सातारा ग्रामपंचायत निकाल 2021 Latest Updates: कराड उत्तरमधील पहिला निकाल हाती, निगडी गावात बाळासाहेब पाटलांच्या पॅनलचा विजय
निगडी गावात सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलचा विजय झालाय. 8 विरुद्ध 1 अशा मोठ्या फरकानं बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलने विजय मिळवला आहे.
सातारा : विधानसभेच्या प्रतिष्ठित कराड उत्तर मतदारसंघातील पहिला ग्रामपंचायत निकाल हाती आला आहे. निगडी गावात सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलचा विजय झालाय. 8 विरुद्ध 1 अशा मोठ्या फरकानं बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलने विजय मिळवला आहे. पाटील यांच्या पॅनलपुठे विरोधकांचा सुपडा साफ झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे कराड उत्तरमधील निगडी गावात राष्ट्रवादी काँग्रेसनं बाजी मारल्याचं पाहायला मिळत आहे.(Balasaheb Patil’s panel wins in Nigdi village in Karad North constituency)
दुसरीकडे कराड तालुक्यातील पहिला निकाल खुबी या गावचा लागला आहे. खुबी गावात भाजपचे अतुल भोसले यांच्या पॅनले दणदणीत विजय मिळवला आहे. अतुल भोसले यांच्या पॅनलनं विरोधकांचा 9 विरुद्ध 0 अशा मोठ्या फरकानं दारुण पराभव केला आहे.
अहमदनगरमध्ये दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
अहमनगर जिल्ह्यातील एकूण 767 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक लागली होती. त्यातील 53 ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध निवडणूक पार पडली आहे. उर्वरित ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. पण, अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा विचार केला तर अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यात जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे, हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांच्यापासून ते राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, भाजप नेते राम शिंदे, भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा समावेश आहे.
दरम्यान, राज्यातील 12,711 ग्रामपंचायतींसाठी आज मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीतून एकूण 2 लाख 14 हजार उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. ग्रामीण भागाच्या राजकारणाचा कणा मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत सरासरी ८० टक्के मतदान झाले. एकूण 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. 1523 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीचा लेखाजोखा
निवडणूक जाहीर ग्रामपंचायती- 14,234 आज प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायती- 12,711 एकूण प्रभाग- 46,921 एकूण जागा- 1,25,709 प्राप्त उमेदवारी अर्ज- 3,56,221 अवैध नामनिर्देशनपत्र- 6,024 वैध नामनिर्देशनपत्र- 3,50,197 मागे घेतलेली नामनिर्देशनपत्र- 97,719 बिनविरोध विजयी होणारे उमेदवार- 26,718 अंतिम निवडणूक रिंगणातील उमेदवार- 2,14,880
संबंधित बातम्या :
Gram Panchayat Election Results 2021 : निकालाचा पहिला मान कोल्हापुरात, पाडळीवर जनसुराज्यचा विजय
Balasaheb Patil’s panel wins in Nigdi village in Karad North constituency