मतदान पार पडलं, आता निकालाची प्रतिक्षा; उमेदवारांमध्ये धाकधूक, कार्यकर्त्यांचे जीव टांगणीला!

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या महिनाभरापासून सुरु असलेली गावागावातील लगबग, उमेदवारांची धावपळ, कार्यकर्त्यांची चढाओढ आज संपली आहे.

मतदान पार पडलं, आता निकालाची प्रतिक्षा; उमेदवारांमध्ये धाकधूक, कार्यकर्त्यांचे जीव टांगणीला!
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 8:19 PM

मुंबई  :  ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या महिनाभरापासून सुरु असलेली गावागावातील लगबग, उमेदवारांची धावपळ, कार्यकर्त्यांची चढाओढ आज संपली आहे. राज्यातील 12 हजार 631 ग्रामपंचायत निवडणुकीचं मतदान मोठ्या उत्साहात पार पडलं तर कुठे मतदानादरम्यान गालबोट लागलेलं पाहायला मिळालं. सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी साडे पाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरु होती. अखेर मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर लाखो उमेदवारांचं भविष्य मतपेटीत बंद झाले असून लाखो कार्यकर्त्यांचे जीव टांगणीला लागले आहेत. आता उमेदवार आणि कार्यकर्त्यांना 18 जानेवारीची म्हणजेच निकालाच्या दिवशीची वाट पाहावी लागणार आहे. (Maharashtra Grampanchayat Election 2021 Completed, Candidate And karykarta Waiting Election result)

दौंडच्या कुसेगावात मतदान प्रकियेला गालबोट, दोन गटातील कार्यकर्ते भिडले

दौंड तालुक्यातील कुसेगावमध्ये मतदान प्रकियेला गालबोट लागलं. कुसेगावमधील दोन गटाचे कार्यकर्ते एकमेकांत भिडले. आधी या दोन गटात बाचाबाची झाली होती. त्यातून दोन्हीकडचे कार्यकर्ते भिडले.

डोंबिवलीत उमेदवाराच्या नातेवाईकाला पैसे वाटप करताना पोलिसांनी रंगेहात पकडले

एका उमेदवाराच्या नातेवाईकाला पैसे वाटप करताना पोलिसांनी रंगेहात पकडले. डोंबिवलीतील खोणी ग्रामपंचायतमध्ये ही घटना घडली. मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैसे वाटणाऱ्या व्यक्तीचे नाव आकाश ठोंबरे असे असून त्याची काकी निवडणुकीच्या रिंगणात उभी होती.

लेंगरेवाडी गावात भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये वाद, गावात तणाव

सांगलीमधील लेंगरेवाडी गावात निवडणूक सुरु असताना भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला. भाजप कार्यकर्ते संतोष लेगनरे या तरुणाच्या अंगावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न झाला. या घटनेमुळे लेंगरेवाडी या गावात तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

वसमत तालुक्यातील लोन बुद्रुक येथे मतदानाला उशिरा सुरुवात

हिंगोलीमधील वसमत तालुक्यातील लोन बुद्रुक येथे वॉर्ड क्रमांक 1 मध्ये सकाळी 10 वाजेपर्यंत मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली नव्हती. ईव्हीएम मशीनवर चिन्ह बदलून आल्याचा आरोप ग्रामविकास पॅनल प्रमुख बबन होळपादे यांनी केला होता. त्यामुळे येथील मतदानाच्या प्रक्रियेला उशिरा सुरुवात झाली. दरम्यान, येथे ग्रामपंचायतीच्या एकूण 9 जागा होत्या, त्यापैकी 5 जागा बिनविरोध झाल्या, तर 4 जागांसाठी मतदान सुरु आहे. वार्ड क्रमांक 01 मध्ये 10 वाजेपर्यंत मतदान सुरु झाले नव्हते.

हिंगोलीतील ईव्हीएम मशीनवर उमेदवारांचे नाव स्पष्ट दिसत नसल्याचा आक्षेप, मतदान प्रक्रिया उशिराने

ईव्हीएम मशिनवर उमेदवारांचे नाव स्पष्ट दिसत नसल्याचा आक्षेप घेतल्यामुळे हिंगोलीतील सेनगाव तालुक्यातील बनबरडा येथील वार्ड क्रमांक 01 मधील मतदान प्रक्रिया दोन तास ठप्प होती.

नांदगावात ईव्हीएम मशीन बंद

नांदगाव तालुक्यातील आमोदे येथील प्रभाग क्र. 3 चे ईव्हीएम मशीन बंद पड्यामुळे सकाळी दोन तास मतदानाची प्रक्रिया ठप्प होती. तसेच याच तालुक्यातील दहेगाव ग्रामपंचायतीतदेखील असाच प्रकार घडला, येथेही ईव्हीएम बंद पडल्याने मतदान खोळंबले होते.

मनमाडमध्ये ईव्हीएम मशीनवरुन उमेदवारांचे नावच गायब

मनमाडच्या पानेवाडी ग्रामपंचायतीमध्ये ईव्हीएम मशीनवरुन उमेदवारांचे नावच गायब असल्याचे लोकांच्या निदर्शनास आल्यामुळे मतदानाची प्रक्रिया खोळंबली होती. दरम्यान याबाबतची माहिती मिळताच प्रशासनाचे अधिकारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी ईव्हीएम मशीन दुरुस्तीचे काम सुरु केले.

कोल्हापुरात सडोली खालसा येथे ईव्हीएम यंत्र बंद

कोल्हापूर जिल्ह्यातील सडोली खालसा येथे ईव्हीएम यंत्र बंद पडल्याने मतदानाची प्रक्रिया बराच वेळ थांबली होती. प्रभाग क्रमांक 2 चे ईव्हीएम मशीन बंद पडले होते. मशीनची चाचणी घेताना सिग्नल न आल्याने हा प्रकार संबंधित कर्मचाऱ्याच्या लक्षात आला होता.

