MLC Election Maharashtra 2020 Result LIVE | विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का, महाविकास आघाडीची 4 जागांवर बाजी

MLC election Maharashtra 2020 result LIVE: पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक,धुळे नंदुरबार स्था. स्वराज मतदारसंघाची मतमोजणी होणार आहे.

MLC Election Maharashtra 2020 Result LIVE | विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का, महाविकास आघाडीची 4 जागांवर बाजी
Follow us
| Updated on: Dec 04, 2020 | 11:22 PM

MLC election Maharashtra 2020 result LIVE:  मुंबई : विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या (Graduate Constituency Election result) पाच जागांपैकी चार जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. भाजपने पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघाची जागा गमावली आहे. शिवाय औरंगाबादमध्येही राष्ट्रवादीने बाजी मारली. तर शिक्षक मतदारसंघात पुण्याची जागा काँग्रेसने तर अमरावतीची जागा अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांनी जिंकली. केवळ धुळे-नंदुरबार विधानपरिषद पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार अमरिश पटेल यांनी बाजी मारली. (Maharashtra Graduate and Teacher Constituency Elections Result Live Update)

या सर्व मतदारसंघांसाठी 1 डिसेंबरला मतदान झालं. पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतरादरसंघासाठी मतदान झालं होतं. धुळे नंदुरबारमध्ये भाजपच्या अमरीश पटेलांनी दणदणीत विजय मिळवला. (Maharashtra Graduate and Teacher Constituency Elections Result Live Update)

महत्त्वाचे निकाल

  • पुणे पदवीधर – अरुण लाड (राष्ट्रवादी) – विजयी
  • पुणे शिक्षक – जयंत आसगावकर, काँग्रेस – विजयी
  • नागपूर पदवीधर – अभिजीत वंजारी (काँग्रेस) – विजयी
  • औरंगाबाद पदवीधर – सतीश चव्हाण (राष्ट्रवादी) – विजयी
  • अमरावती शिक्षक – अपक्ष उमेदवार किरण सरनाईक – विजयी

♦MLC election results LIVE UPDATE♦

[svt-event title=” भाजपचीच आता उलटी गिनती सुरु, शशिकांत शिंदे” date=”04/12/2020,1:36PM” class=”svt-cd-green” ] पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे अरुण लाड विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा पराभव केला. भाजप म्हणतंय महाविकास आघाडीची उलटी गिनती सुरू झाली मात्र महाविकास आघाडीची नव्हे तर भाजपची उलटी गिनती सुरू झाल्याचा टोला शशिकांत शिंदे tv9 शी बोलताना यांनी लगावला. [/svt-event]

[svt-event title=”वाईट सुरुवातीचा शेवट चांगला असतो : अमृता फडणवीस” date=”04/12/2020,1:16PM” class=”svt-cd-green” ] LIVETV – वाईट सुरुवातीचा शेवट चांगला असतो, अमृता फडणवीस यांचं ट्विट  [/svt-event]

[svt-event title=”उद्धवजींच्या नेतृत्त्वात चांगलं काम होतंय : सुप्रिया सुळे” date=”04/12/2020,1:05PM” class=”svt-cd-green” ] उद्धवजींच्या नेतृत्त्वात चांगलं काम होतंय, लोक समाधानी आहेत, वर्षाचा आढावा घेतला तर लोकं समाधानी , पुढच्या निवडणुकांबाबत उद्धवजी, पवारसाहेब, सोनियाजी हे घेतील.. आजचे जे निकाल आहेत, त्यावरुन पुढचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी वाढली आहे. – सुप्रिया सुळे [/svt-event]

[svt-event title=”निवडणूक निकालावर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया ” date=”04/12/2020,12:54PM” class=”svt-cd-green” ] पुढचा प्रवास स्मूथ, कोणताही ब्रेक न लागता, प्रदूषणरहित आणि योग्य वेगाने होईल, निवडणूक निकालावर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया [/svt-event]

[svt-event title=”पदवीधर निवडणूक ही तर ट्रायल मॅच : गुलाबराव पाटील” date=”04/12/2020,12:43PM” class=”svt-cd-green” ] जळगाव – पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही महाविकास आघाडीची ट्रायल मॅच, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पहिल्यांदा राज्य पातळीवर निवडणूक एकत्र लढलो आणि यात भाजपच्या जागी देखील घवघवीत यश मिळवले. या निवडणुकीचा निकाल म्हणजे हे सरकार चांगलं काम करत असल्याचा जनतेचा विश्वास, हे तीन चाकी नाहीतर चार चाकी सरकार आहे. जो शेतकऱ्यांशी भिडतो त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात, हे शेतकरी जंतर मंतर मैदानावर मंतर मारल्याशिवाय राहणार नाही. हा अमरीश पटेल यांचा विजय आहे हा भाजपचा विजय नाही – पालकमंत्री गुलाबराव पाटील [/svt-event]

