Maharashtra CM: यशवंतराव चव्हाण ते एकनाथ शिंदे… शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री झाले तर वसंतराव नाईक 11 वर्षे, 77 दिवस पदावर कार्यरत; या नेत्यांनी भूषवलं महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. त्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांना मिळला. त्यानंतर वसंतराव नाईक, शरद पवार, विलासराव देशमुख, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अशा अनेक नेत्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे.

Maharashtra CM: यशवंतराव चव्हाण ते एकनाथ शिंदे... शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री झाले तर वसंतराव नाईक 11 वर्षे, 77 दिवस पदावर कार्यरत; या नेत्यांनी भूषवलं महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद
Follow us
| Updated on: Jun 30, 2022 | 9:49 PM

मुंबई : शिवसेना आणि एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या सत्ता संघर्षाचा अखेर शेवट झाला आहे. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस हे उप मुख्यमंत्री पदी विराजमान झाले आहेत. मुबईच्या राजभवनातील दरबार हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला. एकनाथ यांच्याआधी महाराष्ट्रामध्ये (Maharashtra Chief Ministers List) कोणी कोणी मुख्यमंत्री पद भूषवलं याचा हा आढावा.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. त्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांना मिळला. त्यानंतर वसंतराव नाईक, शरद पवार, विलासराव देशमुख, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अशा अनेक नेत्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे.

वसंतराव नाईक 11 वर्षे, 77 दिवस ते मुख्यमंत्री पदावर कार्यरत

मुख्यमंत्रीपद भूषवणारे सर्वाधिक मंत्री हे काँग्रेस पक्षाचे आहेत. वसंतराव नाईक (Vasantrao Naik) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक काळ कामकाज पाहिले. तीन वेळा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. 11 वर्षे, 77 दिवस ते मुख्यमंत्री पदावर कार्यरत होते.

शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री झाले

सर्वाधिक वेळा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याचा रेकॉर्ड शरद पवार (Sharad Pawar)यांच्या नावावर आहे. शरद पवार यांनी एकूण चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवले.

मुख्यमंत्री पद भूषवणाऱ्या नेत्यांची यादी

राष्ट्रपती राजवट – १७ फेब्रुवारी १९८० ते ८ जून १९८० राष्ट्रपती राजवट – २८ सप्टेंबर २०१४ ते ३० ऑक्टोबर २०१४ राष्ट्रपती राजवट – १२ नोव्हेंबर २०१९ ते २३ नोव्हेंबर २०१९ महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या मुख्यमंत्र्यांची यादी यशवंतराव चव्हाण – १ मे १९६० ते १९ नोव्हेंबर १९६२ मारुतराव कन्नमवार – २० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३ पी. के. सावंत – २५ नोव्हेंबर १९६३ ते ४ डिसेंबर १९६३ वसंतराव नाईक – ५ डिसेंबर १९६३ ते १ मार्च १९६७, मार्च १९६७ ते १३ मार्च १९७२, १३ मार्च १९७२ ते २० फेब्रूवारी १९७५ शंकरराव चव्हाण – २१ फेब्रुवारी १९७५ ते १६ एप्रिल १९७७ वसंतदादा पाटील – १७ एप्रिल १९७७ ते २ मार्च १९७८, ७ मार्च १९७८ ते १८ जुलै १९७८ शरद पवार – १८ जुलै १९७८ ते १७ फेब्रुवारी १९८० राष्ट्रपती राजवट – १७ फेब्रुवारी १९८० ते ८ जून १९८० बॅ. अ. र. अंतुले – ९ जून १९८० ते १२ जानेवारी १९८२ बाबासाहेब भोसले – २१ जानेवारी १९८२ ते १ फेब्रुवारी १९८३ वसंतदादा पाटील – २ फेब्रुवारी १९८३ ते १ जून १९८५ शिवाजीराव निलंगेकर – ३ जून १९८५ ते ६ मार्च १९८६ शंकरराव चव्हाण – १२ मार्च १९८६ ते २६ जून १९८८ शरद पवार – २६ जून १९८८ ते २५ जून १९९१ सुधाकरराव नाईक – २५ जून १९९१ ते २२ फेब्रुवारी १९९३ शरद पवार – ६ मार्च १९९३ ते १४ मार्च १९९५ मनोहर जोशी – १४ मार्च १९९५ ते ३१ जानेवारी १९९९ नारायण राणे – १ फेब्रुवारी १९९९ ते १७ ऑक्टोबर १९९९ विलासराव देशमुख – १८ ऑक्टोबर १९९९ ते १६ जानेवारी २००३ सुशीलकुमार शिदे – १८ जानेवारी २००३ ते ३० ऑक्टोबर २००४ विलासराव देशमुख – १ नोव्हेंबर २००४ ते ४ डिसेंबर २००८ अशोक चव्हाण – ८ डिसेंबर २००८ ते १५ ऑक्टोबर २००९, ७ नोव्हेंबर २००९ ते ९ नोव्हेंबर २०१० पृथ्वीराज चव्हाण – ११ नोव्हेंबर २०१० ते २५ सप्टेंबर २०१४ राष्ट्रपती राजवट – २८ सप्टेंबर २०१४ ते ३० ऑक्टोबर २०१४ देवेंद्र फडणवीस – ३१ ऑक्टोबर २०१४ ते ८ नोव्हेंबर २०१९ राष्ट्रपती राजवट – १२ नोव्हेंबर २०१९ ते २३ नोव्हेंबर २०१९ देवेंद्र फडणवीस – २३ नोव्हेंबर २०१९ ते २६ नोव्हेंबर २०१९ उद्धव ठाकरे – २८ नोव्हेंबर २०१९ ते २९ जून २०२२

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.