Sanjay Raut : शिंदेंच्या बंडानंतरही राऊतांचा आमदार अपहरणाचा आरोप कायम! एकनाथ शिंदेंच्या विरोधात भाषा तिखट
Eknath Shinde : आमदार स्वखुशीने माझ्यासोबत आलेले आहेत. कुणालाही फसवून, अपहरण करुन आणलेलं नाही, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं होतं.
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut on Eknath Shinde Rebel) यांनी एकनाथ शिंदे यांना एकीकडे सकाळी मिक्ष म्हटलं होत. जीवाभावाचा मित्र असल्याचं म्हणाणाऱ्या संजय राऊतांनी एकनाथ शिंदेवर अवघ्या काही तासांच पुन्हा एकदा तिखट भाषा वापरली आहे. ज्या प्रमाणे आमदारांची पळवापळवी होतेय, त्याने राज्यातील सरकार (Maharashtra Government crisis) अस्वस्थ आहे, असं विधान त्यांनी केलंय. राज्यातील सर्व नेते चिंताग्रस्त असल्याचंही त्यांनी मान्य केलंय. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी मात्र संजय राऊत यांच्या आमदारांच्या पळवापळवीच्या आरोपांना थेट प्रत्युत्तर दिलेलं होतं. आमदार स्वखुशीने माझ्यासोबत आलेले आहेत. कुणालाही फसवून, अपहरण करुन आणलेलं नाही, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं होतं. त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारची मारहाण वैगेरे तर मुळीच झालेली नाही, असंही एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde News) म्हटलं होतं. टीव्ही 9 मराठीसोबत बोलताना एकनाथ शिंदे संजय राऊतांच्या आरोपांना उत्तर दिलेलं होतं.
राऊत आमचे नेते…
दरम्यान, आरोपांचं खडणं करताना एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत हे आमचे नेते आहेत, असंही नमूद केलेलं होतं. दुसरीकडे संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे हे आमच्या संपर्कात आहेत. त्यांच्या कोणत्याही मागण्या नाही. ते लवकरच परत येतील, अशी माहिती बुधवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना दिलेली होती. जास्तीत जास्त काय होईल, सत्ता जाईल, असंही संजय राऊतांनी म्हटलेलं होतं.
एकनाथ शिंदेची काय भूमिका?
बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचाराचं हिंदुत्व आपल्याला पुढे घेऊन जायंचय. त्यासाठी आम्ही सगळे आमदार एकत्र आलेलो आहोत, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. हिंदुत्वासाठी सत्तेची लाचारी पत्करणार नाही, असंदेखील त्यांनी स्पष्ट केलंय. आतापर्यंत 40 हून अधिक आमदार हे आपल्यासोबत असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं. एकूण 46 आमदार आमच्या सोबत आहे, असंही ते म्हणाले आहेत.
दुसरीकडे विधानसभा बरखास्त होण्याच्या वाटेवर असल्याचं ट्वीट करत संजय राऊतांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार नाही, असंही ते म्हणालेत. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र आहेत आणि हळूहळू आमदार परतत आहेत, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवलाय.
पाहा सत्तेचं समीकरण :
वाचा एकनाथ शिंदेच्या बंडाचे LIVE अपडेट्स, इथे क्लिक करा : Eknath Shinde News, Maharashtra Government LIVE : महाविकास आघाडी विधानसभा बरखास्तीची शिफारस करणार