Maharashtra Cabinet Expansion : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर आमदारांची नाराजी दूर करण्याचं आव्हान! तातडीने बैठक बोलावली

भाजप आणि शिंदे गटातील प्रत्येक 9 आमदार उद्या मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या आमदारांना पक्षश्रेष्ठींकडून फोन गेले असून, त्यांना मुंबईत पोहोचण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, अशावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर आमदारांची नाराजी दूर करण्याचं आव्हान असणार आहे.

Maharashtra Cabinet Expansion : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर आमदारांची नाराजी दूर करण्याचं आव्हान! तातडीने बैठक बोलावली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 08, 2022 | 6:36 PM

मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सत्तास्थापन होऊन महिना लोटला. मात्र, अध्याप मंत्रिमंडळाचा विस्तार  होऊ शकला नाही. त्यावरुन विरोधकांकडून शिंदे फडणवीस सरकारवर (Shinde Fadnavis Government) जोरदार टीका सुरु होती. अशावेळी विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला आहे. मंगळवारी म्हणजे उद्याच मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) होणार आहे. भाजप आणि शिंदे गटातील प्रत्येक 9 आमदार उद्या मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या आमदारांना पक्षश्रेष्ठींकडून फोन गेले असून, त्यांना मुंबईत पोहोचण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, अशावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासमोर आमदारांची नाराजी दूर करण्याचं आव्हान असणार आहे.

एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटातील आमदारांची बैठक बोलावली आहे. आज रात्री सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होणार आहे. तसंच उद्या सकाळीही शिंदे गटातील आमदारांची बैठक होणार असल्याची माहिती मिळतेय. या बैठकीत एकनाथ शिंदे मार्गदर्शन करतील. त्यावेळी कुणाला मंत्रिपद दिलं जाणार हे स्पष्ट होईल. तसंच मंत्रिपद मिळणार नसलेल्या आमदारांना अधिकचा निधी देण्याचं आश्वासन शिंदे देऊ शकतील. कारण, शिंदे गटातील अनेक आमदार मंत्रिपदाची अपेक्षा बाळगून आहेत. मात्र, त्या सर्वांची अपेक्षा पूर्ण करणं शक्य होणार नसल्याने या बैठकीत आमदारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न शिंदेकडून केला जाण्याची शक्यता आहे.

शिंदे गटातील कुणाची मंत्रिपदी वर्णी?

शिंदे गटातील 9 आमदार उद्या मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. हाती आलेल्या माहितीनुसार आमदार गुलाबराव पाटील, संदीपान भुमरे, दादा भुसे, संजय शिरसाट आणि उदय सामंत यांना फोन गेले आहेत. त्यांना मुंबईत पोहोचण्याचे आदेश शिंदे यांनी दिले आहेत. त्यामुळे या आमदारांना मंत्रिपद मिळणार हे निश्चित मानलं जात आहे.

रात्री किंवा उद्यापर्यंत नावं निश्चित होणार- मुख्यमंत्री

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दुपारी मुंबईहून नांदेड दौऱ्यासाठी रवाना झाले. त्यावेळी माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले की, लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल. मंत्रिपदाची नावं अद्याप निश्चित झाली नाहीत. आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत नावं नक्की होतील, अशी माहिती शिंदे यांनी दिली आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.