Maharashtra Mantrimandal List 2022 LIVE Updates : राज्यातलं हे सरकार असंविधानिक, मंत्रीपदाची शपथ थोड्या दिवसांची; प्रियंका चतुर्वेदींची टीका
Maharashtra Cabinet Expansion 2022 Live Updates : मंत्रीमंडळ विस्ताराची प्रत्येक अपडेट पाहा फक्त एका क्लिकवर
मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तब्बल 40 दिवसांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज त्यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत. राजभवनात सकाळी 11 वाजता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी शिंदे गट-भाजप युतीच्या आमदारांना (आमदार) पदाची शपथ देतील. जवळपास 20 जण मंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात, अशी चर्चा आहे. विस्ताराची पुढील फेरी काही काळानंतर होईल.
शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांनी 30 जून रोजी मुख्यमंत्रीपदाची तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शिंदे-फडणवीस सरकारने 4 जुलै रोजी महाराष्ट्र विधानसभेत बहुमत सिद्ध केले. द्विसदस्यीय मंत्रिमंडळाच्या अनेक बैठका झाल्या असून अनेक महत्त्वाचे निर्णयही घेण्यात आले आहेत. यापूर्वी, शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार पडले होते.
LIVE NEWS & UPDATES
-
गद्दार म्हणतोय बंडगर म्हणतोय काय करणार संतोष बांगर बघू; अंबादास दानवे
अंबादास दानवे उद्धव ठाकरे यांच्या भेटीला
हे मंत्रिमंडळ गद्दारांचा , कलंकित असलेल्या लोकांचं मंत्रिमंडळ
यांना महिला ,माता भगिनी विषयी काय घेणं देणं नाही
एकही महिलेला मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही हे मोठे दुर्दैव आहे
त्यांही इतक्या लोकांना आश्वासन दिलेले आहे की ते आश्वासन पूर्ण करताना त्याच्या नाकी नऊ आलेले
त्यामुळे त्यांच्याकडे हे अपेक्षा ठेवन सुद्धा चुकीच
अब्दुल सत्तार यांच्यावर आरोप नव्हे तर पुरावे आहेत
अब्दुल सत्तार यांच्या संस्थेमध्ये त्यांच्या मुलीच नव्हे तर अनेक नातेवाईकानी बोगस सर्टिफिकेट देऊन त्या ठिकाणी नोकरी दिल्याचा आरोप
गद्दार माणूस नाक वर करून तोंड वर करून चालू शकत नाही नुसताच घोषणा करतो गद्दार म्हणतोय बंडगर म्हणतोय काय करणार संतोष बांगर बघू
-
पुण्याच्या राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचा फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुणे दौऱ्यात राष्ट्रवादीला दे धक्का,
– राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचा फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश,
– रेखा टिंगरे या काँग्रेसकडून एकदा तर राष्ट्रवादीकडून दोन वेळा नगरसेविका होत्या,
– राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपात प्रवेश करणाऱ्यांचा ओघ वाढलाय.
-
-
भाजपचे अनेक मित्र त्यांना आता सोडून चालले; एकनाथ खडसे
भाजपाबरोबर महाराष्ट्रात बंडखोर शिवसेना आली आणि बिहारमधलं भाजपाने सरकार आपल्या अलायन्समध्ये घालवलं
ही खरी सुरुवात ही महाराष्ट्रातून झाली
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजीनामा देऊन बिहारमध्ये लालूप्रसाद सोबत त्यांनी काँग्रेससोबत घेऊन अलायन्स केलं
भारतीय जनता पार्टी ज्यावेळेस केंद्रामध्ये आली त्यावेळेस त्यांच्यासोबत अनेक मित्र त्यांच्यासोबत होते मात्र आता सर्व त्यांना सोडून जात आहे
-
पुण्यात राष्ट्रवादीचं राज्यपालांच्या विरोधात आंदोलन, अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांच्याविरुद्धदेखील घोषणाबाजी
पुण्यात राष्ट्रवादीचं राज्यपालांच्या विरोधात आंदोलन, अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांच्याविरुद्धदेखील घोषणाबाजीएकीकडे राज्यमंत्री मंडळाचा विस्तार होत असतानाच दुसरीकडे पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात जोरदार आंदोलनराज्यपाल हे नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यातून महाराष्ट्राचा अपमान करतात, त्यांना राज्यात रहायाचा अधिकार नाहीपुण्यातील गुडलक चौकात आंदोलनमहाराष्ट्र छोडो राज्यपाल म्हणत राष्ट्रवादीचे आंदोलनआज मंत्रिमंडळाचा शपथविधी होत असताना, शिंदे गटातील दोन आमदार अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांनीदेखील मंत्रीपदाची शपथ घेतलीया दोघांच्या शपथविधी विरोधातदेखील राष्ट्रवादी अधिकच आक्रमकसंजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांच्या विरोधात राष्ट्रवादीने जोरदार घोषणाबाजीज्यांच्यावर ईडीची चोकशी लागली होती, ज्यांच्यावर बलात्काराचे आरोप झाले होतेत्यांना मंत्रिमंडळात घेतल असून शिंदे आणि फडणवीस यांचं डोकं ठिकाणावर नाही असा आरोप राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशध्यक्ष विद्या चव्हाण यांनी केला -
धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरे यांना मिळण्यासाठी तरुणाचा जामखेड ते मातोश्री मोटरसायकलचा प्रवास
धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरे यांना मिळावे
अनेक मंदिरात साकडे घालत तरुणांचा जामखेड ते मातोश्री मोटरसायकलचा प्रवास
चार दिवसाच्या प्रवासानंतर तरुण पोचला मातोश्रीवर
भरत पवार असे या तरुणाचे नाव
-
-
मोदींजीनी 2 कोटी लोकांना घर बांधून दिली आहेत, त्यातून जीडीपी वाढलाःदेवेंद्र फडणवीस
– मोदींजीनी 2 कोटी लोकांना घर बांधून दिली आहेत, त्यातून जीडीपी वाढला,
-शौचालय दिलं त्यामुळे जीडीपी वाढला,
– प्रत्येक जिल्ह्यात 75 तलाव बांधून देण्याचा संकल्प पंतप्रधान मोदींनी दिला आहे
– अखंड भारताचं स्वप्न याची देही याची डोळा पाहायचे आहे
– पाकव्याप्त कश्मीर आहे तेही भारताचं होईल, हे माझं स्वप्न आहे
– अखंड भारताचे स्वप्न मोदींनी पूर्ण करणार
– मोदींच्या नेतृत्व सामर्थ्यशील भारत होणार
-
मला कोणतेही खात दिलं तर त्या खात्यामध्ये मला माझी काम करायची इच्छा: आमदार दीपक केसरकर
माझ्या प्रभागला बऱ्याच वर्षांनी मंत्रीपद मिळाले आहे. त्यामुळे माझ्या प्रभागातील लोक खुश झाली आहेत
मी त्यांच्याकडूनच एकनाथ शिंदेंचे आभार मानण्यासाठी इथे आलो
मला कोणतेही खात दिलं तर त्या खात्यामध्ये मला माझी काम करायची इच्छा आहे
खातं महत्त्वाचं नसतं काम करायची इच्छा असणं गरजेचं आहे
महाविकास आघाडीमध्ये जे मंत्री होते त्यांना पहिले या सरकारमध्ये मंत्रीपद मिळावा अशी इच्छा होती त्या अनुषंगाने मंत्रीपद मिळाला आहे त्यामुळे कोणीही नाराज नाही
जे मंत्रीपद मला मिळेल त्या मंत्रीपदाचा कारभार मी चांगल्या पद्धतीने हाताळले
-
केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेनेची मागणी केली मान्य; पुरावे सादर करण्यासाठी दिली चार आठवड्यांची मुदत
केंद्रीय निवडणूक आयोगानं शिवसेनेची मागणी केली मान्य