[svt-event title=”भाजप कोअर कमिटीची बैठक सुरु” date=”04/12/2020,11:59AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”ज्यांचा मुख्यमंत्री आहे, त्यांची एकही जागा नाही – फडणवीस” date=”04/12/2020,11:42AM” class=”svt-cd-green” ] विधानपरिषदेचा निकाल अपेक्षेपेक्षा वेगळा लागला, चांगल्या जागांची अपेक्षा होती, पण एकच जागा मिळाली, विश्लेषण करायचं झालं तर भाजप नेते-कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत केली. स्ट्रॅटेजी चूक झाली असेल तर तीन पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांची ताकद किती असेल याचं आकलन चुकलं. आता आम्हाला कळलं त्यानुसार आम्ही पुढच्या निवडणुकीत तयारीने उतरू. ही निवडणूक अचानक लागली, त्यामुळे अनेक रजिस्ट्रेशन राहिलं. आम्ही रजिस्ट्रेशनमध्ये कमी पडलो. माझ्या घरी, गडकरींच्या घरची चार नावं नाहीत.. आता ही गोष्ट बाजूला, जे जिंकले त्यांना शुभेच्छा.. एक गोष्ट नमूद करावी, ज्यांचा मुख्यमंत्री आहे, त्यांची एकही जागा नाही. दोन पक्षांना फायदा झाला, जसं आम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे, तसं ज्यांचा मुख्यमंत्री आहे त्यांची एकही जागा येत नाही त्यांनीही आत्मचिंतन करावं – देवेंद्र फडणवीस [/svt-event]

[svt-event title=”नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांचा विजय निश्चित” date=”04/12/2020,11:33AM” class=”svt-cd-green” ] नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांचा विजय निश्चित, घोषणेची औपचारीकता बाकी [/svt-event]

[svt-event title=”आम्ही बेसावध राहिलो : सुधीर मुनगंटीवार” date=”04/12/2020,11:30AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नागपुरात अभिजित वंजारी विजयाच्या जवळ, मात्र अजूनही मत मोजणी सुरुच” date=”04/12/2020,7:59AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : नागपूर पदवीधर मतदार संघात विजय होण्याचा कोटा हा 60,747 आहे, मात्र एवढी मतं कुठल्याही उमेदवाराला मिळाली नसल्याने आता दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरु आहे, पहिल्या पसंती मध्ये काँग्रेसचे अभिजित वंजारी यांना 55947 मतं, भाजपचे संदीप जोशी यांना 41,540 मतं मिळाली, त्यामुळे अभिजित वंजारी विजयाच्या जवळ, मात्र अजूनही मत मोजणी सुरुच [/svt-event]

[svt-event title=”अमरावतीत दुसऱ्या पसंतीच्या क्रमांकाच्या मतमोजणीला सुरुवात ” date=”04/12/2020,8:05AM” class=”svt-cd-green” ] अमरावती : अमरावती शिक्षक मतदार संघ निवडणूक, एलीमिनेशनच्या 20 व्या फेरीमध्ये अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांना 6528 मते, महाविकास आघाडीचे उमेदवार व विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे यांना 5447 मते, शिक्षक आघाडीचे शेखर भोयर यांना 5205 मते, एकाही उमेदवाराने एलीमिनेशनच्या प्रक्रियेनंतर कोटा पूर्ण न केल्याने होणार दुसऱ्या पसंतीच्या क्रमांकाच्या मतमोजणीला सुरवात [/svt-event]

[svt-event title=”48,824 मतांनी महाविकास आघाडीचे अरुण लाड यांचा पहिल्या फेरीतच दणदणीत विजय” date=”04/12/2020,8:05AM” class=”svt-cd-green” ] पुणे : 48 हजार 824 मतांनी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस महा विकास आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांचा पहिल्या फेरीतच दणदणीत विजय, अरुण लाड यांना 1 लाख 22 हजार 145 मते मिळाली, संग्राम देशमुख यांना 73 हजार 321 मतं पडली [/svt-event]

[svt-event title=”हिंमत असेल तर एकटं एकटं लढा, सत्ताधाऱ्यांना चंद्रकांत पाटलांचे आव्हान” date=”04/12/2020,7:56AM” class=”svt-cd-green” ] पुणे : हिंमत असेल तर एकटं एकटं लढा, सत्ताधाऱ्यांना चंद्रकांत पाटलांचे आव्हान, या निकालात शिवसेनेचे खच्चीकरण झालं, राष्ट्रवादीने मात्र आपली संघटना मजबूत केलीय, पुण्यात जर अपक्ष उमेदवाराने अजून काही मतं घेतली असती तर विजय आमचा होता, नागपुरात पण तेच झालं, तीन पक्ष एकत्र आले होते आम्ही एकटे होतो, तरी आम्ही निकराची लढाई दिली, तरी आम्ही आत्मपरीक्षण करणार [/svt-event]

[svt-event title=”पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे अरुण लाड यांची विजयाकडे वाटचाल, कार्यकर्त्यांचा जल्लोष” date=”04/12/2020,7:53AM” class=”svt-cd-green” ] पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे अरुण लाड यांची विजयाकडे वाटचाल, अधिकृत निकाल येण्याआधी मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष, गुलालाची उधळण करत जोरदार घोषणाबाजी, अरुण लाड यांना एक लाख 21 हजार मतं, संग्राम देशमुख यांना 72 हजार मतं, अरुण लाड यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय, अधिकृत घोषणा बाकी [/svt-event]

[svt-event title=”अमरावती विभागात अपक्ष उमेदवार किरण सरनाईक 6325 मतांसह आघाडीवर ” date=”04/12/2020,7:39AM” class=”svt-cd-green” ] अमरावती : अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक, अमरावतीत तब्बल 24 तासापासून मतमोजणी सुरुच, अपक्ष उमेदवार किरण सरनाईक आघाडीवर, विद्यमान आमदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे दुसऱ्या क्रमांकावर, आतापर्यंत 19 उमेदवार बाद, अजुनही एलिमिनेश सुरु, किरण सरनाईक अपक्ष 6325, श्रीकांत देशपांडे महा विकास आघाडी 5302, शेखर भोयर अपक्ष 5060 मतं [/svt-event]

