना कोरोनाची लागण, मुलालाही संसर्ग

अभिमन्यू पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही आधी काम पाहिले आहे

BJP MLA Abhimanyu Pawar Corona | भाजप आमदार अभिमन्यू पवार यांना कोरोनाची लागण, मुलालाही संसर्ग
| Updated on: Jul 08, 2020 | 11:21 AM
Share

लातूर : भाजप आमदार अभिमन्यू पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. अभिमन्यू पवार हे लातूरमधील औसा मतदारसंघाचे आमदार आहेत. अभिमन्यू पवार आणि त्यांचे पुत्र परिक्षीत या दोघांनाही संसर्ग झाला आहे. (Latur Ausa BJP MLA Abhimanyu Pawar Corona Positive)

“मला हलकासा ताप/खोकला जाणवत असल्याने मी व माझ्या कुटुंबीयांनी कोरोना चाचणी केली होती .मी व माझा मुलगा परिक्षीत आम्हा दोघांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याने आम्ही वैद्यकीय तज्ञांच्या सल्ल्यानुसार उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालो आहोत” अशी माहिती त्यांनी ट्विटरवरुन दिली आहे.

“लातूरमधील आरोग्य व्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच लातूर येथेच पुढील उपचार घेण्याचा मी निर्णय घेतला आहे. आम्हा दोघांचीही तब्येत उत्तम असून काळजीचे काहीही कारण नाही.” असे त्यांनी सांगितले.

“मागच्या चार-पाच दिवसात माझ्या वा परिक्षीतच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःला होम क्वारंटाईन करुन घ्यावे. तसेच खबरदारी म्हणून कोरोना चाचणीही करुन घ्यावी. काही महत्त्वाचे काम असल्यास मी मेसेजच्या माध्यमातून उपलब्ध आहे. आपण सर्वांनीच स्वतःची व कुटुंबियांची‌ काळजी घ्यावी. तुमच्या सर्वांच्या आशिर्वादाने लवकरच बरा होऊन जनसेवेत रुजू होईन” असा विश्वास अभिमन्यू पवार यांनी व्यक्त केला आहे.

अभिमन्यू पवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही आधी काम पाहिले आहे. लातूरमध्ये भाजयुमोचे ते नेते आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत लातूरमधील औसा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर ते निवडून आले.

राज्यातील मंत्री, आमदारांना कोरोनाची लागण

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मग सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि त्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची बाधा झाली होती. या सर्वांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

हेही पहा : TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

पुण्यातील दौंडचे भाजप आमदार राहुल कुल, पिंपरी चिंचवडचे भाजप आमदार महेश लांडगे आणि त्यांची पत्नी, हडपसरमधील भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर, मिरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन, नाशिकमधील राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

हेही वाचा : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात होम क्वारंटाईन, बंगल्यावरील टेलिफोन ऑपरेटर कोरोना पॉझिटिव्ह

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह कुटुंबातील नऊ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर माजी महापौर आणि विद्यमान भाजप आमदार मुक्ता टिळक आणि त्यांच्या मातोश्री यांनाही कोरोना झाला आहे.

याशिवाय नांदेडच्याही एका आमदाराला कोरोना झाला होता. अहमदनगर जिल्ह्यातील काँग्रेसच्या विद्यमान आमदाराला कोरोनाची लागण झाली आहे.

(Latur Ausa BJP MLA Abhimanyu Pawar Corona Positive)

काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.