‘मोदींनी पाठवलेला रेशनचा तांदूळ विकला, आता लस विकू नका म्हणजे झालं’, भातखळकरांचा ठाकरे सरकारला टोला

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही ठाकरे सरकारवर गंभीर आरोप करत जोरदार टोला लगावला आहे.

'मोदींनी पाठवलेला रेशनचा तांदूळ विकला, आता लस विकू नका म्हणजे झालं', भातखळकरांचा ठाकरे सरकारला टोला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजप आमदार अतुल भातखळकर
Follow us
| Updated on: Apr 08, 2021 | 4:04 PM

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनानं थैमान घातलं असताना आता लसीच्या तुटवड्यावरुन जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. कारण, लसीच्या तुटवड्यावरुन आता भाजप नेते आणि महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. राज्यात पुढील 2 ते 3 दिवस पुरेल इतकाच कोरोना लसीचा साठा शिल्लक असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. त्यावर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी महराष्ट्र सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही ठाकरे सरकारवर गंभीर आरोप करत जोरदार टोला लगावला आहे. (Atul Bhatkhalkar criticizes Thackeray government over corona vaccine shortage)

“गोरगरिबांच्या चुली पेटल्या पाहिजेत म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठवलेला रेशनचा तांदूळ विकण्याचे प्रकार महाराष्ट्रात घडले. लसीबाबत तेवढं करू नका म्हणजे झालं. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली कारावास भोगलेले लोक ठाकरे सरकारमध्ये मंत्री आहेत म्हणून भीती वाटते, दुसरं काय?”, असं ट्वीट करत अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारला टोला हाणलाय.

डॉ. हर्षवर्धन यांना महाराष्ट्र सरकारवर निशाणा

राज्यात पुढील 3 दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा शिल्लक असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलंय. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे महाराष्ट्राला आठवड्याला 40 लाख लसींचा पुरवठा करण्याची मागणी केलीय. महाराष्ट्राला वेळेत पुरवठा झाला नाही तर तीन दिवसांत लसरीकरण बंद पडण्याची भीती टोपे यांनी व्यक्त केलीय. त्यावर एकट्या महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या वृत्तीमुळे अख्ख्या देशाच्या कोरोनाविरोधातील लढ्याला फटका बसल्याची टीका डॉ. हर्षवर्धन यांनी केलीय. महाराष्ट्र सरकारकडून पुरेशा कार्यक्षमतेची कमतरता आता दिसू लागली आहे. त्याचे परिणाम आपल्या सगळ्यांना भोगावे लागत आहेत, असंही डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलंय. डॉ. हर्षवर्धन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक परिपत्रकच टाकलंय.

लस तुटवड्याचे आरोप निराधार – डॉ. हर्षवर्धन

‘गेल्या काही दिवसांत मी महाराष्ट्र सरकारच्या काही नेत्यांनी लसींच्या तुटवड्याबाबत आणि अपुऱ्या पुरवठ्यावरुन केलेली वक्तव्य ऐकली. हा कोरोना नियंत्रणात ठेवण्यात राज्य सरकारला आलेलं अपशय झाकण्यासाठीचा प्रयत्न आहे. याबाबत जबाबदारीनं वागण्यात महाराष्ट्र सरकारला आलेलं अपयश अनाकलनीय आहे. अपयश झाकण्यासाठीच लोकांमध्ये भीती निर्माण केली जातेय. लसींच्या पुरवठ्याविषयी सर्व माहिती घेतली जात आहे. त्यासंदर्भात राज्य सरकारांनाही माहिती दिली जात आहे. त्यामुळे लस तुटवड्याचे आरोप पूर्णपणे निराधार आहेत’, असं डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलंय.

‘महाराष्ट्राची माफी मागा’

गेल्या वर्षभरापासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु आहे. या स्थितीत राज्य सरकारनं सातत्याने केंद्राकडे लस आणि आर्थिक मदत मागितली जात आहे. मात्र, काल केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रावर आरोप केला त्याचा आम्ही निषेध करतो. त्यांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्याबाबत डॉ. हर्षवर्धन यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, असा आक्रमक पवित्रा नाना पटोले यांनी घेतलाय. कोरोना आपत्ती निवारणाची जबाबदारी ही केंद्र सरकारची आहे. तरीही केंद्र सरकार महाराष्ट्रातील जनतेच्या जीविताशी खेळत असल्याचा आरोप पटोले यांनी केलाय.

Nana Patole tweet

नाना पटोले यांची ट्विटरद्वारे पंतप्रधान मोदींवर टीका

संबंधित बातम्या :

Corona Vaccine : कोरोना लसीचा तुटवडा, केंद्र सरकार आणि महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी!

‘केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राचा अपमान, माफी मागा’, नाना पटोले आक्रमक

Atul Bhatkhalkar criticizes Thackeray government over corona vaccine shortage

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.