[svt-event title=”अमरावती शिक्षक मतदारसंघ अपक्ष उमेदवार सर्वांना भारी, किरण सरनाईक 966 मतांनी आघाडीवर” date=”03/12/2020,11:18PM” class=”svt-cd-green” ] अमरावती शिक्षक मतदारसंघातून अपक्ष उमेदवार किरण सरनाईक दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीत 966 मतांनी आघाडीवर, सरनाईक वाशिम येथील शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, 1988 साली अकोला जिल्ह्याचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष, मागील 50 वर्षांपासून सरनाईक घराणं काँग्रेस पक्षासोबत, किरण सरनाईक माजी आमदार मालतीबाई सरनाईक (काँग्रेस) यांचे ज्येष्ठ पुत्र. [/svt-event]

[svt-event title=”पुणे पदवीधर मतदारसंघात अरुण लाड आघाडीवर, सोलापुरात जल्लोष” date=”03/12/2020,10:42PM” class=”svt-cd-green” ] पुणे पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड आघाडीवर, मतमोजणीचे अंतिम निकाल हाती येण्याआधीच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकून सोलपुरात जल्लोष, सोलापुरातील चार हुतात्मा चौकात हुतात्म्यांना अभिवादन करत फटाक्यांची आतषबाजी, मिठाई भरवत पदाधिकाऱ्यांचा जल्लोष, पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ अशा दोन्ही जागा महाविकास आघाडी जिंकणार असल्याचा कार्यकर्त्यांना विश्वास [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादेत दुसऱ्या फेरीत सतीश चव्हाण यांची मुसंडी, तब्बल 34 हजार मतांनी आघाडीवर” date=”03/12/2020,10:30PM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण 34 हजार मतांनी आघाडीवर, औरंगाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष सुरु, जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी फटाके फोडून जल्लोष, दोन फेऱ्यांत कल स्पष्ट झाल्यामुळे राष्ट्रवादीकडून जल्लोष [/svt-event]

[svt-event title=”नागपूरमध्ये मतमोजणीची दुसरी फेरी पूर्ण, महाविकास आघाडीच्या उमेदवाराची 7262 मतांनी मुसंडी” date=”03/12/2020,9:21PM” class=”svt-cd-green” ] नागपूर पदवीधर मतदारसंघ : दुसऱ्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी 7262 मतांनी आघाडीवर, दुसऱ्या फेरीत अभिजित वंजारी यांना 11497 मतं, तर भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांना 9085 मतं. [/svt-event]

[svt-event title=”नागपूर पदवीधर मतदारसंघात चुरशीची लढत, दुसऱ्या फेरीतही भाजप पिछाडीवर” date=”03/12/2020,8:55PM” class=”svt-cd-green” ] नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या जागेसाठी चुरशीची लढत, महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी आघाडीवर, दुसऱ्या फेरीतही भाजप पिछाडीवर [/svt-event]

[svt-event title=”अमरावती शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार 966 मतांनी पिछाडीवर” date=”03/12/2020,8:32PM” class=”svt-cd-green” ] अमरावती शिक्षक मतदारसंघासाठीची दुसऱ्या फेरीतील मतमोजणी पूर्ण, दोन्ही फेऱ्या मिळून 29 हजार 829 वैध, तर 1 हजार 89 मतं अवैध, अपक्ष उमेदवार किरण सरनाईक आघाडीवर, सरनाईक यांनी दुसऱ्या फेरीत 2957 मतं, महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना 2822 मतं. तर अपक्ष उमेदवार शेखर भोयर यांना 2811 मतं, सरनाईक यांना एकूण 6088, भोयर यांना 4899, तर देशपांडे यांना 5122 मतं. [/svt-event]

[svt-event title=”अमरावती शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार किरण सरनाईक आघाडीवर” date=”03/12/2020,7:51PM” class=”svt-cd-green” ] अमरावती शिक्षक मतदारसंघत मतमोजणीची दुसरी फेरी पूर्ण, अपक्ष उमेदवार किरण सरनाईक 966 मतांनी आघाडीवर,किरण सरनाईक यांनी 6088 मतं, महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांनी 5122 मतं, एकूण 30,918 मतांची मोजणी पूर्ण. [/svt-event]

[svt-event title=”पुणे शिक्षक मतदारसंघ : महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत आसगावकरांची आघाडी कायम” date=”03/12/2020,7:42PM” class=”svt-cd-green” ] पुणे शिक्षक मतदारसंघ : महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत आसगावकर यांची आघाडी कायम, दत्तात्रय सावंत चार हजार पाचशे मतांनी पिछाडीवर, 36 हजार मतांची मोजणी पूर्ण [/svt-event]

[svt-event title=”पुणे पदवीधर मतदारसंघ : राष्ट्रवादीचे अरुण लाड आघाडीवर, 10 हजार मतांनी पुढे” date=”03/12/2020,7:40PM” class=”svt-cd-green” ] पुणे पदवीधर मतदारसंघात चुरशीची लढत, महाविकास आघडीचे उमेदवार अरुण लाड आघाडीवर, लाड 10 हजार मतांनी पुढे, भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख पिछाडीवर, आतापर्यंत 65 ते 70 हजार मतांची मोजणी. [/svt-event]