पुरावे सादर करण्यासाठी दिली चार आठवड्यांची मुदत
काल निवडणूक आयोगाकडे शिवसेनेनं मुदत वाढवून देण्यासंदर्भात केला होता अर्ज
चार आठवड्यात शेवटच्या दिवशी शिवसेना सगळे पुरावे निवडणूक आयोगाला सादर करणार
काल फक्त मुदतवाढीचा केला होता अर्ज
शिवसेनेला दिलासा निवडणूक आयोगानं वेळ दिला वाढवून
काल शिंदे गटानं वकिलांमार्फत पुरावे केलेत सादर
-
Ravindra Chavan: मंत्री पद मिळाल्यानंतर घरी गेल्यानंतर रवींद्र चव्हाण यांचे पत्नीकडून औक्षण
भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांना मंत्री पद मिळाल्याने एकच जल्लोष….घरी पोहचल्यानंतर पत्नीकडून त्यांचे औक्षण करत…नवीन मंत्र्यांचे केले जंगी स्वागत…डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांना कॅबिनेट मंत्री पद मिळाल्याने सध्या डोंबिवली आणि ग्रामीण भागात भाजप कार्यकर्त्यांनकडून जल्लोष -
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांचा पुण्यात मेळावा
– उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्ता मेळावा,
– शिवाय हर घर तिरंगा या अभियानाचा फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ
– बालगंधर्व रंगमंदिरात कार्यक्रमाचे आयोजन
-
मुंबई ही मराठी माणसाची राहूच नाही अशा मानसिकतेतून हे सरकार काम करत; अंबादास दानवेंची सरकारवर टीका
मुंबई ही मराठी माणसाची राहूच नाही अशा मानसिकतेतून हे सरकार काम करत आहे
मागच्या काळात राज्यपाल यांनी भूमिका मांडली होती हे समाजात दुही निर्माण करण्याचा काम
मुंबईत मराठी माणूस राहूच नये अशा केंद्र सरकारच्या धोरणाने राज्य सरकार काम करत असावे कारण मुंबई मराठी माणूस मंत्रिमंडळ नही
-
Manisha Kayande: दिल्लीच्या वाऱ्या करून करून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीचे वारकरी झाले; मनिषा कायंदे
– मंत्रिमंडळ शपथ विधी झाला त्यामध्ये महिलांचा समावेश नाही
-खरंतर 40 दिवस मंत्रिमंडळ नसल्याने महाराष्ट्रला वाऱ्यावर सोडले
-दिल्लीच्या वाऱ्या करून करून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीचे वारकरी झाले
-इकडून आरडाओरडा झाल्या नंतर दिल्लीश्वराची मर्जी संपादन करत मंत्रिमंडळ झालेलं आहे
-त्यात महिला मंत्री नसावी हे पुरोगामी महाराष्ट्रचे लक्षण नाही
-
Priyanka Chaturvedi: राज्यातलं हे सरकार असंविधानिक, मंत्रीपदाची शपथ थोड्या दिवसांची; प्रियंका चतुर्वेदींची टीका
राज्यातलं हे सरकार असंविधानिक, मंत्रीपदाची शपथ थोड्या दिवसांची आहे
सरकार बरखास्त होणार कोर्टाच्या निर्णयानंतर हे सगळे लोक जागेवर येतील
चित्रा वाघ तुमच्या पक्षात तुमचं ऐकत नाहीत
एक महिला आमदार मिळाली नाही
संजय राठोडांच्या विरोधात चित्रा वाघांनी लढाई लढलेली
त्यांनाच मंत्रीमंडळात स्थान
सुप्रीम कोर्ट सगळं बरखास्त करणार आहे
चित्रा वाघांनी बोलून काय होईल
देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला नैतिकता शिकवली
20 तास लागले राजीनामा घ्यायला मात्र आपण तर 20 सेकंदात मंत्रिमंडळात घेतलं
चित्रा वाघ किती दिवस खोट्या लोकांसोबत राहणार आहात
बाळासाहेब ठाकरेंच नाव कोणत्या तोंडाने घेणार
यांनी खोटं बोलून सरकार बनवलं
पहिल्यांदा मुंबईचे मुख्यमंत्री बनले होते
ही शपथ काही दिवसांची आहे..
यांना मुंबईची चीड आहे
गुजरात मॉडेलचे हे लोक आहे
यांना मुंबईच काही देणंघेणं नाही
मुंबईचा विकास होत असताना पाठीत खंजीर खुपसला
ज्यांना स्थान दिलंय ते किती काम करतील हे सांगणं कठीण आहे
हे सरकार असंविधानिक आहे
या लोकांना कुठल्या तरी पक्षात विलीन व्हावं लागेल
सरकार बरखास्त होण्यापासून कोणी वाचवणारं नाही
-
Sachin Ahir: मराठी अस्मिता सांगणाऱ्या लोकांना मराठी आमदार मुंबईतुन एकही भेटला नाही का: सचिन अहिरांची टीका
पाहिल्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये मुंबईतुन मराठी माणूस नाही, या पेक्षा दुर्दैव नाही
मराठी अस्मिता सांगणाऱ्या लोकांना मराठी आमदार मुंबईतुन एकही भेटला नाही का
पुढे विस्तार आहे त्यात तरी निदान संधी मिळावी असे वाटते
-
Devendra Fadnavis: विद्यापीठ हे केवळ शिक्षणाने ओळखली जात नाही, तर समाज शिक्षित झाला पाहिजेःदेवेंद्र फडणवीस
– पहिला रेकॉर्ड केला तेव्हा मी मुख्यमंत्री होतो, दुसरा केला तेव्हा मी उपमुख्यमंत्री आहे, मात्र आता तिसरा रेकॉर्डला मी येणार नाही,
– आपली विद्यपीठ राष्ट्रीय पातळीवरची राहिली पाहिजे
– आज पुणे विद्यापीठात त्याकडे वाटचाल करतंय
– विद्यापीठ हे केवळ शिक्षणाने ओळखली जात नाही, तर समाज शिक्षित झाला पाहिजे,
– आपल्याला शिक्षणाकडून ज्ञानाकडे वाटचाल करायची आहे
-
Nana Patole: महाराष्ट्रातील सरकार गुजरातसाठी तयार झालं कायः नाना पटोले यांचा सवाल
– महाराष्ट्रातील सरकार गुजरातसाठी तयार झाल काय – नाना पटोले यांचा सवाल– शेतकऱ्यांना मदत नाही पण बुलेट ट्रेनसाठी सहा हजार कोटी रुपये-महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदे आणी देवेद्र फडणवीस यांच्या सरकारने सहा हजार कोटी रुपये बुलेट ट्रेनसाठी देऊ केले-दोन लोकांच्या पहिल्याच कॅबनेटमध्ये बुलेट ट्रेनच काम सुरु करण्याचा निर्णय घेतला.-महाराष्ट्रातील सरकार गुजरातसाठी तयार झाल काय.. तसही हे सरकार असवैधनिक आहे, हे सुप्रीम कोर्टात प्रकरण सुरूच-वर्धेच्या सेवाग्राम येथे प्रदेश काँग्रेसच्यावतीने आयोजित आझाद गौरव पदयात्रेच्या शुभारंभाला आले होते, त्यावेळी टीका -
Tanaji Sawant: बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद तानाजी सावंत यांना द्या; छावा संघटनेची मागणी
शिंदे आणि फडणवीस सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळाच्या विस्तारात शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांना कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ
राज्यातील विविध मराठा संघटनांकडून सरकारचे स्वागत
मराठा आरक्षणात तानाजी सावंत यांची कामगिरी चांगली
मराठी क्रांती मोर्चाचे बिजारोपण बीड जिल्ह्यातून झालं, त्यामुळे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद तानाजी सावंत यांना देण्याची मागणी
छावा संघटनेची मागणी
दरम्यान छावा संघटनेकडून बीडच्या महादेव मंदिरात दुग्धाभिषेक घालून साकडे घालण्यात आले.
छावाचे अध्यक्ष अशोक रोमन यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी महादेव मंदिरात साकडे घातले
यावेळी बीड का पालकमंत्री कैसा हो तानाजी सावंत जैसा हो… अशा घोषणांनी मंदिर परिसर दणाणून निघाले होते.
-
गिरीश महाजन यांची मंत्रिपदी वर्णी लागल्याने चाळीसगावात भाजपकडून जल्लोष
जळगांव
गिरीश महाजन यांची मंत्रिपदी वर्णी लागल्याने चाळीसगावात भाजपकडून जल्लोष साजरा करण्यात आला आहे.
