Dhule district Assembly results | धुळे जिल्हा विधानसभा निकाल
2014 च्या विधानसभा निवडणुकीत धुळे जिल्ह्यातील पाच मतदारसंघांपैकी (Dhule assembly seats) काँग्रेसला तीन आणि भाजपला दोन मतदारसंघ मिळाले.
धुळे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उत्तर महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व जागा जिंकण्याचा निर्धार केला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत धुळे जिल्ह्यातील पाच मतदारसंघांपैकी (Dhule assembly seats) काँग्रेसला तीन आणि भाजपला दोन मतदारसंघ मिळाले. यंदा धुळ्यात कोण बाजी मारतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं.
निकालासाठी टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा
मतदारसंघ | महायुती | महाआघाडी | विजयी उमेदवार |
---|---|---|---|
साक्री | मोहन गोकुळ सुर्यवंशी (भाजप) | धनाजी अहिरे (काँग्रेस) | मंजुषा गावित (अपक्ष) |
धुळे ग्रामीण | ज्ञानज्योती बदाणे पाटील (भाजप) | कुणाल पाटील (काँग्रेस) | कुणाल पाटील (काँग्रेस) |
धुळे शहर | हिलाल माळी (शिवसेना) | अनिल गोटे | शाह फारूख अन्वर (MIM) |
सिंदखेडा | जयकुमार रावल (भाजप) | संदीप बेडसे (राष्ट्रवादी) | जयकुमार रावल (भाजप) |
शिरपूर | काशिराम पावरा (भाजप) | रणजीत भरत सिंग पावरा (काँग्रेस) | काशिराम पावरा (भाजप) |
2014 चा निकाल – धुळे : 05 (Dhule MLA list)
5 – साक्री- धनाजी अहिरे (काँग्रेस)
6 – धुळे ग्रामीण- कुणाल पाटील (काँग्रेस)
7 – धुळे शहर- अनिल गोटे (भाजप)
8 – सिंदखेडा- जयकुमार रावल (भाजप)
9 – शिरपूर- काशीराम पावरा (काँग्रेस)