Manisha Kayande : लोकसभा सोडा आगोदर मंत्रिमंडळाचा विस्तार करा, मनीषा कायंदेंचा भाजपला टोला
शिंदे गटातील आमदारांकडून रोज खरी शिवसेना ही शिंदे गटाचीच असल्याचे सांगितले जात आहे. अजून हे प्रकरण कोर्टात आहे. सध्या केवळ आमदारांच्या अपात्रतेबद्दल सुनावणी सुरु आहे. अजून शिवसेना कोणाची हा मुद्दाच समोर आलेला नाही. त्यामुळे शिंदे गटाला अजून शिवसेना पक्षाचा दर्जा मिळाला नसल्याचा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.
मुंबई : राज्यातील (Cabinet Expansion) मंत्रिमंडळ विस्ताराचा प्रश्न गेल्या 36 दिवसांपासून रखडलेला आहे. याबाबत (State Government) भाजप आणि शिंदे गटात एकमत होत नाहीत. त्यामुळे राज्यातील जनता त्रस्त आहे. त्यामुळे (Lok Sabha Election) लोकसभेचे सोडा आगोदर मंत्रिमंडळ विस्ताराचा प्रश्न मार्गी लावा असा टोला शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी भाजपाला लगावलेला आहे. दुसरीकडे भाजप हे आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुशंगाने पक्ष संघटनेवर भर देत आहे. त्याअनुशंगाने 9 केंद्रीय मंत्री हे राज्यात दाखल होणार असून 16 मतदार संघात ते वेगवेगळे कार्यक्रम घेणार आहेत. त्या अनुशंगाने भाजपाची तयारी सुरु असतानाच कायंदे यांनी भाजपाला सुनावले आहे.
शिंदे गट अजूनही एक गटच..
शिंदे गटातील आमदारांकडून रोज खरी शिवसेना ही शिंदे गटाचीच असल्याचे सांगितले जात आहे. अजून हे प्रकरण कोर्टात आहे. सध्या केवळ आमदारांच्या अपात्रतेबद्दल सुनावणी सुरु आहे. अजून शिवसेना कोणाची हा मुद्दाच समोर आलेला नाही. त्यामुळे शिंदे गटाला अजून शिवसेना पक्षाचा दर्जा मिळाला नसल्याचा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे. तर न्यायदेवतेवर आपला विश्वास असून सत्याचाच विजय होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.
पिडीत महिलेचा पुनर्वसन व्हावे
भंडारा – गोंदियातील बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी मेडिकल रुग्णालयात भेट घेतली. पीडितेवर नागपुरातील मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे प्रकरण फास्टक कोर्टात चालावावे शिवाय सदरील महिलेचे पूनर्वसन व्हावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. मनीषा कायंदे म्हणाल्या, सामूहिक बलात्कार पीडितेला किंवा तिच्या नातेवाईकांना आम्ही भेटू नये अशा सूचना रुग्णालय प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला देण्यात आल्या होत्या का अशी आम्हाला शंका वाटते. शिवसेनेतर्फे आम्हाला काही मदत निधी द्यायचे होती. तीसुद्धा आम्हाला पीडितेच्या कुटुंबीयांना देऊ दिली नाही. भेटीदरम्यान अनेक अडचणी आल्याचेही त्या म्हणाल्या आहेत.
भाजपाचे मिशन लोकसभा
एकीकडे राज्यात सत्तापरिवर्तनामध्ये भाजप हा केंद्रबिंदू राहिलेला आहे. असे असतानाही दुसरीकडे पक्ष संघटनेवर विशेष लक्ष दिले जाणार आहे. त्याअनुशंगाने भाजपाचा मेगा प्लॅन सुरु असून पक्ष वाढीसाठी आणि लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राज्यातील 16 लोकसभा मतदार संघात 9 केंद्रीय मंत्री दाखल होणार आहेत.या दरम्यानच्या काळात धोरणात्मक बदल, स्थानिक पातळीवरील अडचणी, संघाटनात्मक कार्यक्रम, धार्मिक स्थळांना भेटी, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी असे कार्यक्रम नियोजित आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे 21 कार्यक्रम हे मंत्री मतदार संघात येणार आहेत.