-
सरकारही मजबूत आहे,काहीही प्रश्न उपस्थितीत झाला नाहीः देवेंद्र फडणवीस
पुणे देवेंद्र फडणवीस
– मंत्रिमंडळ विस्तार होत नाही म्हणून काही लोक बोलत होते, विस्तार झाला सरकार पडेल असं काही लोक म्हणत होते आता विस्तार झाला
-सरकारही मजबूत आहे,काहीही प्रश्न उपस्थितीत झाला नाहीः देवेंद्र फडणवीस
-महिला मंत्री नाही हा जो आक्षेप आहे तो लवकरच दूर होईल आणि महिलांना योग्य प्रतिनिधित्व आमच्या मंत्रिमंडळात मिळेल
-त्यांनीही पहिल्यांदा विस्तार केला तेव्हा पाच मंत्री घेतले त्यात कुठलीही महिला घेतली नव्हती, त्यांना असं बोलण्याचा काहीही अधिकार नाही
– ज्या पक्षाचे दोन मंत्री भ्रष्टाचार आरोपाखाली जेलमध्ये असतील आणि अनेक नेत्यांवर त्या ठिकाणी खटले सुरू असतील
-आशा पक्षाने आशा प्रकारची यादी टाकण्याचा त्यांना नैतिक अधिकार आहे का? असा राष्ट्रवादीला प्रश्न, पहिल्यांदा त्यांनी आरसा पाहवा आणि नंतर त्यांनी आशा प्रकारचं ट्विट करावं
-संजय राठोड संदर्भात मुख्यमंत्री यांनी भूमीका स्पष्ट केली आहे यावर बोलायच काम नाही
-
शिंदे-फडणवीसांनी मराठा समाजाला टिकणार आरक्षण द्यावेः संभाजीराजे
– अब्दुल सत्तार, संजय राठोड यांच्यावर जे आरोप आहेत मात्र त्यांना मंत्रिमंडळात घेतले असेल तर त्याबाबत मुख्यमंत्रीच त्याचे उत्तर देतील.
– मुख्यमंत्री किंवा त्यांचे प्रवक्ते आहेत ते यावर उत्तर देतील.
-आज महाराष्ट्रात अनेक ज्वलंत विषय आहेत प्रश्न आहेत ते सोडवणं गरजेचं होतं मात्र असो उशीर झाला तरी त्यांना आमच्या शुभेच्छा
– महाविकास आघाडी सरकारने सरकार स्थापन करण्यासाठी 30 दिवस घेतले या सरकारने 35 ते 40 दिवस घेतले त्यामुळे एकूण 60 ते 65 दिवस असेच गेले.
– असो काही हरकत नाही जे जनतेच्या सेवेसाठीचे वाया गेलेले दिवस आहेत ते भरून काढावेत आणि चांगले जोमाने काम करावे.
– यापूर्वीच्या सरकारने मराठा आरक्षणाचा दिलेला शब्द अद्यापही पाळला गेलेला नाही.
– मी आमरण उपोषण केल्यानंतर एकनाथ शिंदेदेखील त्यावेळी आले होते तेव्हा ते मुख्यमंत्री नव्हते मात्र आता ते मुख्यमंत्री आहेत
-त्यांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिले त्या दोघांनी लक्ष घालावे आणि मराठा समाजाला टिकणार आरक्षण द्यावे
-
मंत्री तानाजी सावंत समर्थकांचा माढ्यात घोषणा बाजी करत जल्लोष
मंत्री तानाजी सावंत समर्थकांचा माढ्यात घोषणा बाजी करत जल्लोष
आमदार तानाजीराव सावंत यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेताच समर्थकांनी माढा शहरात जल्लोषमाढ्यातील तानाजी सावंत यांच्या संपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजीसोलापूर जिल्ह्यासाठी हा आनंदाचा मोठा दिवस असल्याच्या कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया -
संजय राठोडांच्या विषयावर याआधीच मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे आणि ते पुरेसे आहे; देवेंद्र फडणवीसांची राठोड प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया
– संजय राठोडांच्या विषयावर याआधीच मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे आणि ते पुरेसे आहे,
– मला अतिशय आनंद आहे, मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे
-सर्व सक्षम मंत्री आहेत, लवकरच पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार
– जे विनाकारण आरोप करत आहेत त्यांना हे उत्तर आहे,
– खातेवाटप लवकरच केलं जाईल, वाट बघा
-
भाजप आमदार अतुल सावे यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी केलं अभिनंदन
भाजप आमदार अतुल सावे यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबीयांनीही केले अभिनंदन
अतुल सावे यांचे दोन्ही मुलं पत्नी आणि सुनेने अतुल सावे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं
-
आता मंत्र्यांनी तातडीनं कामाला लागावं; आमदार जयंत पाटील यांचा सल्ला
मंत्रीमंडळाचा 39 दिवसांनी विस्तार झाला आहे
राज्यातील मातीत गोगलगाईंचा विस्तार झालाय, शेतकरी हवालदिल आहे
आता मंत्र्यांनी तातडीनं कामाला लागावं
महिलांना स्थान न देणं हे बाहेरून दिसू शकतं पण कुणाला स्थान द्यायचं, कुणाला द्यायचं नाही? हे मुख्यमंत्री आणि सहकारी ठरवत असतात
या मंत्रीमंडळनं उत्तम काम करावं विरोधीपक्ष म्हणून आम्ही आमची जबाबदारी पार पाडूच
हा विरोधाभास भाजप करू शकते ज्याचा वर आरोप त्याना सोबत घेऊन बसणे
राठोड आणि सत्तार यांना आधी खाली खेचायचं आणि मग स्वत:चं बाजूला बसवयचं हा विरोधाभास भाजपच करू शकते
बिहारमध्ये जे झालं ते अपेक्षितच होतं शिवसेनेनंही राज्यात तेच केलं आहे
-
सावंतवाडीत दीपक केसरकर समर्थकांनी केला जल्लोष; कार्यकर्त्यांनी फटाके फोडत मिठाई व पेढे वाटले
सावंतवाडीत दीपक केसरकर समर्थकांनी केला जल्लोषशिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी आज कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेताच सावंतवाडीतील त्यांच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाके फोडलेकार्यकर्त्यांनी फटाके फोडत मिठाई व पेढे वाटत दीपक केसरकर आगे बढो हम तुम्हारे साथ है… अशा घोषणादीपक केसरकर यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात कार्यालयाबाहेर जमले होतेयामध्ये महिला समर्थक कार्यकर्त्यांचा मोठा भरणा होता. -
मंत्रिमंडळामध्ये आज महिलांचा सहभाग नाही हे दुर्दैव; महिलांच्या सुरक्षितेबरोबर महाराष्ट्रात कायदा व्यवस्थेची जबाबदारी घ्यावी; रुपाली चाकणकरांची मागणी
मंत्रिमंडळामध्ये आज महिलांचा सहभाग नाही दुर्दैव आहे रुपाली चाकणकर
-स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना एका आदिवासी समाजामधून सन्माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्म ह्या संविधानिक पदाची शपथ घेतात तेव्हा महिला भगिनींना निश्चितच अभिमान वाटतो
– पण दुसरीकडे आज मंत्रिमंडळामध्ये एकही महिला नाहीये तरी महिलांना विविध क्षेत्रांमध्ये निश्चितपणाने स्थान दिलं गेलं पाहिजे आणि याचा विचार या मंत्रिमंडळामध्ये प्राधान्य क्रमाने विचार करणे फार गरजेचं
– महिलांच्या सुरक्षितेची जबाबदारी निश्चितपणाने घ्यावी
-महिलांच्या सुरक्षितेबरोबर महाराष्ट्रात कायदा व्यवस्थेची जबाबदारी घ्यावी आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना घडणार नाही याची जबाबदारी या मंत्री मंडळाने घ्यावी सल्ला महिलांना आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिला आहे
-
सुप्रिया सुळें यांच्याकडून नव्या मंत्री मंडळाचे अभिनंदन; 22 टक्के आमच्याच लोकांना मंत्री केलं, महिलांना स्थान नाही
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून अभिनंदन
आमच्याच 22 टक्के लोकांना मंत्री केलं
भाजपने बंजारा समाज आणि संजय राठोड यांनी माफी मागितली पाहिजे
आमची भूमिका हीच होती राजीनामा नको, संजय राठोड यांनी पिडीतग्रस्त कुटुंबीयांची माफी मागितली पाहिजे
पूजाला न्याय दिला पाहिजे
शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात महिलांना संधी दिली नाही
-
भाजपचे आमदार अतुल सावेंना मंत्री मंडळात स्थान मिळाल्याने औरंगाबादमध्ये जल्लोष
औरंगाबाद
भाजपचे आमदार अतुल सावे यांचा शिंदे आणि भाजपाच्या मंत्री मंडळात समावेश झाल्यानंतर औरंगाबादमध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष
भाजपा कार्यकर्त्यांनी गुलामंडी चौकात जोरदार जल्लोष केला.