[svt-event title=”नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ : मतमोजणीची पहिली फेरी पूर्ण, महाविकास आघाडीचे अभिजित वंजारी आघाडीवर” date=”03/12/2020,7:30PM” class=”svt-cd-green” ] नागपूर पदवीधर मतदारसंघातील मतमोजणीची पहिली फेरी पूर्ण, आतापर्यंत झालेल्या मतमोजणीनुसार महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांना 12617 मतं, तर भाजपचे उमेदवार यांना 7767 मतं, सध्याच्या आकडेवारीवरुन महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी आघाडीवर [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ : मतमोजणीची पहिली फेरी पूर्ण, राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांना 17906 मतांची आघाडी” date=”03/12/2020,7:22PM” class=”svt-cd-green” ] राष्ट्रवादीचे उमेदवरा सतीश चव्हाण यांना 27879 मते, भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना 10973 मते, पहिल्या फेरीत राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांना 17906 मतांची आघाडी, पहील्या फेरीत 56 हजार मतांची मोजणी [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबाद पदवीधर निवडणूक : आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण आघाडीवर” date=”03/12/2020,4:48PM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : महाविकास आघाडीची लिटमस टेस्ट यशस्वी होण्याच्या मार्गावर, महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी घेतली आघाडी, पहिल्या फेरीत सतीश चव्हाण यांना दहा हजारांची आघाडी, भाजपचे शिरीष बोराळकर पिछाडीवर, पहिल्या फेरीची मतमोजणी अजूनही सुरूच, 56 हजार मतांची पहिली फेरी [/svt-event]

[svt-event title=”राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांची मुसंडी” date=”03/12/2020,4:10PM” class=”svt-cd-green” ] पुणे – पुणे पदवीधर मतमोजणीला सुरुवात, प्राथमिक कलानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांची मुसंडी, भाजपचे संग्राम देशमुख पिछाडीवर तर शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे जयंत आसगावकर यांची आघाडी कायम [/svt-event]

[svt-event title=”अमरावती : शिक्षक मतदारसंघ निवडणूक, पहिल्या फेरीचा निकाल” date=”03/12/2020,3:42PM” class=”svt-cd-green” ] पहिल्या फेरीत वैध 13 हजार 999 मतांपैकी 488 अवैध तर 13 हजार 511 मते वैध ठरली. या फेरीतील मते अशी : डॉ. नितीन धांडे- ६६६, श्रीकांत देशपांडे – २३००, अनिल काळे – १२, दिलीप निंभोरकर- १५१, अभिजित देशमुख – ९, अरविंद तट्टे- १३, अविनाश बोर्डे- ११७४, आलम तनवीर- ९, संजय आसोले- ३०, उपेंद्र पाटील- २१, प्रकाश कालबांडे- ४३७, सतीश काळे-७८, निलेश गावंडे- ११८३, महेश डावरे-१४१, दिपंकर तेलगोटे-६, डॉ. प्रवीण विधळे-७, राजकुमार बोनकिले-३४८, शेखर भोयर- २०७८, डॉ. मुश्ताक अहमद- ८, विनोद मेश्राम – ७, मो. शकील- १४, शरद हिंगे- २५, श्रीकृष्ण ठाकरे- १०, किरण सरनाईक – ३१३१, विकास सावरकर – ३१४, सुनील पवार- ३५, संगीता शिंदे- १३०४. [/svt-event]

[svt-event title=”अमरावती शिक्षक मतदारसंघ, पहिल्या फेरीत भाजपचे नितीन धांडे यांना जबर धक्का” date=”03/12/2020,3:24PM” class=”svt-cd-green” ] अमरावती : अमरावती विभाग विधानपरिषद शिक्षक मतदारसंघाची पहिली फेरी, भाजपचे नितीन धांडे यांना जबर धक्का, अपक्ष उमेदवार किरण सरनाईक 3131 मतांसह आघडीवर, तर महाविकास आघाडीचे श्रीकांत देशपांडे यांना 2300 आणि शिक्षक आघाडीचे शेखर भोयर यांना 2078 मते [/svt-event]

[svt-event title=”शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे जयंत आसगावकर आघाडीवर” date=”03/12/2020,2:53PM” class=”svt-cd-green” ] शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरुवात, पहिल्या पसंतीचे प्राथमिक कल, काँग्रेसचे जयंत आसगावकर आघाडीवर , आसगावकर आणि दत्तात्रय सावंत यांच्यात चुरस. [/svt-event]

