AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशातील शेवटच्या जागेचाही निकाल लागला, 352 जागांसह ‘फिर एक बार मोदी सरकार’

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने 2019 ची मतमोजणी संपल्यानंतर अंतिम निकालाची घोषणा केली. भाजपप्रणित एनडीएने 352 जागा मिळवत पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे. भाजप नेते किरण रिजीजू यांच्या अरुणाचल प्रदेशातील जागेचा निकाल शुक्रवारी सायंकाळी जाहीर झाला. यामुळेच अंतिम निकालासाठी विलंब झाला. या निवडणुकीत एकट्या भाजपने 303, तर काँग्रेसने 52 जागा मिळवल्या आहेत. मतमोजणीला विलंब कशामुळे? […]

देशातील शेवटच्या जागेचाही निकाल लागला, 352 जागांसह 'फिर एक बार मोदी सरकार'
| Edited By: | Updated on: May 24, 2019 | 10:35 PM
Share

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने 2019 ची मतमोजणी संपल्यानंतर अंतिम निकालाची घोषणा केली. भाजपप्रणित एनडीएने 352 जागा मिळवत पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे. भाजप नेते किरण रिजीजू यांच्या अरुणाचल प्रदेशातील जागेचा निकाल शुक्रवारी सायंकाळी जाहीर झाला. यामुळेच अंतिम निकालासाठी विलंब झाला. या निवडणुकीत एकट्या भाजपने 303, तर काँग्रेसने 52 जागा मिळवल्या आहेत.

मतमोजणीला विलंब कशामुळे?

देशातील 541 जागांचा अंतिम निकाल शुक्रवारी सकाळपर्यंत आला होता. पण अरुणाचल प्रदेशमधील एका जागेमुळे अंतिम निकाल रखडला. शुक्रवारी दुपारी किरण रिजीजू 1 लाख 56 हजार मतांनी काँग्रेस उमेदवाराच्या पुढे होते. पण मतमोजणी पूर्ण झालेली नसल्यामुळे त्यांना विजयाचं प्रमाणपत्र दिलं नाही. रिजीजू यांनी 1 लाख 74 हजार 843 मतांनी काँग्रेसच्या उमेदवारावर मात केली. 2014 मध्येही रिजीजू यांनी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्याचीच पावती म्हणून त्यांना केंद्रात मंत्रीपदही मिळालं.

पक्षनिहाय जागा

आप – 01

एआयएडीएमके – 01

एमआयएम – 02

टीएमसी – 22

बसपा – 10

सपा – 05

भाजप – 303

शिवसेना – 18

बीजेडी – 12

सीपीआय – 02

सीपीआयएम – 03

डीएमके – 23

काँग्रेस – 52

जेडीएस – 01

नॅशनल कॉन्फरन्स – 03

जेडीयू – 16

लोक जनशक्ती पार्टी – 06

राष्ट्रवादी काँग्रेस – 05

अकाली दल – 02

टीआरएस – 09

टीडीपी – 03

वायएसआर काँग्रेस – 25

इतर पक्ष – 14

मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.