ढोल ताशाच्या तालावर नाचत हा आनंद साजरा केला.
-
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर डोंबिवलीत जल्लोष; रवींद्र चव्हाण यांना कॅबिनेट मंत्री पद मिळाल्याने दिवाळी साजरी
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर डोंबिवलीत जल्लोष…डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांना कॅबिनेट मंत्री पद मिळाल्याने दिवाळी साजरीमनसेचे आमदार राजू पाटील यांना मंत्री पद मिळाल्यास दसरा साजरा करूभाजप कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी यांची माहितीभाजपा कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरणकार्यकर्त्यांचा जल्लोष आणि केले पेढे वाटप -
आमदार संजय राठोड यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच बंजारा समाजाकडून आनंद साजरा
वाशिम :आमदार संजय राठोड यांनी मंत्रीपदाची शपथ घेताच बंजारा समाजाकडून आनंद साजरा
काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवी येथील महंत शेखर महाराज यांनी संत सेवालाल महाराज,संत रामराव महाराज,जगदंबा मातेला भोग (नैवैद्य) चढविला
मंदिर परिसरात समाज बांधवांनी फटाके फोडून आनंद साजरा केला
बंजारा समाज व पोहरादेवी संस्थेच्या विकासासाठी संजय राठोड यांच्या मंत्री पदाचा फायदा होणार असल्याचे महंत जितेंद्र महाराज यांनी सांगितले
-
Shambhuraje Desai : आमदार शंभूराज देसाई यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या मासाहेब विजयाताई देसाई यांना अश्रू अनावर.
आमदार शंभूराज देसाई यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या मासाहेब विजयाताई देसाई यांना अश्रू अनावर….
शिंदे गट आणि भाजपचा शपथविधी सोहळा पार पडला यामध्ये पाटणचे आमदार शंभूराजे देसाई यांनी देखील दुसऱ्यांदा शपथ घेतली यावेळी त्यांच्या कुटुंबातील मासाहेब भाऊ रविराज देसाई यांनी देखील टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला यावेळी मासाहेब विजयादेवी देसाई यांना अश्रू अनावर झाले
-
Ravindra Chavan : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर डोंबिवलीत जल्लोष
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर डोंबिवलीत जल्लोष…
डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांना कॅबिनेट मंत्री पद मिळाल्याने दिवाळी साजरी…
मनसेचे आमदार राजू पाटील यांना मंत्री पद मिळाल्यास दसरा साजरा करू…
भाजप कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संदीप माळी यांची माहिती…
भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण…
कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि केले पेढे वाटप….
-
Dada Bhuse : संजय राठोड आणि दादा भूसे हे दोघे एकाच गाडीत बसून निघाले
संजय राठोड आणि दादा भूसे हे दोघे एकाच गाडीत बसून निघाले…
– संजय राठोड यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्यावर भाजपच्या चितेरा वाघ यांनी टिका केलीये…
– या प्रकरणी त्यांच्याशी बातचित करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी या प्रकरणी भाष्य करणं टाळलंय…
– त्यांच्याशी बातचित करण्याचा प्रयत्न केलाय प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांनी…
-
मंत्री मंडळात काम करण्याची संधी मिळाल्याने, कोकणचा विकास करणार – उदय सामंत
मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळ विस्ताराची नावे जाहीर करण्यात होते. म्हणून काहीसा या विस्ताराला वेळ झाला. विस्तार नंतर कोणाची नाराजी नाही. रिफायनरी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार, कोकणाच्या विकासासाठी काम करणार, संजय राठोड हे शिवसेना आणि भाजप सरकारचे मंत्री आहेत. चित्रा वाघ या भाजपच्या नेत्या आहेत. या संदर्भात भाजप योग्य ती भूमिका घेईल. राणेना मंत्री पद मिळालं नाही हा भाजपचा विषय आहे. पण कोकणात राणे सोबत काम करणार, मंत्रिमंडळाचा पुढील विस्तार हा गणपती नंतर नक्की होईल असं उदय सामंत यांनी सांगितलं.
-
Girish Mahajan : गिरीश महाजन यांच्या मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर जामनेर शहरात कार्यकर्त्यांचा जल्लोष
गिरीश महाजन यांच्या मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर जामनेर शहरात कार्यकर्त्यांचा जल्लोष
भाजप कार्यकर्ते जामनेर शहरात पाहत होते tv9 मराठी… स्क्रीनवर शपथविधी सोहळा
-
Sanajay Rathod : संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने शिवसैनिक आक्रमक
संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने शिवसैनिक आक्रमक
कोल्हापुरात शिवसैनिकांनी निदर्शनं
कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांची निदर्शनं
शिंदे फडणवीस सरकार विरोधात घोषणाबाजी
-
शिंदे सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात गुलाबराव पाटील यांना मंत्रिपदाची संधी मिळाली
जळगाव शिंदे सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात गुलाबराव पाटील यांना मंत्रिपदाची संधी मिळाली, गुलाबराव पाटील यांनी मुंबईत मंत्रिपदाची शपथ घेतली त्यानंतर त्यांच्या घरी आनंदाचं वातावरण आहे, त्यांच्या कुटुंबियांनी एकमेकांना पेढे भरवुन आनंद साजरा केला, त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अनिल केराळे यांनी
-
Uday Samant : उदय सामंत यांच्या शहरातील जयस्तंभ येथील कार्यालयाबाहेर जल्लोष
रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच रत्नागिरीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. एकमेकांना पेढे भरवत, फटाके फोडत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. उदय सामंत यांच्या शहरातील जयस्तंभ येथील कार्यालयाबाहेर हा जल्लोष करण्यात आहे.
-
Sudhir Mundgandiwar : भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाचा चंद्रपुरात जल्लोष
चंद्रपूर:– भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाचा चंद्रपुरात जल्लोष,
भरपावसात चंद्रपूरच्या भाजप कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात नाचत व्यक्त केला आनंद,
पालकमंत्री म्हणून मागील युती सरकारच्या काळात सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचा कार्यकर्त्यांनी केला गौरवपूर्ण उल्लेख,
गेले अडीच वर्ष चंद्रपूर जिल्ह्याची विकास प्रक्रिया खंडित झाली असल्याचे कार्यकर्त्यांनी आणून दिले लक्षात,
आता पुन्हा मूलभूत विकासासह जिल्ह्यात रखडलेले मोठे विकास प्रकल्प वेगाने पूर्ण होतील याकडे वेधले लक्ष,
चंद्रपूर शहरातील पाच प्रमुख मंडळांमध्ये भाजपच्या वतीने जल्लोष कार्यक्रमाचे केले आयोजन,
चंद्रपूर जिल्ह्याला विकासप्रक्रियेत वेगाने पुढे नेण्यासाठी मुनगंटीवार यांचा समावेश लाभदायक होणार असल्याची व्यक्त झाली भावना
-
Maharashtra Cabinet Expansion 2022 : अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे आणि अतुल सावे मंत्रिमंडळात सामील, औरंगाबाद जिल्ह्याला बंपर लॉटरी
मंत्रिमंडळ विस्तारत औरंगाबाद जिल्ह्याची बंपर लॉटरी
औरंगाबाद जिल्ह्याला मिळाले तब्बल तीन कॅबिनेट मंत्री
अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे आणि अतुल सावे मंत्रिमंडळात सामील
तर भागवत कराड आणि रावसाहेब दानवे केंद्रात मंत्री
राज्य आणि केंद्र मिळून औरंगाबाद जिल्ह्यात आता तब्बल 5 मंत्री
-
Radhakrushan Vikhe Patil : राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्री पदाची शपथ घेताच अहमदनगरला फटाकडे फोडून जल्लोष साजरा
अहमदनगर
राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्री पदाची शपथ घेताच अहमदनगरला फटाकडे फोडून जल्लोष साजरा
खासदार सुजय विखे यांच्या संपर्क कार्यालया समोर एकमेकांना पेढे भरवत केला जल्लोष
तर आनंद साजरा करत जोरदार घोषणाबाजी
-
Uday Samant | ‘मिळालेल्या संधीचं सोनं करु’;मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सामंतांची प्रतिक्रिया
Uday Samant | ‘मिळालेल्या संधीचं सोनं करु’;मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सामंतांची प्रतिक्रिया
-
Cabinet Expansion | भाजप-शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरु
Cabinet Expansion | भाजप-शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरु
-
Sudhir Mungantiwar Oath | सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
Sudhir Mungantiwar Oath | सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
-
Radhakrishna Vikhe Patil Oath | राधाकृष्ण विखे पाटलांचा शपथविधी
Radhakrishna Vikhe Patil Oath | राधाकृष्ण विखे पाटलांचा शपथविधी
-
Eknath Shinde : आता विस्तार झाला सर्व मंत्री पदभार घेऊन जनतेची कामे करतील – एकनाथ शिंदे
आता विस्तार झाला सर्व मंत्री पदभार घेऊन जनतेची कामे करतील. हे शिवसेना भाजप युतीचे सरकार आहे. आता लोकाभिमुक कामे हे सरकार करणार आहे.
