विधान परिषद पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक : कोणत्या पक्षाचा उमेदवार कोण?
महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या एकूण 5 मतदारसंघांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. (Maharashtra graduate and teachers constituency election )
मुंबई : विधानपरिषदेच्या पदवीधरच्या 3 आणि शिक्षक मतदारसंघासाठीचा 2 जागांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे,अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडीनं त्यांचे उमेदवार जाहीर केले असून यावेळीही काही जणांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असल्यामुळं आजही उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. (Maharashtra graduate and teachers constituency election constituency wise candidate list)
औरंगाबाद मतदारसंघातून सतीश चव्हाण,नागपूरमधून अनिल सोले आणि अमरावती शिक्षक मतदारसंघातील श्रीकांत देशपांडे आणि पुणे शिक्षक मतदारसंघातील दत्तात्रय सावंत यांचा कार्यकाळ 19 जुलै 2020 रोजी संपला आहे. पुणे पदवीधरचे तत्कालीन आमदार चंद्रकांत पाटील कोथरुड विधानसभा मतदारसंघात विजयी झाल्यामुळे त्यांनी विधानपरिषदेचा राजीनामा दिला होता. यासर्व जागांवर निवडणूक होत आहे.
काँग्रेस विधान परिषदेच्या 5 जागांपैकी 2 जागा लढवत आहे. पुणे शिक्षक मतदारसंघासाठी जयंत आसनगावकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी अभिजित वंजारी यांना संधी देण्यात आली आहे. अभिजित वंजारी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसनं पुणे पदवीधरसाठी अरुण लाड यांना तर औरंगाबादसाठी सतीश चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केलीय.
भाजपनं पुणे पदवीधरमधून संग्रामसिंह देशमुख, औरंगाबाद मधून शिरीष बोराळकर, नागपूरमधील संदीप जोशी आणि अमरावती शिक्षकमधून नितीन धांडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
वंचित बहुजन आघाडीनं औरंगाबाद मध्ये नागोरराव पांचाळ, पुणे मधून सोमनाथ साळुंखे, नागपूरमधून राहुल वानखेडे, पुणे शिक्षक मधून सम्राट शिंदे यांना उमेदवारी दिली आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघ
पुणे पदवीधर मतदरासंघातून प्रमुख पक्ष भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपतर्फे सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी देण्यात आलीय. तर, राष्ट्रवादी काँग्रेसनं अरुण लाड यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीचे प्रताप माने यांनी उमेदवारी न मिळाल्यानं बंडखोरी केली आहे. वंचित बहुजन आघाडीनं प्रा. सोमनाथ साळुंखे यांना उमेदवारी जाहीर केलीय. मनसेकडून रुपाली पाटील, जनता दलाकडून शरद पाटील, इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आम आदमी पक्षाकडून डॉ. अमोल पवार अर्ज दाखल करणार आहेत. बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला आहे.
औरंगाबाद पदवीधर मतदासंघ
राष्ट्रवादी काँग्रेसनं औरंगाबाद पदवीधर मधून सतीश चव्हाण यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. भाजपनं 2014 च्या निवडणुकीत पराभतू झालेले शिरीष बोराळकर यांना उमेदवारी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीनं नागोरराव पांचाळ यांना उमेदवारी दिली आहे. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने रमेश पोकळे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. भाजपकडून जयसिंगराव गायकवाड, प्रवीण घुगे इच्छुक होते.
नागपूर पदवीधर
नागपूर पदवीधरमधून भाजपनं अनिल सोले यांना पुन्हा संधी न देता नवीन उमेदवार दिला आहे. नागपूरचे महापौर संदीप जोशी यांना भाजपनं संधी दिली आहे. काँग्रेसने अभिजीत वंजारी यांना उमेदवारी जाहीर केली असून ते आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. विदर्भवादी नेते नितीन रोंघे हे देखील निवडणूक लढवणार आहेत. वंचितने राहुल वानखेडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघ
पुणे शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसनं जंयत आसनगावकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघासाठी भाजपनं अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नाही. एमफुक्टो या प्राध्यापकांच्या संघटनेकडून डॉ. सुभाष जाधव निवडणूक लढवणार आहेत. 2014 च्या निवडणुकीत विजयी झालेले दत्तात्रय सावंत हे देखील अपक्ष अर्ज दाखल करणार आहेत. वंचितने सम्राट शिंदे यांना उमेदवारी दिली आहे.