[svt-event title=”…तर पुणे शिक्षकचा 7 वाजेपर्यंत आणि पदवीधरचा 9 वाजेपर्यंत निकाल लागणार” date=”03/12/2020,1:18PM” class=”svt-cd-green” ] पुणे पदवीधर मतदारसंघासाठी 2 लाख 47 हजार 917 तर शिक्षकसाठी 53 हजार19 इतके मतदान झाले आहे. या सर्व मतपत्रिका एकत्र करून त्यातल्या वैध आणि अवैध मतपत्रिका वेगळ्या केल्या जात असतानाच विजयाचा कोटा ठरण्यासाठी  रात्रीचे नऊ वाजू शकतात,असे विभागीय आयुक्तांनी सांगितले असून जर या प्रक्रियेत एखाद्या उमेदवाराने विजया साठीचा कोटा पूर्ण केला तर शिक्षक चा निकाल साधारण सायंकाळी 7 वाजता तर पदवीधर चा निकाल रात्री नऊ वाजता लागू शकतो. पहिल्या पसंतीच्या मतामध्येच विजय मिळवण्यासाठी वैध मतदान भागिले 2, अधिक 1 मत  आवश्यक आहे. त्यामुळे एकतर्फी निवडणूक झाल्यास रात्री नऊ वाजता निकाल अपेक्षित आहे. पहिल्या पसंतीचा कोटा पूर्ण होऊ शकला नाही तर दुसऱ्या पसंतीची मते मोजली जाणार आहेत आणि ही प्रक्रिया करण्याची वेळ आल्यास त्याच्या पदवीधर साठी 60 फेऱ्या तर शिक्षक साठी 32 फेऱ्या घ्याव्या लागणार आहेत. प्रत्येक फेरीसाठी अंदाजे अर्धा तास वेळ गृहीत धरल्यास निकाल लागण्यासाठी आज रात्री 9 नंतर पुढे 30 तास पदवीधरसाठी लागू शकतात तर शिक्षक साठी 16 तास लागू शकतात असा प्रशासनाचा अंदाज आहे. [/svt-event]

[svt-event title=”महाविकास आघाडीतील अनेक नेते अमरिश पटेल यांचे गुलाम,राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांची घणाघाती टीका ” date=”03/12/2020,1:14PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”नागपूरमध्ये मतमोजणीला प्रत्यक्ष सुरुवात पहिला कल 3 वाजता येणार” date=”03/12/2020,12:34PM” class=”svt-cd-green” ] नागपूर पदवीधर निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात, 28 टेबलवर सुरु झाली मतमोजणी, पहिल्या फेरीचा कल 3 वाजेपर्यंत येण्याची शक्यता, तर अमरावती शिक्षकमध्ये अद्याप मतपेट्या उघडणे सुरू आहे आणि 25 – 25 गठ्ठे बनवणं सुरू आहे. [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादेत अजूनही मतपेट्या उघडण्याचेच काम सुरू, 4 तासापासून मतपेट्या उघण्याचे काम” date=”03/12/2020,12:34PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात भाजप सर्व जागा जिंकणार: नितेश राणे” date=”03/12/2020,11:43AM” class=”svt-cd-green” ] आजचा दिवस भारतीय जनता पक्षासाठी विजयाचा दिवस राहणार आहे. हे आम्हाला पहिल्यापासून माहीत होतं.याची सुरुवात अमरीश पटेल यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आजच्या सर्वच जागा भारतीय जनता पक्ष जिंकेल असा आमदार नितेश राणेंनी व्यक्त केला. [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबाद मतमोजणी केंद्रावर सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा, वंचित बहुजन आघाडीचा आक्षेप” date=”03/12/2020,10:26AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद मतमोजणी केंद्रावर सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजल्यामुळे वंचित बहुजन आघाडीने आक्षेप घेतला आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नसल्यामुळे वंचित बहुजन आघाडीनं निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे. [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात मतमोजणी दरम्यान कोरोना विषयक उपाययोजनांची अंमंलबजावणी” date=”03/12/2020,10:15AM” class=”svt-cd-green” ] पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक- 2020 अंतर्गत मतमोजणी प्रक्रियेस आज सकाळी 8 वाजता सुरवात झाली. पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल परिसरात मतमोजणी कामकाज होत आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मतमोजणी कामकाजाबाबत मार्गदर्शन केले. याठिकाणी केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून निलिमा केरकट्टा, श्रीकांत देशपांडे उपस्थित आहेत. तसेच पुणे विभागातील पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा या पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अनुक्रमे डॉ.राजेश देशमुख, दौलत देसाई, मिलिंद शंभरकर, डॉ. अभिजित चौधरी, शेखर सिंग उपस्थित आहेत. कोविड-19 च्या अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. मतमोजणी कामासाठी नियुक्त अधिकाऱ्यांसाठी तसेच सुरक्षा अधिकाऱ्यांसाठी मास्‍क, सॅनिटायझर, हॅन्ड ग्लोव्हज, फेसशिल्‍ड आदी साहित्याचा समावेश असलेले किट देण्‍यात आले आहे. [/svt-event]

[svt-event title=”धुळे नंदुरबारमध्ये महाविकास आघाडीच्या 115 मतदारांचे क्रॉस व्होटिंग,भाजपचे अमरीश पटेल विजयी” date=”03/12/2020,10:10AM” class=”svt-cd-green” ] धुळे नंदुरबार स्थानिक संस्था विधानपरिषद निवडणूक, अमरीश पटेल यांचा दणदणीत विजय, विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे 115 मत फुटली, भाजपची 199 तर महाविकास आघाडीचे 213 मतदान,मात्र, महाविकास आघाडीच्या 115 मतदारांचे क्रॉस व्होटिंग झाल्याने अभिजित पाटील यांचा पराभव, भाजपचे अमरीश पटेल मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाल्यानं महाविकास आघाडीच्या एकीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादमध्ये मतमोजणीला सुरुवात, पहिल्या पसंतीची मतं मोजल्यानंतर दुसऱ्या पसंतीची मतं मोजली जाणार ” date=”03/12/2020,9:43AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद: औरंगाबाद पदवीधर निवडणुक मतमोजणीला झाली सुरुवात, प्रत्यक्ष बॅलेट पेपर मोजायला झाली सुरुवात, 56 टेबलवर मोजले जात आहेत बॅलेट पेपर, सुरुवातीला होणार पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी, पहिल्या पसंतीत कुणाचाच विजय नाही झाला तर मोजली जाणार दुसऱ्या पसंतीची मते, दुसऱ्या पसंतीची मते मोजावी लागली तर निकालाला उजडणार दुसरा दिवस, 290 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सुरू आहे मतमोजणी , 2 लाख 40 हजार 649 बॅलेट पेपरची मोजणी होणार आहे. [/svt-event]

