मुखी 50 खोके अन् बोके! हातात गाजर, पोस्टरवर सरकारविरोधी घोषणा, विधीमंडळ परिसरात सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
आजचं कामकाज सुरु होण्याआधीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी 50 खोके एकदम ओके अन् खावून खावून माजलेत बोके! अश्या घोषणा विरोधकांकडून देण्यात आल्या.
मुंबई : सध्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन (Maharahtra Assembly Monsoon Session) होतंय. आजचं कामकाज सुरु होण्याआधीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी 50 खोके एकदम ओके अन् खावून खावून माजलेत बोके! अश्या घोषणा विरोधकांकडून (Oppositions) देण्यात आल्या. तर त्याचवेळी सत्ताधारी पक्षही तिथे उपस्थित होता. यावेळी गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं. यावेळी विरोधकांनी गाजर आणले होते. हे गाजर हाती घेत सरकारच्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या. अधिवेशनाला सुरूवात झाल्यापासून 50 खोके एकदम ओके! अश्या घोषणा देण्यात येत आहेत. पण या घोषणांवर सत्ताधाऱ्यांचा आवडलेला नाही. त्यामुळे आज विधिमंडळ परिसरात सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले. यावेळी प्रचंड गोधळाचं वातावरण निर्माण झालं. सत्ताधारी पक्षानेदेखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. लवासातील खोके एकदम ओके! अश्या घोषणा सत्ताधाऱ्यांनीही दिल्या.
विरोधकांची घोषणाबाजी
अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच विरोधक आक्रमक असल्याचं पाहायला मिळालं. आजही त्यांनी 50 खोके एकदम ओके अन् खावून खावून माजलेत बोके! अश्या घोषणा विरोधकांकडून देण्यात आल्या. तर त्याचवेळी सत्ताधारी पक्षही तिथे उपस्थित होता. यावेळी गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं. यावेळी विरोधकांनी गाजर आणले होते. हे गाजर हाती घेत सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.
सत्ताधाऱ्यांची घोषणाबाजी
अधिवेशनाला सुरूवात झाल्यापासून 50 खोके एकदम ओके! अश्या घोषणा देण्यात येत आहेत. पण या घोषणांवर सत्ताधाऱ्यांचा आवडलेला नाही. त्यामुळे आज विधिमंडळ परिसरात सत्ताधारी-विरोधक आमनेसामने आले.यावेळी प्रचंड गोधळाचं वातावरण निर्माण झालं. यावेळी सत्ताधारी पक्षानेदेखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. लवासातील खोके एकदम ओके! अश्या घोषणा सत्ताधाऱ्यांनीही दिल्या.
आज पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. गेले चार दिवस वादळी ठरले आहेत. विविध प्रश्न उपस्थित करून विरोधकांनी राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र सत्ताधाऱ्यांकडून देखील विरोधकांना तोडीसतोड प्रत्युत्तर देण्यात आले. चौथ्या दिवशी मुंबईतील खड्डे आणि ट्राफिकचा प्रश्न चांगलाच गाजला. मागचे पाच दिवस विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करताना दिसत आहेत. सरकारविरोधात जोरदार घोषणबाजी करण्यात येते आहे. सध्या शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रश्न देखील चांगलाच तापला आहे. या सर्व पार्श्वभूमीर आजचा पाचवा दिवस देखील वादळी ठरण्याची शक्यता आहे. आज राज्यातील विविध प्रश्नांवर विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. कारण आता अधिवेशनाचे केवळ दोनच दिवस शिल्लक आहेत.