अमरावती शिक्षक
शिक्षक आघाडीचे श्रीकांत देशपांडे 2014 च्या निवडणुकीत अमरावती शिक्षक मतदारसंघातून विजयी झाले होते. यावेळी ते महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवत आहेत. भाजपनं नितीन धांडे यांना उमेदवारी दिली आहे. दिलीप निंभोरकर हे शिक्षक भारती तर्फे तर भाजपा नेते आणि माजी मंत्री अनिल बोंडे यांच्या बहीण संगीता शिंदे शिक्षण संघर्ष समिती कडून निवडणूक लढवतील. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघांचे प्रकाश काळबांडे हे देखील निवडणूक लढवणार आहेत.
मतदारसंघनिहाय उमेदवार
पुणे पदवीधर
अरुण लाड ( राष्ट्रवादी काँग्रेस ) संग्रामसिंह देशमुख भाजप प्रताप माने ( राष्ट्रवादी काँग्रेस बंडखोरी ) रुपाली पाटील ( मनसे ) शरद पाटील ( जनता दल ) सोमनाथ साळुंखे (वंचित बहुजन आघाडी ) श्रीमंत कोकाटे ( इतिहास संशोधक) डॉ.अमोल पवार ( आम आदमी पक्ष) अभिजित बिचुकले (अपक्ष)
औरंगाबाद पदवीधर
सतीश चव्हाण (राष्ट्रवादी ) शिरीष बोराळकर (भाजप) नागोरराव पांचाळ( वंचित)
रमेश पोकळे (भाजप बंडखोर)
नागपूर पदवीधर
अभिजीत वंजारी (कॉग्रेस ) संदीप जोशी( भाजप) नितीन रोंघे ( विदर्भवादी उमेदवार ) राहुल वानखेडे ( वंचित बहुजन आघाडी )
पुणे शिक्षक
जयंत आसनगावकर ( काँग्रेस) दत्तात्रय सावंत (अपक्ष) सम्राट शिंदे (वंचित) डॉ.सुभाष जाधव (एमफुक्टो)
अमरावती शिक्षक
श्रीकांत देशपांडे (शिक्षक आघाडी ) मविआ पाठिंबा नितीन धांडे ( भाजप) दिलीप निंभोरकर (शिक्षक भारती) संगीता शिंदे (शिक्षण संघर्ष समिती) प्रकाश काळबांडे ( विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ)
निवडणुकीचा कार्यक्रम
निवडणूक जाहीर : 5 नोव्हेंबर उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस : 12 नोव्हेंबर अर्ज छाननी : 13 नोव्हेंबर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस : 17 नोव्हेंबर मतदानाचा दिनांक : 1 डिसेंबर मतदान (सकाळी 8 ते सांयकाळी 5 ) मतमोजणी : 3 डिसेंबर निवडणूक प्रक्रिया संपण्याचा दिवस : 7 डिसेंबर
भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जाहीर
भाजप
भारतीय जनता पार्टी केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी पदवीधर विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक 2020 करीता उमेदवारी जाहीर केली आहे. जाहीर उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन!@BJP4India @narendramodi @JPNadda @AmitShah @ChDadaPatil @Dev_Fadnavis pic.twitter.com/rCCpe5Ak0l
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) November 9, 2020
राष्ट्रवादी काँग्रेस
विधानपरिषद निवडणुकीत पदवीधर मतदारसंघातून औरंगाबाद विभागात राष्ट्रवादीचे श्री. सतीश चव्हाण तर पुणे विभागातून राष्ट्रवादीचे श्री. अरुण लाड यांना महाविकास आघाडीतर्फे उमेदवार म्हणून घोषित करण्यात येत आहे. दोन्ही उमेदवार या निवडणूकीत विजयी होतील, याचा आम्हाला विश्वास आहे.
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) November 12, 2020
काँग्रेस
INC COMMUNIQUE Important Notification regarding ensuing biennial elections to the Maharashtra Legislative Council pic.twitter.com/o5yamKld4e
— INC Sandesh (@INCSandesh) November 10, 2020
वंचित बहुजन आघाडी
विधानपरिषदच्या पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार खालीलप्रमाणे. pic.twitter.com/hrwnfeBgA2
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) November 10, 2020
संबंधित बातम्या :
पदवीधर मतदारसंघात मतदानाचा हक्क कुणाला?; कसा येतो आमदार निवडून?
चंद्रशेखर बावनकुळेंवर नागपूर पदवीधर मतदारसंघाची जबाबदारी; भाजपकडून घोषणा
पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची उमेदवारी जाहीर; अभिजीत वंजारी, जयंत आसगावकरांना तिकीट
(Maharashtra graduate and teachers constituency election constituency wise candidate list)