“राणे कुटुंबियांनो तेव्हा तुमची जीभ हाडसून हातात दिल्याशिवाय शांत बसणार नाही”
Sharad Koli on Nitesh Rane : बारसू प्रकल्प, राणे कुटुंबीय अन् उद्धव ठाकरे यांची महाडमधील सभा; ठाकरे गटाच्या नेत्याची सविस्तर प्रतिक्रिया
महाड : ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी राणे कुटुंबावर टीकास्त्र डागलंय.”राणे कंपनीला एकच सांगतोय, इथून पुढच्या काळात उद्धवसाहेबांना किंवाआदित्य साहेबांना शिवसेनेच्या नेत्यांना कोणाला अरेरावेची भाषा केली तर गाठ आमच्याशी आहे. उद्धवसाहेबांचा ज्या दिवशी आदेश येईल आणि शिवसेनेच्या नेत्यांचा आदेश येईल तेव्हा राणे कुटुंबाच्या बगलबच्चांनो, तुमची जीभ हडसून हातात दिल्या शिवाय शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही, असं शरद कोळी म्हणाले आहेत.
बारसूत होऊ घालेल्या रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन केलं जात आहे. या आंदोलनकर्त्यांचं म्हणणं जाणून घेण्यासाठी उद्धव ठाकरे बारसूत गेले. त्याचवेळी राजापूरमध्ये नितेश राणे आणि निलेश राणे यांच्या नेवृत्वात रिफायनरीच्या समर्थनार्थ आंदोलन केलं गेलं. यात राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलीये. त्याला शरद कोळी यांनी उत्तर दिलं आहे.
खोके अन् टीकेचे बाण
खरंतर या राणे कुटुंबाच्या पोटात गोळा उठलेला आहे. आज उद्धवसाहेब ठाकरे बारसूला गेले. त्यामुळे राणे कुटुंबाच्या पोटावरती नांगर फिरलेला आहे. कारण त्यांना आता 50 खोके मिळायचे बंद पडलेलं आहे. उद्धवसाहेब गेल्यामुळे प्रकल्प आता जागेवर बंद राहणार आहे. प्रकल्प परत इथे होऊ शकत नाही. त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्या अशा पद्धतीने बोलत आहे, असं म्हणत शरद कोळी यांनी टीकास्त्र डागलंय.
राणेंना लाज-लज्जा काही उरली नाही! अरे बाबा तुला लाज वाटायला पाहिजे. उद्धवसाहेबांनी कोकणावर खूप प्रेम केलंय. अरे उद्धव साहेबांनी राणेच्या राजकीय कारकीर्दीला जन्म दिला. उद्धवसाहेब तुमचा बाप आहे. राजकारणात तुमचा बाप आहे. बापाला विसरून जाऊ नका. जरा बापाला नीट बोलायला शिका. अरेरावाची भाषा करू नका, असं म्हणत शरद कोळी यांनी राणेंवर टीकास्त्र डागलंय.
महाडमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. त्यावर शरद कोळी यांनी भाष्य केलंय. महाडमध्ये सभा होणार आहे. तशाच सगळ्या राज्यांमध्ये सभा आहेत. ज्या ठिकाणी या गद्दारांनी गद्दारी केली त्या गद्दारांचा राजकारणातून नामो निशान मिटवून टाकण्यासाठी उद्धव ठाकरे यांची आजची सभा होणार आहे. इथल्या राजकारणात परत हे गद्दार राजकारणात उठून उभे राहणार नाहीत. इथल्या गद्दारांचं कंबरडं कायमस्वरूपी शिवसैनिक मोडून काढतील, असंही शरद कोळी म्हणाले आहेत.