[svt-event title=”पहिला निकाल भाजपच्या बाजूने, अमरिश पटेल यांचा दणदणीत विजय” date=”03/12/2020,9:32AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”धुळे-नंदुरबार विधानपरिषद निवडणुकीत अमरिश पटेल यांचा विजय” date=”03/12/2020,9:18AM” class=”svt-cd-green” ] धुळे-नंदुरबार विधानपरिषद निवडणुकीत अमरिश पटेल यांचा विजय झाला आहे. 434 मतापैकी 332 मतं अमरीश पटेल यांना तर काँग्रेसच्या अभिजीत पाटील यांना 98 मतं मिळाली आहेत. [/svt-event]

[svt-event title=”धुळे-नंदुरबारच्या मतमोजणीला सुरुवात” date=”03/12/2020,9:09AM” class=”svt-cd-green” ] धुळे नंदुरबार विधानपरिषद निवडणूक, मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात , पुढच्या तासाभरात निकालाचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता, अभिजीत पाटील आणि अमरीश पटेल यांच्यात लढत [/svt-event]

[svt-event title=”पुणे पदवीधरचा पहिला कल सायंकाळी 6 वाजता येणार” date=”03/12/2020,9:08AM” class=”svt-cd-green” ] पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीत दुपारी तीन वाजेपर्यत वैध, अवैध मते बाजूला करण्याची प्रक्रिया सुरु होईल. संध्याकाळी सहा पर्यत कल स्पष्ट होईल, मतमोजणी पूर्ण व्हायला किमान 36 तास लागण्याची शक्यता [/svt-event]

[svt-event title=”अमरावतीचा निकाल 5 वाजेपर्यंत जाहीर होण्याची शक्यता” date=”03/12/2020,9:05AM” class=”svt-cd-green” ] अमरावती : अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाची मतमोजणीला सुरवात झाली आहे. पहिल्या पसंतीच्या क्रमांकाचा कोटा कोणत्याही उमेदवाराने पूर्ण केला नाही तर दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाच्या पसंतीचे मते मोजली जाऊ शकतात, त्यामुळे अंतिम निकाल 5 वाजेपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. [/svt-event]

[svt-event title=”नागपूरचा पहिला कौल दुपारी दोन वाजता येणार” date=”03/12/2020,8:56AM” class=”svt-cd-green” ] नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात, पहिला कौल दुपारी दोन नंतर येणार, निकाल रात्री उशिरा किंवा पहाटेपर्यंत लागणार [/svt-event]

[svt-event title=”पुणे पदवीधर, शिक्षक मतदार संघ निवडणूक मतमोजणी प्रक्रियेस सुरुवात” date=”03/12/2020,8:50AM” class=”svt-cd-green” ] पुणे पदवीधर, शिक्षक मतदार संघ निवडणूक मतमोजणी प्रक्रियेस सुरुवात, पदवीधर साठी ११२ आणि शिक्षक मतदार साठी ४२ टेबल, मतमोजणी केंद्रावर पदवीधर मतदारसंघासाठी १८ हॉल, तर शिक्षक मतदारसाठी ६ हॉल, पदवीधरसाठी १२६ पर्यवेक्षक, २५२ सहायक आणि १२६ शिपायांची नेमणूक, ‘शिक्षक मतदार’साठी ४२ पर्यवेक्षक, ८४ सहायक आणि ४२ शिपायांची नियुक्ती , ४५० पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादमध्ये मतपेट्या उघडण्यास सुरुवात” date=”03/12/2020,8:30AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : औरंगाबादेत मतपेट्या उघडायला झाली सुरूवात, 56 टेबलवर उघडल्या जात आहेत मतपेट्या, मतपेट्या उघडून वैध मते आणि बाद मते केली जाणार वेगळी,वैध मतांची थोड्याच वेळात होणार मोजणी [/svt-event]

[svt-event title=”मतदानाचा टक्का वाढतो तेव्हा सत्ताधाऱ्यांना फटका बसतो: शिरीष बोराळकर ” date=”03/12/2020,8:19AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद पदवीधरमध्ये या वेळेला मोठ्या प्रमाणात मतदान झालं आहे. याचं अर्थ हे मतदान सत्ताधाऱ्यांच्या विरोधात झालं आहे. जेंव्हा मतदानाचा टक्का वाढतो तेंव्हा त्याचा फायदा विरोधी पक्षाला होतो. त्यामुळे माझा विजय निश्चित आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांनी दिली आहे. [/svt-event]

