Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंग्रजही सत्तेतून पायऊतार, देशाचा कारभार चालवणाऱ्या मूठभरांच्या सरकारला खाली खेचणार: नाना पटोले

महाराष्ट्रातील काँग्रेसच्या सोशल मीडियाला 2 लाख युवक जोडले जाणार असून ते गांधीदूत म्हणून काम करणार आहेत. ( Nana Patole Congress )

इंग्रजही सत्तेतून पायऊतार, देशाचा कारभार चालवणाऱ्या मूठभरांच्या सरकारला खाली खेचणार: नाना पटोले
नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
Follow us
| Updated on: Feb 11, 2021 | 7:04 PM

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सध्या देशाचं सरकार मूठभर लोक चालवात, अशी टीका केलीय. देशावर राज्य करणाऱ्या इंग्रजांची संख्या यांच्यापेक्षा जास्त होती, त्यांनाही पायउतार व्हावं लागलं, त्यामुळं केंद्रातील सरकारला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलेय. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या सोशल मीडियाला 2 लाख युवक जोडले जाणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. (Maharashtra Congress President Nana Patole criticized Center Government on various issue)

भाजपच्या विखारी प्रचाराला थांबवणार

महाराष्ट्रातील काँग्रेसच्या सोशल मीडियाला 2 लाख युवक जोडले जाणार आहेत. हे सर्वजण गांधी दूत म्हणून काम करणार आहेत. भाजपच्या विखारी प्रचाराला थांबवण्यासाठी ही टीम कार्यरत असेल, असं नाना पटोले म्हणाले.

राज्यपालांच्या जीवाची काळजी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ज्या विमानामध्ये बसले त्यामध्ये काही तरी टेक्निकल अडचण होती. त्यांच्या जीवाची आम्हाला काळजी आहे. ते विमानात बसले नाही तर उतरवण्याचा काही प्रश्नच येत नाही, असंही पटोलेंनी सांगितलं.

आम्ही लोकशाहीला मानणारे

मी विधानसभा अध्यक्ष होतो त्यावेळी सुधीर मुनगंटीवार यांची नियुक्ती समितीवर केली. आम्ही लोकशाहीला मानणारे आहोत त्यांच्या सारख आम्ही केलं नाही. राज्यपाल यांच्यावर कोणाकोणाचा दबाव आहे हे माहीत आहे, असंही नाना पटोले म्हणाले. मला जर बॅलेट वरती मतदान करायचं असेल तर तो माझा अधिकार आहे. त्यांना जर ईव्हीएम मशीन वरती मतदान करायचं असेल तर तो त्यांचा अधिकर आहे. ज्याला ज्यावर मतदान करायचं त्याचा तो अधिकार आहे, अशी टिप्पणी नाना पटोलेंनी अजित पवारांच्या ईव्हीएम संदर्भातील वक्तव्यावर केली.

नाना पटोलेंकडून नरेंद्र मोदींच्या विरोधात लढण्याची तयारी

भाजपमध्ये असताना थेट नरेंद्र मोदी यांना आव्हान देत खासदारकीचा राजीनामा नाना पटोले यांनी दिला होता. आता त्यांनी थेट नरेंद्र मोदींविरोधात निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचं म्हटलंय. त्यासाठी पक्षानं आदेश देण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. विधानपरिषेदच्या राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या प्रश्नी राज्यपालांवर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा दबाव आहे का हा प्रश्न आहे, असेही ते म्हणाले.

संबंधित बातम्या :

पक्षानं आदेश दिल्यास नरेंद्र मोदींविरोधात वाराणसीतून लढणार, नाना पटोलेंचे थेट आव्हान

‘मोदी नटसम्राट! त्यांच्या लेखी अंबानी, अदानीच गरीब’, नाना पटोलेंचा शेलक्या शब्दात टोला

(Maharashtra Congress President Nana Patole criticized Center Government on various issue)

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.