ठाकरे सरकार राज्यपालांचे पंख छाटण्याच्या तयारीत, कुलगुरु निवडीचे अधिकार काढणार?
विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यातील संघर्ष वारंवार पाहायला मिळत आहे.
मुंबई : महाविकास आघाडी सरकार राज्यपालांचे पंख छाटण्याच्या तयारीत दिसत आहे. राज्यपालांकडून कुलगुरु निवडीचे अधिकार काढून घेतले जाण्याची शक्यता आहे. ऊर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी मंत्रिमंडळ बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला. (Maha Vikas Aghadi Govt Possibly removing the right to elect the Vice-Chancellor from the Governor)
विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यातील संघर्ष वारंवार पाहायला मिळत आहे. त्यामुळेच राज्यपालांचे अधिकार कमी करण्याची चाचपणी सरकारकडून होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु सुभाष चौधरी यांच्या निवडीनंतर हा मुद्दा काल मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेत आला. संघाच्या विचाराशी संबंधित व्यक्तींची निवड राज्यपाल कुलगुरुपदीची करत असल्याचा आरोप होत आहे. त्यानंतर मंत्री नितीन राऊत यांनी आक्षेप घेतला. तर पशु दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी पाठिंबा दर्शवला.
हेही वाचा : भगतसिंह कोश्यारींकडे गोव्याच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त प्रभार
“कुलगुरु नियुक्तीत सरकारला शून्य अधिकार आहेत. समिती पाच जणांची निवड करते आणि राज्यपाल त्यापैकी एकाचे नाव ठरवतात” अशी माहिती नितीन राऊत यांनी दिली. त्यामुळे राज्यपालांचे अधिकार कमी करण्याच्या सरकारच्या हालचाली असून कायदा विभागाकडून अभिप्राय मागवला जात आहे.
राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारच्या भूमिकांमध्ये याआधीही अनेक वेळा संघर्ष होताना दिसले आहे. कोरोना काळात परीक्षा असो, किंवा राज्यपाल नियुक्त आमदार निवड, दोघांमध्ये मतांतरे होता दिसली आहेत. त्यानंतर आता आणखी एका मुद्द्यावर संघर्ष होण्याची शक्यता आहे.
VIDEO : टॉप 9 न्यूज | 28 August 2020 https://t.co/Dm8yXXQMKO
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 28, 2020
(Maha Vikas Aghadi Govt Possibly removing the right to elect the Vice-Chancellor from the Governor)