[svt-event title=”अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीचा प्रक्रिया सुरु” date=”03/12/2020,8:10AM” class=”svt-cd-green” ] अमरावती: विधानपरिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी आज रोजी होणार आहे. येथील विलासनगरातील शासकीय गोदामात ही सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. शिक्षक मतदारसंघासाठी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात एकूण 30 हजार 869 मतदारांनी मतदान केले.मतमोजणीच्या ठिकाणी 14 टेबलवर ही मतमोजणी होत आहे. [/svt-event]

[svt-event title=”पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेला थोड्याच वेळात सुरुवात” date=”03/12/2020,8:00AM” class=”svt-cd-green” ] पुणे: विधानपरिषदेच्या पुणे विभाग पदवीधर मतदार संघात 4 लाख 26 हजार 257 मतदारांपैकी 2 लाख 47 हजार पन्नास (57.96टक्के ) मतदारांनी मतदान केले,तर शिक्षक मतदार संघात 52 हजार 987 म्हणजेच 73.04 टक्के मतदारांनी मतदान केले. एकूण मतदानाची वाढलेली टक्केवारी, एकूण उमेदवारांची संख्या यामुळे पाचही जिल्ह्याची मतपत्रिका एकत्र करणे, त्यातून वैध आणि अवैध मतपत्रिका वेगळ्या करणे. त्यानंतर पहिल्या पसंती क्रमांकात निवडून येण्यासाठी मतांचा कोटा निश्चित करून प्रत्यक्ष पहिल्या फेरीची मतमोजणी सुरू करण्यासाठी दुपारचे तीन ते चार वाजणार आहेत. [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी तयारी पूर्ण” date=”03/12/2020,7:49AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद: औरगाबाद पदवीधर निवडणुकीची आज मतमोजणी, कलाग्राम समोरील केंद्रात होत आहे मतमोजणी, 11 जिल्हाधिकाऱ्यांसह 290 कर्मचाऱ्यांची मतमोजणीसाठी नियुक्ती, सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार मतमोजणी, 2 लाख 40 हजार 649 मतपत्रिकांची होणार मतमोजणी, मराठवाडा पदवीधरसाठी 35 उमेदवार आहेत रिंगणातस पदवीधरांचा कोण होणार आमदार आज होणार फैसला, भाजपचे शिरीष बोराळकर आणि महाआघाडीचे सतीश चव्हाण यांच्यात खरी लढत होती. [/svt-event]

[svt-event title=”पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची मतमोजणीची तयारी पूर्ण” date=”03/12/2020,7:46AM” class=”svt-cd-green” ] पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची मतमोजणीची तयारी पूर्ण, बालेवाडी येथील स्टेडियममध्ये मतमोजणीची तयारी पूर्ण, पदवीधर साठी ११२ आणि शिक्षक मतदार साठी ४२ टेबल, मतमोजणी केंद्रावर पदवीधर मतदारसंघासाठी १८ हॉल, तर शिक्षक मतदारसाठी ६ हॉल, पदवीधरसाठी १२६ पर्यवेक्षक, २५२ सहायक आणि १२६ शिपायांची नेमणूक, ‘शिक्षक मतदार’साठी ४२ पर्यवेक्षक, ८४ सहायक आणि ४२ शिपायांची नियुक्ती , ४५० पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. [/svt-event]

[svt-event title=”नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज” date=”03/12/2020,7:42AM” class=”svt-cd-green” ] नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज, थोड्याच वेळात होणार मतमोजणीला सुरुवात, नागपूर मतदारसंघात ६४.३८ टक्के मतदान, 19 उमेदवारांच्या भाग्याचा आज फैसला, भाजपचे संदीप जोशी आणि काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांच्यात थेट लढत, नागपूर विभागीय क्रीडा संकुलात चार हॉलमध्ये, 28 टेबलवर मतमोजणी, टेबलवर काऊंटींग सुपरव्हायजर म्हणून एक उपविभागीय किंवा उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी, एकूण 1 लाख 32 हजार 923 मतदान झालं असून मतमोजणीत 28 हजार मतपत्रिकांची एक फेरी असणार आहे. [/svt-event]

नागपूर पदवीधर मतदारसंघ

नागपूर पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी आघाडीवर आहेत. सध्या मतमोजणीच्या तीन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. तर चौथ्या फेरीला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार अभिजीत वंजारी यांना 35 हजार 509 मते मिळाली आहेत. तर भाजपचे उमेदवार संदीप जोशी दुसऱ्या स्थानावर असून त्यांना 25 हजार 898 मते मिळाली आहेत. प्रत्येक फेरीत 28 हजार मतांची मोजणी होत आहे.

अमरावती शिक्षक मतदारसंघ

विधानपरिषदेच्या अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या जागेवर अपक्ष म्हणून उभे राहिलेले किरण सरनाईक सध्या आघाडीवर आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे पिछाडीवर आहेत. त्यांना दुसऱ्या फेरीत 2822 तर एकूण 5122 मतं मिळाली आहेत. तर, अपक्ष उमेदवार किरण सरनाईक प्रथमस्थानी असून त्यांना दुसऱ्या फेरीत 2957 तर एकूण 6088 मतं मिळाली आहेत.

पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघ

पुणे पदवीधर मतदारसंघात अरुण लाड यांनी आघाडी घेतलेली आहे. निकाल हाती येण्याच्या आधीच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषही सुरु केला आहे. सोलापुरात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत अरुण लाड विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला. तसेच, पुणे शिक्षक मतदारसंघातदेखील महाविकास आघाडीचे जयंत आसगावकर आघाडीवर आहेत. तर भाजपचे दत्तात्रय सावंत पिछाडीवर आहेत.

