विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक तात्काळ घ्या, काँग्रेस नेत्यांचा जोर

विधानसभा अध्यक्षपद निवडणूक घ्यावी, ही मागणी काँग्रेस करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Maharashtra Assembly Speaker Election Congress)

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक तात्काळ घ्या, काँग्रेस नेत्यांचा जोर
विधानभवन
Follow us
| Updated on: Mar 03, 2021 | 11:57 AM

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक तात्काळ घ्यावी, अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. काँग्रेस पक्षाकडे विधानसभा अध्यक्षपद आहे, त्यामुळे निवडणूक तातडीने घेण्याची भूमिका काँग्रेस नेत्यांनी घेतली आहे. नाना पटोले यांनी महिन्याभरापूर्वी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांच्याकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. परंतु विधानसभा अध्यक्षांची खुर्ची अद्यापही रिकामीच आहे. (Maharashtra Assembly Speaker Election Congress demands urgently)

विधानसभा अध्यक्ष निवडणुकीची घाई का?

काँग्रेस पक्षाकडे मुळात खाती कमी आहेत. त्यात आता विधानसभा अध्यक्षपदही रिक्त आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांना निवडणुकीची घाई लागली असावी. सध्या विधानसभेचे प्रभारी अध्यक्षपद राष्ट्रवादीचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे आहे. महाविकास आघाडी नेत्यांची लवकरच बैठक होणार आहे. त्यात विधानसभा अध्यक्षपद निवडणूक घ्यावी, ही मागणी काँग्रेस करणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.

नवा विधानसभा अध्यक्ष कोण होणार?

नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यामुळे विधानसभा अध्यक्ष कोण होणार? पुढचा विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचाच असणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यावर बोलताना महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांचे नेते याबाबत बैठक घेऊन योग्य निर्णय घेतील, असं पटोले यांनी सांगितलं होतं.

विधानसभा अध्यक्षपदासाठी कोणाकोणाची नावं चर्चेत?

दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून अनुभवी नेते पृथ्वीराज चव्हाण, ऊर्जामंत्री नितीन राऊत, मराठवाड्यातील काँग्रेस नेते सुरेश वरपुडकर, मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज असलेले आमदार संग्राम थोपटे आणि आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांच्या नावांची चर्चा आहे. (Maharashtra Assembly Speaker Election Congress demands urgently)

शरद पवारांचं सूचक वक्तव्य

विधानसभा अध्यक्षपद मिळवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष इच्छुक असल्याचं बोललं जातं. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सूचक वक्तव्य केलं होतं. काँग्रेसमध्ये अंतर्गत दबावामुळे पक्षाध्यक्ष बदलण्याचा निर्णय घेण्यात आला, असा दावा पवारांनी त्यावेळी केला होता.

विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे होतं ते खुलं झालं आहे. विधानसभेचा नवा अध्यक्ष निवडण्यासाठी आता पुन्हा चर्चा होईल, असे शरद पवार यांनी म्हटले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून या पदासाठी आता जोर लावला जाणार का, असा सवाल विचारला जात होता.

संबंधित बातम्या :

नाना पटोलेंनी राजीनामा दिल्यानंतर शरद पवारांचे सूचक वक्तव्य

माझी छाती फाडली तरी शरद पवारच दिसतील म्हणणारे नरहरी झिरवाळ हंगामी अध्यक्ष

(Maharashtra Assembly Speaker Election Congress demands urgently)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.