Sharad Pawar : इथे माझा कंटाळा आलाय का..? शरद पवारांच्या उत्तरावर हशा..!
राष्ट्रपती निवडणुकीसाठी भाजपा सोडून सर्वच विरोधी पक्षांचा पाठिंबा होता. कोणीही विरोध दर्शवला नव्हता. एवढेच नाही तर निवडणुकीमध्ये रणनिती कशी राहणार हे देखील स्पष्ट झाले होते.
औरंगाबाद : पदाधिकाऱ्यांच्या बैठका आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याच्या अनुशंगाने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा (Sharad Pawar) शरद पवार हे (Aurangabad) औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. पक्षाचे कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. एका वाक्यात अनेक अर्थ अशीच शरद पवार यांची पत्रकार परिषद असते पण औरंगाबादमध्ये खेळी-मेळीच्या वातावरणात त्यांनी प्रश्नांची उत्तरे दिली. (The President) राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीला आपण नकार दिला अन्यथा, राष्ट्रपतीच्या रुपात तुम्हाला पाहता आले असते ? या प्रश्नावरील उत्तराने एकच हशा उमटला. का माझा इथे तुम्हाला कंटाळा आला का? ह्या एका वाक्यात त्यांनी राष्ट्रपती उमेदवारीबद्दल आपले मत व्यक्त केले. पण यामागचे कारणही त्यांनी स्पष्ट केले.
म्हणून पवारांनी उमेदवारी नाकारली..
राष्ट्रपती पदासाठी भाजपा सोडून इतर सर्व पक्षांचा आग्रह होता. पण उद्या या निवडणुकीमध्ये यश आले असते तरी राष्ट्रपती पदाची मोठी जबाबदारी पडली असती. शिवाय माझा स्वभाव हा जनतेमध्ये जाण्याचा, त्यांच्याशी संवाद साधण्याचा आहे. तिथे मी एकाच जागी अडकून पडलो असते. ते काही माझ्या व्यक्तिमत्वाला शोभणारे नव्हते. त्यामुळे ज्या गावाला जायचेच नाही त्याची वाट कशाला विचारायची म्हणून आपण या निवडीतून माघार घेतल्याचे पवारांनी सांगितले आहे.
भाजपा सोडून सर्वांचा पाठिंबा
राष्ट्रपती निवडणुकीसाठी भाजपा सोडून सर्वच विरोधी पक्षांचा पाठिंबा होता. कोणीही विरोध दर्शवला नव्हता. एवढेच नाही तर निवडणुकीमध्ये रणनिती कशी राहणार हे देखील स्पष्ट झाले होते. शिवाय उमेदवारी स्वीकारली असती तर चित्र कदाचित वेगळे राहिले असते असे म्हणत त्यांनी निवडीबाबत विश्वासही असल्याचे सांगितले पण त्यामध्ये पडायचेच नाही हे स्पष्ट होते. त्यामुळे निवडणुक न लढविण्याचा निर्णय घेतल्याचे पवार म्हणाले.
तर पक्षाकडे दुर्लक्ष झाले असते…
एकावेळी एकच काम चांगले होते. पक्ष संघटन, जनतेशी संवाद आणि निर्माण झालेल्या परस्थितीतून मार्ग काढणे हा माझा स्वभाव आहे. सध्या पक्ष संघटन यावरही लक्ष केंद्रीत आहे. अशा परस्थितीमध्ये राष्ट्रपती पदावर जाणे म्हणजे अडकून बसण्यासारखे झाले असते. तो आपला स्वभावच नाही. शिवाय मी दिल्लीमध्ये अडकून पडलो तर पक्षाकडे दुर्लक्ष झाले असते असेही मत पवार यांनी व्यक्त केले आहे.