Sudhir Mungantiwar : ‘मंत्रिमंडळात महिला मंत्री नाही म्हणणाऱ्यांना पॅालिटिकल अल्झायमर झालाय’, सुधीर मुनगंटीवारांचा विरोधकांना टोला

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार रोहित पवार यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी शिंदे आणि फडणवीस सरकारवर टीका केलीय. त्या टीकेला आता मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिलंय.

Sudhir Mungantiwar : 'मंत्रिमंडळात महिला मंत्री नाही म्हणणाऱ्यांना पॅालिटिकल अल्झायमर झालाय', सुधीर मुनगंटीवारांचा विरोधकांना टोला
मंत्री सुधीर मुनगंटीवारImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Aug 10, 2022 | 12:08 AM

नागपूर : एकनाथ शिंदे सरकारचा महिनाभरापेक्षा अधिक काळ रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) अखेर मंगळवारी झाला. शिंदे गट आणि भाजपच्या प्रत्येकी 9 आमदार अर्थात एकूण 18 मंत्र्यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. मात्र या विस्तारात एकाही महिला आमदाराला मंत्रिपदाची संधी मिळालेली नाही. त्यावरुन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार रोहित पवार यांच्यासह विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी शिंदे आणि फडणवीस सरकारवर टीका केलीय. त्या टीकेला आता मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी उत्तर दिलंय. मंत्रिमंडळात महिला मंत्री नाही म्हणणाऱ्यांना पॉलिटिकल अल्झायमर झालाय, असा टोला मुनगंटीवार यांनी विरोधकांना लगावलाय.

विदर्भाच्या विकासाचा बॅकलॉग भरुन काढणार

मंत्रिमंडळ विस्तारानंतर मुनगंटीवार मंगळवारी रात्री नागपूर विमानतळावर दाखल झाले. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. विदर्भातील विकासाचा बॅकलॉग फडणवीसांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण संपवून टाकणार. विदर्भाचा विकास करणार, उच्च दर्जाचं शिक्षण विदर्भात प्राप्त व्हावं याचं नियोजन केलंय. लोकांच्या मनात भ्रम निर्माण करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. खात्याचा निर्णय आमचे दिल्लीतील वरिष्ठ ठरवतात, असं मुनगंटीवार यांनी सांगितलं.

पूरग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीची मदत देण्याचा निर्णय होईल

तसंच कोळसा चोरी होत असेल असं प्रकरण बाहेर आलं तर त्याची सीबीआय चौकशी होईल. चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यातील कोळसा चेरीबाबत सीबीआय कारवाई करणार, असंही मुनगंटीवार यांनी सांगितलं. तसंच राज्यातील पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना मदत देण्यास सुरुवात झालीय. उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत जास्तीची मदत देण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे, असंही मुनगंटीवार म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांचंही विरोधकांना उत्तर

मंत्रिमंडळ विस्तार होत नाही म्हणून काही लोक बोलत होते. विस्तार होत नाही, हे सरकार पडेल असंही काही लोक बोलत होते. आता विस्तार झाला, सरकारही मजबूत आहे. काहीही प्रश्न उपस्थित झाला नाही. तसंच महिला मंत्री नाही हा जो आक्षेप आहे तो लवकरच दूर होईल आणि महिलांना योग्य प्रतिनिधित्व आमच्या मंत्रिमंडळात मिळेल. त्यांनीही पहिल्यांदा विस्तार केला तेव्हा पाच मंत्री घेतले, त्यात कुठलीही महिला घेतली नव्हती. त्यांना असं बोलण्याचा काहीही अधिकार नाही, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केलाय.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.