Ajit Pawar Birthday : अजित पवार म्हणजे महाराष्ट्राचे जॉर्ज वॉशिंग्टन, दादांच्या पीएकडून वाढदिनी शब्दसुमनांची उधळण करणारी पोस्ट

Ajit Pawar Birthday : महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा सध्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा आज वाढदिवस... दादांनी आज 63 व्या वर्षात पदार्पण केलं. दादांच्या वाढदिनी कला-क्रीडा-राजकारण-समाजकारण अशा सगळ्याच क्षेत्रातून विविध मान्यवर मंडळी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

Ajit Pawar Birthday : अजित पवार म्हणजे महाराष्ट्राचे जॉर्ज वॉशिंग्टन, दादांच्या पीएकडून वाढदिनी शब्दसुमनांची उधळण करणारी पोस्ट
अजित पवार, सुनीलकुमार मुसळे
Follow us
| Updated on: Jul 22, 2022 | 3:52 PM

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा सध्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांचा आज वाढदिवस (Ajit Pawar Birthday)… दादांनी आज ६३ व्या वर्षात पदार्पण केलं. दादांच्या वाढदिनी कला-क्रीडा-राजकारण-समाजकारण अशा सगळ्याच क्षेत्रातून विविध मान्यवर मंडळी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. या सगळ्यात सावलीसारखे 24 तास दादांच्या सोबत असलेले त्यांचे स्वीय सहाय्यक सुनीलकुमार मुसळे (SunilKumar Musale) यांनी दादांच्या व्यक्तिमत्वावर आणि त्यांच्या गुणांवर फेसबुक पोस्ट लिहून वाढदिनी त्यांच्यावर शब्दसुमनांची उधळण केली आहे. अमेरिकेच्या राजकारणात वक्तशीरपणासाठी जॉर्ज वॉशिंग्टन यांची ओळख होती. त्याच पद्धतीने अजितदादाही वक्तशीरपणासाठी प्रसिद्ध आहेत. मग तुलना करायची झालं तर दादा म्हणजे महाराष्ट्राचे जॉर्ज वॉशिंग्टन, असं सुनीलकुमार मुसळे यांनी म्हटलं आहे.

दादांचे पीए सुनीलकुमार मुसळे यांनी फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटलंय…?

राज्याचे विरोधी पक्षनेते आदरणीय अजित दादा पवार यांच्या शिस्तीचे आणि वक्तशीरपणाचे अनेक किस्से महाराष्ट्रातील जनतेने ऐकले आहेत. दादांच्या राजकीय विरोधकांनी खुल्या दिलाने मांडले आहेत. तब्बल एक दशकाहून अधिक काळ दादांसोबत असल्याने मला प्रत्यक्षात ते नेहमीच अनुभवता आले.प्रत्येक दौऱ्यात दादांच्या शिस्तीचा परिचय आल्याशिवाय राहत नाही.अजित दादा हे स्वच्छतेच्या बाबतीत फार शिस्तप्रिय आहेत.त्यांना कुठेही कचरा दिसला तर ते अधिकारी आणि कार्यकर्त्यांची कानउघडणी करत असतात.अनेक ठिकाणी दौऱ्यावर असताना अजित दादांना कार्यक्रमस्थळी कचरा आढळून आला असतांना त्यांनी स्वतः कचरा उचलत बाजूला केल्याची अनेक उदाहरणे आहेत.बरं ही प्रामाणिक तळमळ फक्त बारामती,महाराष्ट्र किंवा देशापुरता वावरताना मर्यादित नाहीये.काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मंत्र्यांचा विदेश दौर्यावर असतांना दादांबद्दलचा एक अनुभव सांगितला होता.दुसरं कोणीतरी रस्त्यावर टाकलेले चॉकलेटचे कव्हर दादांनी स्वतः उचलून कचरापेटीत टाकले होते.

सहसा भारतीय समाजजीवनात, राजकारणात वक्तशीरपणा अभावानेच आढळतो.बहुतांश राजकारण्यांना त्याचे वावडे असल्याने वेळा न पाळणे ही राजकीय फॅशन झाल्याचे आपल्याला दिसते.वक्तशीरपणाच्या बाबतीत जॉर्ज वॉशिंग्टन यांचे अनेक किस्से अमेरिकेत प्रसिद्ध असल्याचे माझ्या वाचनात आले.आपल्याकडच्या राजकीय नेत्यांसोबत मनोमन तुलना करताना अजितदादांचे नाव प्रकर्षाने त्यात समाविष्ट करावे लागेल.व्यासपीठावरील वा समोरील वेळेत नाही आले म्हणून दादा वेळेची चालढकल करतांना आजतागायत दिसले नाही.कार्यक्रम,बैठक,प्रचारसभा अगदी दिलेल्या वेळीच हजर राहण्याचा पायंडा आजतागायत चुकला नाही.

हे सुद्धा वाचा

आजकाल अभ्यागत कार्यकर्ते यांच्याकडून पाय पडून घेणेच काय पाय धुवून घेणे वगैरे राजकीय ट्रेंड देशभर शिगेला पोचलेला दिसत असतांना स्पष्टपणे पाटी लावून या सवंग गोष्टींना मनाई करत फक्त कार्यालाच सर्वोच्च प्राधान्य देण्याचा त्यांचा स्थायीभाव आहे. हाती घेतलेले काम नियोजनानुसार यशस्वी पार पाडणे. स्पष्टवक्तेपणा, वेळ आणि ‘दिलेला शब्द पाळणे’ या उच्च नैतिक मूल्यांचा राजकारणात ऱ्हास झपाट्याने होतांना दिसतोय. प्रसिद्धीपिपासूपणा, लोकानुनय करण्याचा, खोटं बोलून वेळ मारून नेणे आता साधारण गोष्ट झालेली दिसते. आजपर्यंतच्या स्पष्ट, पारदर्शी कार्यपद्धतीमुळे सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर अजित दादांचे वेगळेपण उठून दिसते. आज आदरणीय दादांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला अशा अनेक आठवणी, घटना, प्रसंग, क्षण डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या. आदरणीय दादा, शतायुषी व्हा! आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.