Hingoli district Assembly results | हिंगोली जिल्हा विधानसभा निकाल
हिंगोली जिल्हा मूळ परभणी जिल्ह्यातून 1999 साली वेगळा झाला. हिंगोली जिल्ह्यात 5 तालुके आहेत. या जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी आणि वसमत हे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत.
Hingoli Assembly result हिंगोली : हिंगोली जिल्हा मूळ परभणी जिल्ह्यातून 1999 साली वेगळा झाला. हिंगोली जिल्ह्यात 5 तालुके आहेत. या जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी आणि वसमत हे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. जिल्ह्यातील हिंगोली आणि कळमनुरी या दोन मतदारसंघात काँग्रेसचा बोलबोला होता,तर वसमतमध्ये राष्ट्रवादीची चलती होती. पण 2014 साली झालेल्या निवडणुकीत परिवर्तन झाल्याचं बघायला मिळालं. 2014 च्या निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना आणि भाजपला प्रत्येकी 1 जागा मिळाली.
टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा
मतदारसंघ | महायुती | महाआघाडी | विजयी उमेदवार |
---|---|---|---|
वसमत | जयप्रकाश मुंदडा (शिवसेना) | चंद्रकांत नवघरे (राष्ट्रवादी) | चंद्रकांत नवघरे (राष्ट्रवादी) |
कळमनुरी | संतोष बांगर (शिवसेना) | संतोष टरफे (काँग्रेस) | संतोष बांगर (शिवसेना) |
हिंगोली | तानाजी मुटकुळे (भाजप) | भाऊराव पाटील (काँग्रेस) | तानाजी मुटकुळे (भाजप) |
2014 चा निकाल – हिंगोली – 03 ( Hingoli MLA list)
92 – वसमत – जयप्रकाश मुंदडा (शिवसेना)
93 – कळमनुरी – संतोष टरफे (काँग्रेस)
94 – हिंगोली – तानाजी मुटकुळे (भाजप)