वेदांता प्रकल्प गुजरातला गेला याची महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होईल- वरुण सरदेसाई
शिवसेना नेते वरुण सरदेसाई यांनी वेदांता प्रकल्पावर भाष्य केलंय.
बीड: शिवसेना नेते वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी वेदांता प्रकल्पावर भाष्य केलंय. वेदांता प्रकल्प गुजरातला गेला, याची महाराष्ट्राच्या इतिहासात याची नोंद होईल, असं वरुण सरदेसाई म्हणाले आहेत. वेदांता प्रकल्प (Vedanta Project) गुजरातला गेल्याने महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं आहे. 1 लाख तरुणांचा रोजगार गेलाय आणि उद्योग मंत्र्यांना काहीच माहिती नाही! हे किती धक्कादायक आहे. महाविकास आघाडीमुळे हा प्रकल्प गेला असता तर या नव्या मुख्यमंत्र्यांनी विधानभवनात प्रश्न करायला हवे होते. तुमच्या हातून वाईट झाले की खापर महाविकास आघाडीच्या नावावर फोडत आहात. हे योग्य नाही, असंही ते म्हणालेत.