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी मुसंडी मारली आहे. ते तब्बल 34 हजार मतांनी आघाडीवर आहेत. या ठिकाणीदेखील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला आहे.

राज्यात महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर ही पहिली मोठी निवडणूक असल्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपने ताकद पणाला लावली होती. विधानपरिषदेच्या निकालाचा महाराष्ट्रातील आगामी राजकारणावर परिणाम दिसून येतील.

पदवीधर आणि शिक्षकमध्ये कोण बाजी मारणार?

पुणे पदवीधर मतदारसंघात एकूण 4 लाख 26 हजार 257 मतदारांनी नोंदणी केली होती. कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यात झाले. त्याखालोखाल पुण्यात मतदान झाले. पुणे पदवीधरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड आणि भाजपचे संग्रामसिंह देशमुख यांच्यात प्रमुख लढत झाली. 2014 चे विजयी उमेदवार : चंद्रकांत पाटील, भाजप

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये मतदान नोंद झाले. औरंगाबादमधून सतीश चव्हाण राष्ट्रवादीकडून पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्यासमोर भाजपचे शिरीष बोराळकरांचं आव्हान आहे. भाजपचे बंडखोर उमदेवार रमेश पोकळे यांचा फटका कुणाला बसणार हे पाहावं लागणार आहे. 2014 चे विजयी उमेदवार : सतीश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस

नागपूर पदवीधर मतदारसंघात एकूण 2 लाख 6 हजार 454 मतदारांनी नोंदणी केली होती. नागपूरमधून भाजपचे संदीप जोशी आणि काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांच्यात प्रमुख लढत झाली. 2014 चे विजयी उमेदवार : अनिल सोले, भाजप

पदवीधर मतदारसंघाच्या तुलनेत शिक्षक मतदारसंघासाठी मतदानाची टक्केवारी अधिक राहिली.अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीत चुरशीनं मतदान झालं आहे. अमरावतीमध्ये एकूण 35622 मतदार आहेत. त्यापैकी सर्वाधिक मतदार अमरावतीमध्ये आहेत. अमरावतीमध्ये प्रमुख लढत महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे आणि भाजपचे नितीन धांडे यांच्यामध्ये होत आहे. 2014 विजयी उमेदवार : श्रीकांत देशपांडे

पुणे शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसचे जयंत आसगांवकर आणि भाजपच्या पाठिंब्यावर जितेंद्र पवार निवडणूक लढवत आहेत. 2014 ला विजयी झालेले दत्तात्रय सावंत यांनीही निवडणूक लढवली आहे. 2014 विजयी उमेदवार : दत्तात्रय सावंत, अपक्ष

धुळे नंदूरबारमध्ये 99.31 टक्के मतदान

धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज संस्था विधानपरिषद निवडणुकीमध्ये 99.31 % मतदान झाले आहे.या मतदारसंघात भाजपचे अमरीश पटेल यांच्यासमोर काँग्रेसच्या डॉ.अभिजीत पाटील यांचं आव्हान आहे. भाजप विरोधात महाविकासआघाडीनं एकत्रितपणे निवडणूक लढवल्यामुळे अमरीश पटेल जागा राखणार का हे पाहावं लागणार आहे. 2015 विजयी उमेदवार : अमरीश पटेल (Maharashtra Graduate and Teacher Constituency Elections Result Live Update)

मतदारसंघनिहाय उमेदवार

पुणे पदवीधर अरुण लाड ( राष्ट्रवादी काँग्रेस ) संग्रामसिंह देशमुख (भाजप) रुपाली पाटील ( मनसे ) शरद पाटील ( जनता दल ) सोमनाथ साळुंखे (वंचित बहुजन आघाडी ) श्रीमंत कोकाटे ( इतिहास संशोधक) डॉ.अमोल पवार ( आम आदमी पक्ष) अभिजित बिचुकले (अपक्ष)

औरंगाबाद पदवीधर

सतीश चव्हाण (राष्ट्रवादी ) शिरीष बोराळकर (भाजप) नागोरराव पांचाळ( वंचित) रमेश पोकळे (भाजप बंडखोर)

नागपूर पदवीधर

अभिजीत वंजारी (कॉग्रेस ) संदीप जोशी( भाजप) नितीन रोंघे ( विदर्भवादी उमेदवार ) राहुल वानखेडे ( वंचित बहुजन आघाडी )

पुणे शिक्षक

जयंत आसगांवकर ( काँग्रेस) दत्तात्रय सावंत (अपक्ष) सम्राट शिंदे (वंचित) डॉ.सुभाष जाधव (एमफुक्टो)

अमरावती शिक्षक 

श्रीकांत देशपांडे (शिक्षक आघाडी ) मविआ पाठिंबा नितीन धांडे ( भाजप) दिलीप निंभोरकर (शिक्षक भारती) संगीता शिंदे (शिक्षण संघर्ष समिती) प्रकाश काळबांडे ( विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ)

संबंधित बातम्या :

Special Report | विधानपरिषदेच्या आखाड्यात कोण बाजीगर?

Breaking| विधानपरिषद निवडणुकीत भाजपची सरशी? 6 विधानपरिषद निवडणुकीचा एक्झिट पोल

(Maharashtra Graduate and Teacher Constituency Elections Result Live Update)

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.