धुळ्यात ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड

धुळे तालुक्यातील कावठी या मतदान केंद्रावर सकाळी एक तासापासून मतदानाची प्रक्रिया खोळंबली होती. वोटिंग मशिनमध्ये बिघाड झाल्यामुळे मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत होत्या.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी मतदानाचा हक्क बजावला

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी मतदानाचा हक्क बजावला आहे. लोकशाही बळकट करायची असेल तर मतदानाचा हक्क बजावा, असे आवाहन अण्णांनी केले आहे. “सुदृढ आणि निकोप लोकशाहीच्या वाढीसाठी मतदान करणे गरजेचे आहे, म्हणून मी आज माझा मतदानाचा हक्क बजावला आहे”, असे उद्गार अण्णांनी काढले. यादवबाबांचे दर्शन घेऊन अण्णांनी राळेगणसिद्धी जिल्हा परिषदेच्या प्रधामिक शाळेतील केंद्रावर जाऊन मतदान केले.

मंत्री यशोमती ठाकूर यांनी बजावला मतदानाचा अधिकार

महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया पार पडते आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाकरिता राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी आपल्या अमरावती जिल्ह्यातील मोझरी गावामध्ये मतदानाचा हक्क बजावला. दुपारी 12 वाजता त्यांनी सहकुटुंब मतदान केले. यावेळी त्या स्वतः रांगेत उभ्या राहिल्या होत्या. यावेळी लोकशाही मजबूत करण्यासाठी सर्वांनी मतदान करावे असे आवाहन यशोमती ठाकूर यांनी मतदारांना केले. यशोमती ठाकूर यांच्या गावात त्यांच्या काँग्रेस पक्षाची गेल्या 10 वर्षांपासून सत्ता आहे.

रक्षा खडसें यांनी प्रथमच एकनाथ खडसेंविना मतदानाचा हक्क बजावला

खासदार रक्षा खडसे यांनी पहिल्यांदाच सासरे एकनाथ खडसेंविना मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्या म्हणाल्या की, परिवार म्हणून आम्ही सोबतच आहोत. नाथाभाऊ इथे असते तर आम्ही सोबतच मतदान केले असते. पक्षांबाबत आमचे विचार थोडे वेगळे असू शकतात, तरी आम्ही एकाच घरात राहतो. एकनाथ खडसे आज मुंबईमध्ये असल्यामुळे आज मी गावकऱ्यांसोबत मतदानाचा हक्क बजावला.

शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकरांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला

उस्मानाबाद जिल्ह्यातील 382 ग्रामपंचायत निवडणुकींसाठी मतदानाची प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान, शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सपत्नीक मतदान करत मतदानाचा हक्क बजावला. “लोकशाही मूल्ये रुजवण्यासाठी गाव पातळीवर निवडणूक महत्त्वाची असते, त्यामुळे लोकांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावे”, असेआवाहन खासदार ओमराजे यांनी नागरिकांना केलं आहे.

आमदार रोहित पवारांनी मतदानाचा हक्क बजावला

आमदार रोहित पवार यांचं पिंपळी लिमटेक येथे मतदान आहे. त्यामुळे त्यांनी पिंपळी ग्रामपंचायतीसाठी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे राजेंद्र पवार, आई सुनंदा पवार आणि पत्नी कुंती पवार यांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला.

काँग्रेस आमदार अमित झनक यांनी मतदानाचा हक्क बजावला

वाशिम जिल्ह्यातील रिसोड मतदारसंघातील काँग्रेस आमदार अमित झनक यांनी मतदानाचा हक्क बजावला, मूळगावी मागूळ झनक इथे ग्रामपंचायत निवडणुकीत रांगेत उभे राहून त्यांनी मतदान केले.

गडचिरोतल्या पाथरगोटा गावाचा ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार

आरमोरी तालुक्यापासून 10 किमी अंतरावर असलेल्या पाथरगोटा गावाने आज होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीवर कडकडीत बहिष्कार केला असून कुणीही मतदान करणार नाही असा पवित्रा घेतला.

मतदानाच्या दिवशीच उमेदवाराचा मृत्यू, हृदयविकाराच्या झटक्याने गेला जीव

सायबण्णा बिराजदार असं मयत उमेदवाराचं नाव आहे. मागील काही दिवसांपासून विजयी होण्यासाठी सायबण्णा बिराजदार यांनी वार्डातील प्रत्येक घर पिंजून काढलं होतं. गावातील प्रत्येकाशी चर्चा केली. आपल्याला मत मिळावं आणि विजयी व्हाव यासाठी अनेक प्रयत्न केले. पण ऐन मतदानाच्या दिवशी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या

ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362. एकूण- 14,234.

प्रभाग – 46,923

जागा – 1,24,819

उमेदवार : अडीच लाखांहून अधिक

हे ही वाचा

धक्कादायक! मतदानाच्या दिवशीच उमेदवाराचा मृत्यू, हृदयविकाराच्या झटक्याने गेला जीव

महाराष्ट्र ग्रामपंचायत मतदान 2021: जामनेरच्या देवपिंप्रीत चाकू हल्ला, पिस्तूल रोखून धमकावलं

महाराष्ट्र ग्रामपंचायत मतदान 2021: स्वातंत्र्यापासून एकही मतदान चुकवलं नाही, 115 वर्षीय देवईबाई मुंढेंच्या बोटावर अभिमानाची शाई

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.