हा मोर्चा म्हणजे चेतावणी आहे, हा मोर्चा म्हणजे आव्हान आहे, तुम्हाला झोपू देणार नाही

हर घर जल ही योजना केंद्राची असून पस्तीस हजार कोटींची आहे. मात्र आपलं सरकार काहीच करत नाही. यातले पाचशे कोटींही या सरकारने खर्च केले नाहीत. त्यामुळे हा आजचा मोर्चा म्हणजे चेतावणी आहे, एक आव्हान आहे.

हा मोर्चा म्हणजे चेतावणी आहे, हा मोर्चा म्हणजे आव्हान आहे, तुम्हाला झोपू देणार नाही
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 15, 2022 | 3:41 PM

जालना : औरंगाबाद पाणी प्रश्नावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi government) घेरल्यानंतर ही फक्त सुरूवात आहे. राज्यातील पाणी प्रशानावरून तुम्हाला झोपू देणार नाही असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Leader of Opposition Devendra Fadnavis) यांनी म्हटलं होतं. त्याचीच प्रचिती आज जालन्यात आली. आज बुधवारी जालन्याचा पाणी प्रश्नावरून (Jalna water issue) भाजपकडूण विराट मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी औरंगाबादप्रमाणेच येथेही जालनेकरांच्या जलाक्रोश पाहायला मिळाला. यावेळी फडणवीस यांनी हा मोर्चा म्हणजे चेतावणी आहे, हा मोर्चा म्हणजे आव्हान आहे, तुम्हाला झोपू देणार नाही असं म्हटलं आहे. त्यामुळे राज्यात मोर्चांची मालिका सुरू होईल की काय असा प्रश्न आता अनेकांना पडत आहे.

तसेच फडणवीस यांनी म्हटलं आहे की, सरकारने जाणीवपूर्वक कोट्यवधींच्या योजना या थांबवल्या. जसे औरंगाबादच्या पाण्याचा प्रश्न आहे तो तसाच येथेही आहे. येथेही 15 दिवसांनी पाणी येतं. त्यामुळे जालन्याच्या जनतेते आक्रोश भरला आहे. ते आता आक्रमक झाले आहेत. तर जालन्याच्या उशाला घरण असूनही येथे 15 दिवसांनी पाणी येतं. ही कसली शोकांतीका? म्हणत फडणवीस यांनी टीका केली. तसेच पंतप्रधान मोदींनी गरिब कल्याणाचा मंत्र दिला. मात्र हे सरकार पैसा खर्च करत नाही. हर घर जल ही योजना केंद्राची असून पस्तीस हजार कोटींची आहे. मात्र आपलं सरकार काहीच करत नाही. यातले पाचशे कोटींही या सरकारने खर्च केले नाहीत. त्यामुळे हा आजचा मोर्चा म्हणजे चेतावणी आहे, एक आव्हान आहे. कामं करा… पाणी द्या. अन्यथा आम्ही तुम्हाला झोपू देणार नाही, आम्ही तुम्हाला कारभार करून देणार नाही.

हे सुद्धा वाचा

तसेच फडणवीस यांनी सरकारवर टीका केल्यानंतर जोपर्यंत तुम्ही सामान्य माणसाला न्याय देत नाही तोपर्यंत गप्प बसणार नसल्याचेही म्हटलं आहे. तर जोपर्यंत शुद्ध पाणी नळाला येत नाही तोपर्यंत आम्ही संघर्ष करत राहू असेही फडणवीस म्हणाले. तसेच आपल्या काळात प्रत्येक वेळी पैसा दिला, योजना दिल्या, जे मागितलं ते दिलं. मात्र आताचे सरकार हे झोपा काढत आहे. गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्री येते आले नाहीत. तर त्यांनी पैसाही दिला नाही. त्यामुळेच भर उन्हा या मता भगिनी रस्त्यावर उतरल्या आहेत. मता भगिनींनी मुख्यमंत्र्यांकडे पाणी मागितलं मात्र ते इश्वराने दिलं. हे सरकार इश्वर भरोसे चाललं असल्याचा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.