-
Sanjay Rathod : मंत्रीमंडळ विस्तारावरती चित्रा वाघ : चित्रा वाघ
पुजा चव्हाण च्या मृत्युला कारणीभूत असणार्या माजी मंत्री संजय राठोड ला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे
संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे माझा न्याय देवतेवर विश्वास लडेंगे….जितेंगे ? @CMOMaharashtra pic.twitter.com/epJCMpvHLB
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) August 9, 2022
-
Kishori Pednekar | ‘आता चिवा ताई कुठे आहेत ते बघावं लागेल’
Kishori Pednekar | ‘आता चिवा ताई कुठे आहेत ते बघावं लागेल’
-
Mangal Prabhat Lodha Oath | मंगलप्रभात लोढा यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
Mangal Prabhat Lodha Oath | मंगलप्रभात लोढा यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
-
Ambadas danve : विरोधी पक्षनेते आंबदास दानवे यांची मंत्रीमंडळावर घणाघाती टीका.
विरोधी पक्षनेते आंबदास दानवे यांची मंत्रीमंडळावर घणाघाती टीका. हे सरकार गद्दार आणि भ्रष्टाचारी लोकांचं आहे. विजयकुमार गावीत, संजय राठोड, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत अशा असंवेनशील लोकांचा मंत्रिमंडळात समावेश आहे. यापुढे या भ्रष्टाचारी लोकांच्या विरोधात संघर्ष करणार असल्याची प्रतिक्रिया आंबदास दानवे यांनी दिली.
-
Tanaji Sawant : आमदार तानाजी सावंत यांच्या पंढरपुरातील घरी समर्थकांचा जल्लोष
आमदार तानाजी सावंत यांच्या पंढरपुरातील घरी समर्थकांचा जल्लोष…… तानाजी सावंत यांची मंत्रीमंडळात वर्णी लागताच समर्थकांनी गुलालाचि उधळण करत केली फटाक्यांची आतषबाजी… सोलापूर, पंढरपूर आणि भूम तालुक्यातील कार्यकर्त्यांनी साजरा केला जल्लोष…
-
Trupti Desai : मंत्रिमंडळ विस्तारात एकही महिला मंत्री नाही, हा महाराष्ट्रातील समस्त महिलांचा अपमान
तृप्ती देसाई –
मंत्रिमंडळ विस्तारात एकही महिला मंत्री नाही, हा महाराष्ट्रातील समस्त महिलांचा अपमान, ज्या संजय राठोड यांचा राजीनामा भारतीय जनता पार्टीने घेतला त्यांनीच आज पहिल्या रांगेत बसवून मंत्रिमंडळात सामावून घेतले अशी प्रतिकिया तृप्ती देसाई यांनी दिली.
-
Chitra Wagh : मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे – चित्रा वाघ
माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे – चित्रा वाघ
पुजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास लडेंगे….जितेंगे असा विश्वास पुन्हा चित्रा किशोर वाघ यांनी बोलून दाखवला.
-
Supriya Sule : राज्यात मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या शपथविधीत १८ मंत्र्यांनी शपथ घेतली परंतू यात महिलांना प्रतिनिधीत्त्व देण्यात आले नाही – सुप्रिया सुळे
स्वतः पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी हे देशाच्या प्रगतीसाठी स्त्री-सक्षमीकरण आवश्यक असल्याचे सांगतात. त्यासाठी त्या केवळ ‘होम मेकर’ असू नयेत तर त्या ‘नेशन बिल्डर’ असाव्यात असं ते सांगतात. पण राज्यात मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या शपथविधीत १८ मंत्र्यांनी शपथ घेतली परंतू यात महिलांना प्रतिनिधीत्त्व देण्यात आले नाही. मंत्रीमंडळात महिलांना योग्य ते प्रतिनिधीत्व मिळेल अशी अपेक्षा होती परंतु एकाही महिलेला संधी मिळाली नाही. हे अतिशय खेदजनक आहे. राज्याच्या स्त्री-शक्तीवर हा अन्याय आहे.
-
Suresh Khade : मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्या नंतर मिरजेत भाजपाचा जल्लोश
मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्या नंतर मिरजेत भाजपाचा जलोश,,,
फटाक्यांची आतिषबाजी, घोषणाबाजी,,,
मिठाई आणि साखर वाटून व्यक्त केला आनंद
-
Gulabrao Patil : गुलाबराव पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या गावात कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष..
