AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: दाऊद के दलालों को, जुते मारो… नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप विधानभवनाच्या पायरीवर

अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातही विरोधकांनी राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांच्या राजीनाम्यासाठी विधानभवनाच्या (vidhan bhavan) पायरीवर जोरदार आंदोलन केलं.

VIDEO: दाऊद के दलालों को, जुते मारो... नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप विधानभवनाच्या पायरीवर
विधीमंडळाच्या पायऱ्यांवर भाजप आमदारांची घोषणाबाजीImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 11:38 AM

मुंबई: अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातही विरोधकांनी राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांच्या राजीनाम्यासाठी विधानभवनाच्या (vidhan bhavan) पायरीवर जोरदार आंदोलन केलं. हातात पोस्टर घेऊन विरोधक विधानभवनाच्या पायरीवर बसले होते. ‘दाऊद के दलालों को जुते मारो सालों को’, ‘ठाकरे सरकार हाय हाय, नवाब मलिक हाय हाय’, ‘मुंबई की गलियाँ सुनी है, ठाकरे सरकार खुनी है’, अशा जोरदार घोषणा भाजपच्या (bjp) आमदारांनी दिल्या. विरोधी पक्षाच्या आमदारांनी पायरीवरच ठिय्या मारून जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. तसेच जोपर्यंत मलिक यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच ठेवू. दाऊदशी संबंधित मंत्र्यांला मंत्रिमंडळात ठेवलेच कसे जाऊ शकते? असा सवाल करत विरोधकांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

BJP Protest

BJP Protest

आठवड्याच्या पहिल्या दिवशी अधिवेशन सुरू होताच भाजपचे विधानसभा आणि विधान परिषदेतील आमदार विधान भवनाच्या पायरीवर एकवटले. चंद्रशेखर बावनकुळे, योगेश सागर, मनिषा चौधरी, पराग अळवणी, राजहंस सिंह आणि भारती लव्हेकर आदी नेते विदान भवनाच्या पायरीवर जमले होते.

BJP Protest

BJP Protest

विधान भवनाच्या पायरीवर भाजपचे काही आमदार खाली बसले होते, तर चंद्रशेखर बावनकुळे, पराग अळवणी आणि योगेश सागर हे उभे राहूनच घोषणा देत होते. योगेश सागर यांच्या हातात नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे बॅनर होते.

BJP Protest

BJP Protest

यावेळी आमदार मनिषा चौधरी यांनी जोरजोरात घोषणा देण्यास सुरुवात केली. मनिषा चौधरी या जोरजोरात घोषणा देताना दिसत होत्या. त्यांच्या मागोमाग भाजपचे इतर आमदारही जोरजोरात घोषणा देत होते. सरकारमधील आमदार किंवा मंत्री पाऱ्यावरून जात असताना भाजपच्या या आमदारांच्या घोषणा अधिकच वाढत होत्या.

BJP Protest

BJP Protest

‘दाऊद के दलालों को, जुते मारो सालों को’, ‘मुंबई के गद्दारों को, जुते मारो सालों को’, ‘आघाडी सरकार हाय हाय, बिघाडी सरकार हाय हाय’, ‘खुनी सरकार हाय हाय, ठाकरे सरकार हाय हाय’, ‘नवाब मलिक कौन है, नवाब मलिक चौर है’, ‘मुंबई की गलियाँ सुनी है, ठाकरे सरकार खुनी है’, ‘राजीनामा द्या, राजीनामा द्या, नवाब मलिक राजीनामा द्या’, ‘कोण म्हणतं देणार नाय, घेतल्याशिवाय राहणार नाय’, आदी घोषणा भाजपकडून दिल्या जात होत्या. या घोषणा देत असतानाच भाजपचे आमदार मध्येच जोरजोरात टाळ्याही वाजवत होते.

BJP Protest

BJP Protest

दाऊद टोळीशी संबंधितांवर कारवाई झाली आहे. आता त्यांचा राजीनामा घेतला आहे. गंभीर प्रकरणात नवाब मलिक आत आहेत. तरीही हे सरकार त्यांना का वाचवत आहे? असा सवाल भाजपने केला आहे.

संबंधित बातम्या:

Mumbai Fish : मुंबईकरांना कॅन्सरचा धोका? बोबिंल, घोळ, माशात मायक्रोप्लॅस्टिकचे अंश

मी कबड्डी प्लेअर, दिल्ली, मुंबईतील व्हीआयपी कार्यकर्ता नाही; बच्चू कडूंची मोदींवर नाव न घेता टीका

VIDEO: ओबीसी आरक्षणासाठी ‘मध्यप्रदेश पॅटर्न’, आज महत्त्वाची बैठक, भुजबळांनी सांगितला काय आहे ‘मध्यप्रदेश पॅटर्न’

मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'.
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?.
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?
'आपल्याकडे वेळ कमी', मोदींचं सूचक विधान, पाकने घेतला धसका; काय होणार?.
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?
पाकने युद्धाची वेळ सांगितली अन् मोदींची दिल्लीत फायनल बैठक, पुढे काय?.
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती
पाकिस्तानची झोप उडाली, भारत बदला घेण्यासाठी ही रणनिती वापरण्याची भिती.
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर
'त्या' झिपलाइन ऑपरेटवरील संशय खरा? NIA च्या चौकशीतून मोठी माहिती समोर.
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्...
भारतानं पाकला पाडलं उघडं, संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा दाखला अन्....
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या संरक्षण दलात मोठे बदल, 1 मे पासून....
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने
गुजरात ड्रग्स प्रकरणाचा पहलगाम हल्ल्याशी थेट संबंध - एनआयएने.
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी
इलेक्ट्रिक वाहनांच्या पॉलिसीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी.