केंद्राकडून मिळालेले व्हेंटिलेटर फडणवीस, पाटलांनी चालू करुन दाखवावे, काँग्रेसचं आव्हान

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट आव्हान दिलंय.

केंद्राकडून मिळालेले व्हेंटिलेटर फडणवीस, पाटलांनी चालू करुन दाखवावे, काँग्रेसचं आव्हान
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: May 18, 2021 | 5:20 PM

मुंबई : पीएम केअर फंडातून महाराष्ट्राला मिळालेल्या व्हेंटिलेटर्सवरुन सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवलाय. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट आव्हान दिलंय. जनतेच्या जीवापेक्षा मोदींची प्रतिमा महत्वाच्या वाटणाऱ्या फडणवीस आणि पाटील यांनी हे व्हेंटिलेटर सुरु करुन दाखवावे, असं आव्हान सावंत यांनी दिलंय. सावंत यांच्या या आव्हानाला आता भाजपकडून काय प्रत्युत्तर दिलं जातं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (Congress spokesperson Sachin Sawant criticizes BJP over ventilators)

पीएम केअर फंडातून दिलेले व्हेंटिलेटर्स तकलादू आहे. त्यासंदर्भात सुरु असलेली सारवासारवही उघड झाली आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचं खोटं उघडं पाडणाऱ्या औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या 17 मेच्या अहवालानं केंद्र सरकार, तसंच गुजरात भाजपच्या नेत्यांच्या जवळच्या ज्योती सीएनसी कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न उघडा पडलाय. अशी टीका सचिन सावंत यांनी केली आहे. औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालयानं स्थापन केलेल्या समितीच्या अहवालानुसार केंद्र सरकारनं पीएम केअर फंडातून राज्याला दिलेल्या सर्व व्हेंटिलेटर्सची चौकशी करुन कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसनं केली होती.

‘केंद्र सरकारच्या दाव्याची पोलखोल’

याबाबत राष्ट्रीय पातळीवर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागल्यानंतर 14 मेला केंद्र सरकारनं उत्तर दिलं. त्यात ज्योती सीएनसी कंपनीला वाचवण्याचा आणि सगळा दोष औरंगाबाद शासकीय वैद्यकीय रुग्णालयावर टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, केंद्र सरकारच्या दाव्याची पोलखोल औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालयाने केंद्र सरकारला प्रत्युत्तर देऊन केलीय. जनतेच्या पैशाचा अपव्यय झाल्याचंही उघड झालं आहे, असं सावंत यांनी म्हटलंय.

‘फडणवीस, पाटलांनी व्हेंटिलेटर चालू करुन दाखवावे’

पीएम केअर फंडातून महाराष्ट्राला केंद्र सरकारने दिलेले ज्योती सीएनसी कंपनीचे व्हेंटिलेटर पूर्णतः तकलादू असल्याचे अहवाल सांगतो. मोदींची प्रतिमा जनतेच्या जीवापेक्षा महत्वाची मानणाऱ्या फडणवीस जी आणि चंद्रकांत पाटील यांनी हे तकलादू व्हेंटिलेटर चालू करुन दाखवावे असे आमचे आव्हान आहे, असं ट्वीट सावंत यांनी केलंय.

‘..तर व्हेंटिलेटर केंद्राला साभार परत करु- सुभाष देसाई’

पीएम केअर फंडाचून महाराष्ट्राला व्हेंटिलेटर दिल्याबद्दल केंद्र सरकारचे आभारी आहोत. पण किमान चांगल्या दर्जाचे व्हेंटिलेटर देण्याची गरज आहे. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातील बंद पडलेले 185 व्हेंटिलेटर्स पुरवठादाच्या तंत्रज्ञांना दुरुस्त करता आले नाहीत. त्यामुळे सदोष व्हेंटिलेटर्स बदलून द्यावे. अन्यथा, निकृष्ट दर्जाचे व्हेंटिलेटर्स केंद्र सरकारला साभार परत करावे लागतील, असं औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटलंय.’

संबंधित बातम्या :

Sputnik V लस मुंबई-पुण्यात कधी दिली जाणार? लस कुठे आणि किती रुपयांना मिळणार?

पुणे म्युकर मायकोसिसचा हॉटस्पॉट, आतापर्यंत 20 दगावले; रुग्णालयांसाठी नियमावली

Congress spokesperson Sachin Sawant criticizes BJP over ventilators

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.