गुलाबराव पाटलांनी मुंबईत मंत्रिपदाची शपथ घेताच त्यांच्या गावात दिवाळी
गुलाबराव पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या गावात कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष…
पाळधी गावात गुलाबराव पाटील समर्थकांचा एकच जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी, ढोल ताशांचा गजर
कार्यकर्त्यांसोबत गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रताप पाटील यांनी धरला ठेका
गुलाबराव पाटील यांच्या रूपाने आता जळगाव जिल्ह्याला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल, कोणत्याही प्रकारच खात मिळालं तरी ते न्याय देतील, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केलीये
-
Maharashtra ministers : आमदार शपथ घेत असतानाचे फोटो
Shiv Sena MLAs Gulabrao Patil and Dadaji Dagadu Bhuse take oath as Maharashtra ministers at Raj Bhavan in Mumbai pic.twitter.com/jkpezoOE1d
— ANI (@ANI) August 9, 2022
-
Bachhu Kadu : आमदार बच्चू कडू विधान भवनमध्ये प्रहारच्या पक्ष कार्यालयात दाखल
आमदार बच्चू कडू विधान भवनमध्ये प्रहारच्या पक्ष कार्यालयात दाखल
मुंबई-शिंदे गटातील प्रहारचे आमदार बच्चू कडू विधान भवनमध्ये प्रहारच्या पक्ष कार्यालयात दाखल झाले आहेत. शपथविधी सोहळ्याला उपस्थित न राहता, विधान भवनात येऊन आपल्या भागातील सर्व सामान्य लोकांच्या कामासाठीचे पत्र करत आहेत. तसेच तयार कामाचा पाठपुरावा करत आहेत
-
Abdul Sattar : अब्दुल सत्तार औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार
अब्दुल सत्तार
औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार मविआ सरकारमध्ये महसूल आणि ग्रामविकास खात्याचे राज्यमंत्री कॉंग्रेसच्या मंत्रीमंडळात काही महीने कॅबिनेट मंत्री 2001 साली विधानपरिषदेवर आमदार
-
Shambhuraj Desai : शंभूराज देसाई साताऱ्याच्या पाटण विधानसभा मतदार संघातून तीन वेळा आमदार
शंभूराज देसाई
साताऱ्याच्या पाटण विधानसभा मतदार संघातून तीन वेळा आमदार मविआ सरकारमध्ये गृहराज्यमंत्री म्हणून काम पाच वेळा विधानसभा तालीका अध्यक्ष म्हणून काम उत्कृष्ट संसदपट्टू म्हणून गौरव बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे अध्यक्ष 1995 ते 1999 युती सरकारमध्ये सहकार परिषेदेचे अध्यक्ष
-
Mangal Prabhat Lodha : मंगलप्रभात लोढा देशातील सर्वात श्रीमंत बांधकाम व्यावसायिक म्हणून ओळख
मंगलप्रभात लोढा
1995 पासून सलग पाच वेळा मुंबईच्या मलबार हिल मतदारसंघातून आमदार स्वातंत्र्य सैनिक आणि निवृत्त न्यायाधीश गुमान माल लोढा यांचे सुपूत्र मुंबई भाजपचे अध्यक्ष अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते म्हणून काम लोढा ग्रुपचे सर्वेसर्वा देशातील सर्वात श्रीमंत बांधकाम व्यावसायिक म्हणून ओळख
-
भाजपच्या चार मंत्र्यांनी शपथ घेतली
राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्री पदाची शपथ घेतली,
सुधीर मुनगुंटीवार यांनी मंत्री पदाची शपथ घेतली
चंद्रकांत पाटील यांनी मंत्री पदाची शपथ घेतली
विजयकुमार गावित यांनी मंत्री पदाची शपथ घेतली
गिरीश महाजन यांनी मंत्री पदाची शपथ घेतली
Chandrakant Patil and Vijay Kumar Gavit are among the nine BJP leaders who are taking oath as ministers in Maharashtra Cabinet at Raj Bhavan in Mumbai pic.twitter.com/DCyzwjEVVa
— ANI (@ANI) August 9, 2022
-
भाजपचे नेते सुरुवातीला शपथ घेत आहेत
Maharashtra Cabinet expansion | Governor Bhagat Singh Koshyari administers the oath of office to 18 MLAs as ministers pic.twitter.com/2eDIBVxWj3
— ANI (@ANI) August 9, 2022
-
Maharashtra Cabinet expansion : शपथविधीला सुरुवात
Maharashtra Cabinet expansion | 18 ministers to be sworn in today at Raj Bhavan in Mumbai pic.twitter.com/1vUX6e2yoy
— ANI (@ANI) August 9, 2022
-
शपथविधीला सुरुवात, भाजप आमदारांचा पहिला शपथविधी
राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्री पदाची शपथ घेतली,
सुधीर मुनगुंटीवार यांनी मंत्री पदाची शपथ घेतली
-
Cabinet expansion : भाजपसोबत कसं काम करायचं हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं : संजय शिरसाट
शिंदे साहेबांनी बैठीकीत सर्व आमदारांना भाजप सेना सोबत कसे काम करायचे ते सांगीतले आहे. नाराज होण्याचा प्रश्न नाही शिंदे साहेब जो निर्णय घेतले तो आम्हाला मान्य आहेत. आज कोणीही नाराज नाही
-
Cabinet expansion : मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्र्यांची चर्चा
बेठकीनंतर राजभवनात एकनाथ शिंदे, फडणवीस हे चर्चा करीत आहेत
Cabinet expansion | Maharashtra CM Eknath Shinde and Dy CM Devendra Fadnavis at Raj Bhavan in Mumbai pic.twitter.com/cC9vXBvRzx
— ANI (@ANI) August 9, 2022
-
Maharashtra Cabinet expansion: आज अठरा आमदार शपथ घेणार
राजभवनात अनेक मान्यवर दाखल झाले आहेत. आज अठरा आमदारांना थोड्याच वेळात शपथ देण्यात येणार आहे.
Maharashtra Cabinet expansion: 18 ministers to be sworn in today at Raj Bhavan in Mumbai
CM Eknath Shinde, Dy CM Devendra Fadnavis and LoP Ajit Pawar present pic.twitter.com/DWxCyYppf4
— ANI (@ANI) August 9, 2022
-
Narayan Rane : केंद्रीयमंत्री नारायण राणे मंत्रिमंडळाच्या शपथविधीला उपस्थित राहणार नाहीत
केंद्रीयमंत्री नारायण राणे मंत्रिमंडळाच्या शपथविधीला उपस्थित राहणार नाहीत. नारायण राणे यांच्या वहिणींचे काल देहावसान झाल्यामुळे ते कणकवली येथील घरी आहेत. यामुळे निमंत्रण असून ही राणे उपस्थित राहणार नाहीत. दुपारनंतर राणे मुबंईला पोचतील.
-
Sanjay Shirsat : संजय शिरसाट नाराज, मंत्रिमंडळ विस्तारात स्थान नाही
संजय शिरसाट नाराज, मंत्रिमंडळ विस्तारात स्थान नाही, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत काय घडलं? मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानंतर अनेक आमदार नाराज झाल्याची माहिती मिळाली आहे.
-
Maharashtra cabinet : दोन्ही पक्षाचे नऊ आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार
#MaharashtraCabinet | Nine BJP leaders and nine Shiv Sena leaders to take oath today in the state cabinet expansion, in Mumbai pic.twitter.com/XG09h7cMQ8
— ANI (@ANI) August 9, 2022
-
Eknath Shinde : मुख्यमंत्री राजभवनात दाखल झाले आहेत
मुख्यमंत्री राजभवनात दाखल झाले आहेत
Mumbai | Maharashtra CM Eknath Shinde along with his MLAs leaves for Raj Bhavan from Sahyadri Guest House pic.twitter.com/uLkoarwIXx
— ANI (@ANI) August 9, 2022
-
Shinde Group शिंदे गटाचे आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार
संदीपान भुमरे दीपक केसरकर अब्दुल सत्तार दादा भुसे तानाजी सावंत संजय राठोड शंभुराज देसाई उदय सामंत गुलाबराव पाटील
-
Radhakrishna Vikhe Patil | मंत्रिमंडळ विस्तारावर राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया
Radhakrishna Vikhe Patil | मंत्रिमंडळ विस्तारावर राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया
-
Cabinet Expansion | शिंदे गटातील संभाव्य मंत्र्यांची बैठकीत नाव स्पष्ट करणार
Cabinet Expansion | शिंदे गटातील संभाव्य मंत्र्यांची बैठकीत नाव स्पष्ट करणार
-
Rajbhavan : भाजपाचे 9 शिंदे गटाचे 9 आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार, दरबार हॉलमध्ये नेते पोहोचायला सुरुवात
दादा भुसे, सुरेश खाडे, गिरीश महाजन, संदीपान भुमरे, उदय सामंत, चंद्रकात पाटिल, राधाकृष्ण विखे पाटिल,रविंद्र चव्हाण, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, शंभुराजे देसाई , दीपक केसरकर, सुधीर मुनगंटीवार, संजय राठोड, विजय कुमार गावित, गुलाबराव पाटिल,अतुल सावें
-
Rajbhavan : दरबालमध्ये दाखल झालेले नेते
दरबालमध्ये दाखल झालेले नेते
सुधीर मुनगंटीवार राज्यमंत्री कपिल पाटील खासदार मनोज कोटक राज्यमंत्री रावसाहेब दानवे चंद्रकांत पाटील किरीट सोमय्या विनोद तावडे गिरीश महाजन संदीपान भुमरे गिरीश महाजन तानाजी सावंत चंद्रकांत पाटील राधाकृष्ण विखे उदय सामंत दादा भुसे दीपक केसरकर अतुल सावे अब्दुल सत्तार दादा। हुसे मंगल प्रभात लोढा शंभुराज देसाई
-
Eknath Shinde : मुख्यमंत्री आत्ता 10 मिनिटांत नावे जाहीर करण्याची शक्यता आहे
मुख्यमंत्री आत्ता 10 मिनिटांत नावे जाहीर करण्याची शक्यता आहे. अद्याप सह्याद्री अतिथीगृहात बैठक सुरु असल्याचे माहिती मिळाली आहे.
-
Maharashtra : मंत्री मंडळाचा विस्तार थोड्याच वेळात होणार
Maharashtra : मंत्री मंडळाचा विस्तार थोड्याच वेळात होणार
Maharashtra | MLAs of Eknath Shinde camp arrive at Sahyadri Guest House in Mumbai where a meeting is taking place this morning.
