AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदे यांची कुमार विश्वास यांना थेट ऑफर, तुम्ही आमच्यासोबत या, आम्ही…

Cm Eknath Shinde Offer To Kumar Vishwas : मुंबईत सीएसआर जर्नल एक्सलन्स २०२३ पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसिद्ध कवी कुमार यांना शिवसेनेत प्रवेश करण्याचं जाहीर निमंत्रण दिलं. आम्ही आदमीसाठी खूप चांगलं काम करतो. तुम्ही आलाच तर खूप छान काम होईल, अशी ऑफरच शिंदे यांनी कुमार विश्वास यांना दिली.

एकनाथ शिंदे यांची कुमार विश्वास यांना थेट ऑफर, तुम्ही आमच्यासोबत या, आम्ही...
| Updated on: Dec 10, 2023 | 11:56 AM
Share

मुंबई | 10 डिसेंबर 2023 : तुम्ही पूर्वी एका राजकीय पक्षाशी (आम आदमी पार्टी) संबंधित होता. तुमचा तिकडे काय अनुभव होता, मला माहिती नाही पण तुम्ही आमच्या सोबत आलात तर काम अधिक चांगलं होईल कारण आम्हीही ‘आम आदमी’साठी काम करतो, अशी मिश्किल टिप्पणी करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कवी कुमार विश्वास यांना थेट शिवसेना पक्षप्रवेशाची जाहीर ऑफरच दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ऑफर ऐकून मंचावर बसलेल्या संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याही चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली.

मुंबईत सीएसआर जर्नल एक्सलन्स 2023 पुरस्कार सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या कार्यक्रमाला भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कवी कुमार विश्वास उपस्थित होते. या कार्यक्रमात कुमार विश्वास यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी कवी कुमार विश्वास यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तोंडभरून कौतुक केले.

कवी कुमार विश्वास यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं म्हटल्यावर साहजिक त्यांनीही विश्वास यांची तारीफ करण्यात कसर ठेवली नाही. आपणही पूर्वी एका राजकीय पक्षात काम करत होतात. तुम्ही आमच्यासोबत आलार आम्हाला आनंद होईल, काम अधिक चांगलं होईल कारण आम्हीही आदमीसाठी काम करतो, अशी फटकेबाजी एकनाथ शिंदे यांनी केली. त्यावर सभागृहात बसलेल्या लोकांनी टाळ्यांचा कडकडाट करून मुख्यमंत्र्यांच्या फटकेबाजीला दाद दिली.

या सोहळ्यात सामाजिक क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आलं. बॉलिवूड अभिनेता आमिर खान याची मुलगी सना खान हिचाही सन्मान करण्यात आला. सना खान या कार्यक्रमाला उपस्थित नसल्याने तिच्यावतीने स्वत: आमिर खान याने पुरस्कार स्वीकारला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांचेही नाव पुरस्काराच्या यादीत होते. तेही कार्यक्रमाला हजर राहिले नाहीत, त्यामुळे एकनाथ शिंदे यांनीही मुलाचा पुरस्कार स्वीकारला.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.