Maharashtra cabinet expansion is likely to take place today. pic.twitter.com/mbwntOVXPj
— ANI (@ANI) August 9, 2022
-
Cabinet Expansion | राजभवनात थोड्याच वेळात शपथविधी सोहळा होणार
Cabinet Expansion | राजभवनात थोड्याच वेळात शपथविधी सोहळा होणार
-
Shinde Group : शिंदे गटाकडून हे आमदार शपथ घेणार ?
शिंदे गट कडून शपथ घेणार
गुलाबराव पाटील संदिपन भूमरे दीपक केसरकर तानाजी सावंत शंभुराजे देसाई दादा भुसे उदय सामंत भरत गोगावले राजेंद्र पाटील यड्रावकर
-
Bhagawat Karad : महाविकास आघाडी सरकार सारखी ही केबिन कॅबिनेट नसेल – भागवत कराड
आज मंत्रिमंडळ विस्तार आहे, त्यासाठी आलोय. कोणी नाराज नाही. महाविकास आघाडी सरकार सारखी ही केबिन कॅबिनेट नसेल मित्र नाराज नाहीत अशी प्रतिक्रिया भागवत कराड यांनी दिली
-
Vikhe patil : पक्षाने दिलेली जबाबदारी पुर्ण करू – राधाकृष्ण विखे पाटील
अमित शहा साहेब, फडणवीसांचे मी आभार मानतो. राज्यात मागच्या काही वर्षात अडचणी निर्माण झाल्या होत्या. येत्या काळात पक्षाने दिलेली जबाबदारी आम्ही पुर्ण करु आम्ही चांगली कामगिरी करू असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
-
Sujay Vikhe patil : साहेबांनी आत्तापर्यंत सक्षम पद्धतीने काम केलं आहे – सुजय विखे पाटील
साहेबांनी आत्तापर्यंत सक्षम पद्धतीने काम केलं आहे – सुजय विखे पाटील
आनंदचं आहे, साहेबांनी आत्तापर्यंत सक्षम पद्धतीने काम केलं आहे. राजकीय आवाहन म्हणजे सध्या महाराष्ट्रात अतिवृष्टी सुरु आहे. सध्या राज्यात अधिक कामाचा व्याप आहे. मला सरकारवरती पुर्ण विश्वास आहे अस सुजय विखे पाटील यांनी सांगितले आहे.
-
Shivsena : शिवसेनेचे खासदार शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार, दिल्लीतून पहाटेच मुंबईसाठी रवाना
शिवसेनेचे खासदार शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार
दिल्लीतून खासदार पहाटेच मुंबईसाठी रवाना
शपथविधी सोहळ्याला हजेरी लावणार
-
Shahaji Bapu Patil : मला मुख्यमंत्र्यांनी बैठकीला बोलावलं आहे – शहाजी बापू पाटील
मला मुख्यमंत्र्यांनी बैठकीला बोलावलं आहे – शहाजी बापू पाटील
मला कॉल आला होता. त्यांनी मला बैठकीला बोलावलं आहे. गुवाहाटीत आम्ही शिंदे साहेबांना सगळे निर्णय घ्यायची परवानगी दिली आहे. मला मंत्रीमंडळात संधी मिळावी अशी माझी कोणतीही भूमिका नाही. मला माझ्या मंत्रीमंडळात अधिक काम आहे. आता उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एक महिना लागला होता. उद्धव ठाकरे यांनी याला शुभेच्छा द्याव्या.
-
Sachin Ahir : मंत्रीमंडळाचा विस्तार होत असल्याने शुभेच्छा, उदय सामंत यांच्यावरती सचिन अहिर यांची टीका
मंत्रीमंडळाचा विस्तार होत असल्याने शुभेच्छा, उदय सामंत यांच्यावरती सचिन अहिर यांची टीका
लोकशाहीत काही अशक्य नसत, सत्ता येत असते जात असते. मंत्रीमंडळाचा विस्तार होतोय चांगली गोष्ट, शुभेच्छा देतो उदय सामंत कोणाला चॅलेंज देता, सभा घ्यायची तर घ्या. ज्यांची नाव घेतलीत त्यांच्याशी एकेकाळी घरचे संबंध होते हे लक्षात असू द्या असा टोला सचिन अहिर यांनी लगावला.
-
Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील हे राजभवनाकडे निघाले, आज मंत्रीपद मिळण्याची शक्यता
अंजली पाटील, चंद्रकांत पाटील हे राजभवनाकडे निघाले आहेत. आज दादांचा मंत्रीमंडळात समावेश असणार आहे.
-
Tanaji Sawant : आमदार तानाजी सावंत यांना मिळणार कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता
– भूम विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांना मंत्रीपदाबाबत कॉल आल्याची माहिती
– आमदार तानाजी सावंत यांना मिळणार कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता
– यापुर्वी शिवसेना-भाजप युतीत भुषवले होते मंत्रीपद
– मात्र मविआ सरकारमध्ये मंत्रीपद न मिळाल्याने तानाजी सावंत नाराज होते
– शिंदे गटात सक्रिय नेते आणि एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून परिचीत
-
Suhas Kande : मला मंत्रीपद नको, मला फक्त पक्षाची सेवा करायची आहे – आमदार सुहास कांदे
मला मंत्रीपद नको, मला फक्त पक्षाची सेवा करायची आहे.तसेच पक्षात कोणीही नाराज नसल्याचे आमदार सुहास कांदे यांनी सांगितले.
-
Abdul Sattar : मला मुख्यमंत्र्यांनी बैठकीला बोलावलं आहे – अब्दुल सत्तार
बातम्या दोन दिवसांपासून पाहतोय, ज्या पद्धतीने मांडणी करण्यात आली ते अत्यंत चुकीच आहे. दोन लोकांनी परीक्षा चार लोकांची नाव देत आहे. टीईटीचा कोणताही फायदा माझ्या मुलांनी घेतला नाही. अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील. मला मुख्यमंत्र्यांनी बैठकीला बोलावलं आहे.
-
Uday Samant : मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर कुणाला मंत्रीपद मिळणार याची माहिती देता – उदय सामंत
मी मुख्यमंत्री यांना भेटायला आलो आहे. भेटून आल्यानंतर सांगतो कोण कोण शपथ घेणार ते, माझे नाव मंत्रीमंडळात आहे की नाही ते अजून माहीत नाही, 9 वाजता आमदारांची बैठक आहे त्यामधे नावे ठरतील अशी माहिती उदय सामंत यांनी दिली
-
सावंत कॅबिनेट मंत्री होणार?
भूम विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांना मंत्रीपदाबाबत कॉल आल्याची माहिती
आमदार तानाजी सावंत यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची शक्यता
यापुर्वी शिवसेना-भाजप युतीत भुषवले होते मंत्रीपद
मात्र मविआ सरकारमध्ये मंत्रीपद न मिळाल्याने तानाजी सावंत नाराज होते
शिंदे गटात सक्रिय नेते आणि एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून परिचीत
-
एकनाथ शिंदे गटातील सर्व आमदारांची बैठक
आज महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी एकनाथ शिंदे गटाच्या सर्व 50 आमदारांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार
या बैठकीत मंत्र्यांची नावे निश्चित होणार आहे
सोबतच अब्दुल सत्तार यांना मंत्री करायचे की नाही, त्यावरही चर्चा होईल
ऊरलेल्या मंत्र्यांचा शपथ विधी कधी होणार यावरही होणार चर्चा
-
Maharashtra Cabinet Expansion | शपथविधी कार्यक्रमासाठी ‘या’ नेत्यांना निमंत्रण
Maharashtra Cabinet Expansion | शपथविधी कार्यक्रमासाठी ‘या’ नेत्यांना निमंत्रण
-
Maharashtra : फडणवीसांच्या घरी भाजपच्या नेत्यांची बैठक
Maharashtra | BJP leaders leave from the residence of Deputy CM Devendra Fadnavis in Mumbai after the party meeting ends.
Maharashtra cabinet expansion is likely to take place today, 9th August at Maharashtra Raj Bhavan. pic.twitter.com/7rxWejbR83
— ANI (@ANI) August 8, 2022
-
Ajit Pawar : ज्यावेळी मंत्रीमंडळ विस्तार होतो, त्यावेळी नाराजी नाट्य होतचं – अजित पवार
गांधीची भरत छोडो नारा दिला होता.या जागेवरून सुरूवात केली होती म्हणून ह्या जागेला महत्त्व आहे. म्हणून आभिवादन करायला आलो आहे. 11 वाजता विस्तार आहे फडणवीस यांनी मला फोन केला निमंत्रण आले होते. मी जाणार आहे. विस्तार होतो तेव्हा नाराजी होते. फुलफ्रेम मंत्रीमंडळ नाही आहे. अधिवेशन पार पाडण्यासाठी छोटाखाणी विस्तार आहे.
-
Ajit Pawar : अजित पवारांना आजच्या शपथविधी सोहळ्याच आमंत्रण
मला आजच्या दिवशी त्यांच्याबाबत काय बोलणार नाही
काल मला फोन करुन मंत्रीमंडळ विस्ताराचं आमंत्रण देण्यात आलं आहे
प्रत्येकाला संधी मिळावी अशी इच्छा असते
किती लोकांचं मंत्रीमंडळ असेल हे मला माहित नाही
आज मंत्रीमंडळाची बैठक घेतील
अधिवेशन झाल्यानंतर उरलेले मंत्रीमंडळ विस्तार होणारळ
-
Ajit Pawar : शपथ विधी सोहळ्याचं अजित पवारांना निमंत्रण
या शपथविधी सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नारायण राणे, रावसाहेब दानवे, भागवत कराड यांना निमंत्रण आहे तर विरोधी पक्षनेते अजित पवार, भारती पवार यांना देखील निमंत्रण देण्यात आले आहे.
-
Eknath Shinde : मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता असणाऱ्या आमदारांची नावे
चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, सुरेश खाडे, विजय गावित, अतुल सावे, गणेश नाईक आणि चंद्रशेखर बावनकुळे या भाजप नेत्यांना शिंदे मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. तर गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, संजय शिरसाठ आणि संदिपान भुमरे यांचाही मंत्रिमंडळात समावेश असण्याची शक्यता आहे.
-
Here are the Ministerial probables : भाजपच्या या आमदारांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता
सुधीर मुनगंटीवार- बल्लारपूरचे आमदार व माजी वित्त, नियोजन व वने मंत्री
गिरीश महाजन- जामनेरचे आमदार व माजी जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री
राधाकृष्ण विखे पाटील- शिर्डीचे आमदार, माजी विरोधी पक्षनेते व माजी मंत्री
चंद्रकांत पाटील- महाराष्ट्र भाजप अध्यक्ष, कोथरूडचे आमदार आणि माजी महसूल आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री
दादाजी भुसे- मालेगाव बाह्य आमदार व माजी मंत्री
उदय सामंत- रत्नागिरीचे आमदार व माजी मंत्री
संजय शिरसाट- औरंगाबाद पश्चिमचे आ
गुलाबराव पाटील- जळगाव ग्रामीणचे आमदार व माजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री
सुरेश खाडे- मिरजचे आमदार व माजी सामाजिक न्याय मंत्री
अतुल सावे- औरंगाबाद पूर्व आमदार व माजी राज्यमंत्री
-
Breaking | मुनगंटीवार, महाजन, शेलार, सुरेश खाडे फडणवीसांच्या निवासस्थानी
Breaking | मुनगंटीवार, महाजन, शेलार, सुरेश खाडे फडणवीसांच्या निवासस्थानी
-
Ashish Jaiswal | शिंदे गटाचे आमदार आशिष जैस्वाल सागर बंगल्यावर दाखल
Ashish Jaiswal | शिंदे गटाचे आमदार आशिष जैस्वाल सागर बंगल्यावर दाखल
-
Radhakrishna Vikhe Patil | मंत्रिमंडळाची यादी उद्या जाहीर होईल : राधाकृष्ण विखे पाटील
मंत्रिमंडळाची यादी उद्या जाहीर होईल : राधाकृष्ण विखे पाटील
-
Sudhir Mungantiwar | उद्या मी देखील शपथ घेऊ शकतो, विधानसभा शपथविधीबाबत सुधीर मुनगंटीवार म्हणतात
Sudhir Mungantiwar | उद्या मी देखील शपथ घेऊ शकतो, विधानसभा शपथविधीबाबत सुधीर मुनगंटीवार म्हणतात
-
BJP : शपथविधीचं निमंत्रण न मिळाल्यानं भाजपचे आमदार नाराज
BJP : शपथविधीचं निमंत्रण न मिळाल्यानं भाजपचे आमदार नाराज
-
Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
रात्रीच्या बैठकीत ठरली मंत्रीपद
-
Sudhir Mungantiwar : भाजपात नाराजीनाट्य असल्याची सुत्रांची माहिती, शिंदे गटाची मध्यरात्री मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर बैठक
भाजपात नाराजीनाट्य असल्याची सुत्रांची माहिती
आज शपथविधी झाल्यानंतर अधिक माहिती मिळेल
शिंदे गटातील आमदारांची रात्री उशिरा बैठक झाली
-
Eknath Shinde Hingoli : राज्यात लवकरच 80 हजार पदासाठी पोलीस भरती करणार
मराठा आरक्षणासाठी हे सरकार सकारात्मक असून मराठा आरक्षणासाठी वकिलांची फौज उभी करू राज्यात लवकरच 80 हजार पदासाठी पोलीस भरती करणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंगोली येथील जाहीर सभेत दिली. मुख्यमंत्री भाषणाला उभे राहताच गर्दीमधूम तरुणांनी पोलीस भरती घ्या अशी मागणी केली होती. या मागणीला उत्तर देतांना लवकर 80 हजार पदासाठी पोलीस भरती काढणार असल्याचे म्हणाले.
-
maharashtra: CM Eknath Shinde to tour Nanded and Hingoli districts : मुख्यमंत्र्यांचा नांदेड दौरा
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा येथे गुरुग्रंथ साहिब यांचे दर्शन घेतले. यावेळी हुजूर साहिब सचखंड गुरुद्वाराच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पारंपरिक पद्धतीने केसरी चोला, पगडी, शिरोपा देवून सत्कार केला. दरम्यान tv9 च्या मंत्रिमंडळाच्या प्रश्नावर तुम्हाला उद्या सगळं कळेल असे उत्तर मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलंय. यावेळी खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, तख्त सचखंड श्री गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक शरणसिंघ सोधी, राजेंद्रसिंघ सोधी, सहायक अधिक्षक थानसिंघ बोंगाई आदींची उपस्थिती होती.
-
Eknath shinde : कॅबिनेट मध्ये राज्यातील नुकसानगस्त शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर करणार
नांदेड मधील नांदुसा गावाचे सरपंच भास्कर जानकवडे यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉल द्वारे संवाद साधला. या गावातील शेतरकर्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झालेले आहे. नांदेड हिंगोली भेटीदरम्यान या शेतकऱ्याची भेट घेण्याचे राहिल्यामुळे त्यांनी खास व्हिडीओ कॉल करून या शेतकऱ्याची चौकशी केली. हे सरकार सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी जनतेचे सरकार असून येत्या मंत्रिमंडळ बैठकीत ठोस निर्णय घेऊन सर्व शेतकऱ्यांना नक्की दिलासा देऊ असे शिंदे यांनी या शेतकऱ्याला आवर्जून सांगितले. -
Eknath shinde : एकनाथ शिंदे यांच्या घरी रात्री बैठक झाली. त्यावेळी अनेक आमदार उपस्थित होते
एकनाथ शिंदे यांच्या घरी रात्री बैठक झाली.
1) आमदार तानाजी सावंत 2) आमदार दीपक केसरकर 3) आमदार उदय सामंत 4) आमदार संजय शिरसाट 5) आमदार महेंद्र थोर्वे 6) आमदार संदीपान भुमरे 7) आमदार दादा भुसे 8) आमदार गुलाबराव पाटील 9) आमदार शंभूराजे देसाई 10) आमदार भरत गोगावले 11) आमदार प्रताप सरनाईक 12 आमदार महेश शिंदे 13 आमदार अब्दुल सत्तार 14 आमदार संजय राठोड
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत बैठकीत उपरोक्त आमदार नंदनवन येथील उपस्थित होते..
Published On - Aug 09,2022 6:34 AM