किरीट सोमय्यांवर 100 कोटींचा अब्रू नुकसानीची दावा ठोकणार : हसन मुश्रीफ

भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी तातडीची पत्रकार परिषद बोलावली. हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबाने 127 कोटींचा घोटाळा केला असून, त्याबाबत 2700 पानांचा पुरावा इन्कम टॅक्सला दिल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला.

किरीट सोमय्यांवर 100 कोटींचा अब्रू नुकसानीची दावा ठोकणार : हसन मुश्रीफ
Kirit Somaiya_Hasan Mushirf
Follow us
| Updated on: Sep 13, 2021 | 2:29 PM

कोल्हापूर : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केलेल्या आरोपानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी तातडीची पत्रकार परिषद बोलावली. हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबाने 127 कोटींचा घोटाळा केला असून, त्याबाबत 2700 पानांचा पुरावा इन्कम टॅक्सला दिल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला. सोमय्यांनी मुंबईत आज पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्यावर घोटाळ्याचे आरोप केले. (Maharashtra Hasan Mushirf press conference live update after Kirit Somaiyas allegation of money laundering)

हसन मुश्रीफ काय म्हणाले?

किरीट सोमय्यांनी माझ्या पक्षाविरुद्ध, पवारसाहेबांविरुद्ध बिनबुडाचे आरोप केले आहेत. सोमय्यांनी माझ्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. किरीट सोमय्यांच्या CA पदवीबद्दलच शंका आहे. कारण त्यांनी जी कागदपत्र दाखवली ती IOC च्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. जर ती खोटी असती तर त्याचवेळी समोर आलं असतं. आम्ही निवडणूक आयोगालाही कागदपत्र दिली आहेत. आपण नवं काय करतोय असा राणाभीमदेवी थाटात आरोप सोमय्यांनी केला. माझ्यावर इन्कम टॅक्सने धाड टाकली त्यात काहीच मिळालं नाही. अडीच वर्ष झाली धाड टाकून, त्यावर काही कारवाई नाही. आता किरीट सोमय्या उठून आरोप करत आहेत.

मला वाटतंय किरीट सोमय्यांना काही माहिती नसावी. आमचे कोल्हापूरचे नेते चंद्रकांत पाटील, समरजीत घाटगे यांनी माहिती दिली असेल. सोमय्यांनी कोल्हापुरात येऊन खातरजमा करायला हवी होती.

मी अनेक दिवसांपासून सांगत होतो, माझा पक्ष आणि पवार साहेबांवर आरोप झाले. त्याला मी प्रत्युत्तर दिले. त्यामुळे माझ्यावर आरोप होणार ही खात्री होती.  या आरोपांचा मी निषेध करतो, त्यांच्या CA पदवीवर शंका येते. या आधीच धाड पडली मात्र त्यांना काहीच मिळालं नाही. सोमय्या यांना यातील काही माहिती नाही. त्यांनी कोल्हापूरमध्ये येऊन माहिती घ्यायला हवी होती. चंद्रकांत पाटील आणि समरजीत घाटगे यांच्या सांगण्यावरून हे आरोप झाले.

मी सोमय्या यांच्यावर फौजदारी 100 कोटींचा दावा दाखल करणार. दोन आठवड्यात कोल्हापूर कोर्टात दावा दाखल करणार.

चंद्रकांत पाटील यंच्यावरही हायब्रीड अन्यूईटी रस्ते घोटाळ्याबाबत लाचलुचपतकडे तक्रार करणार. समरजीत घाटगे यांचा पैराही वेळच्या वेळी फेडू.

घाटगे यांचे कार्यकर्ते दोन दिवसा पासून याची चर्चा करत होते. म्हणून मी सुद्धा आधीच निरोप दिला होता. अमित शहा यांच्या मैत्रीमुळेच चंद्रकांतदादांना पद मिळालं. त्यांना सामाजिक काम करता येत नाही. त्यांना कोल्हापूर सोडून पुण्याला जावं लागलं.

चंद्रकांत पाटलांचा हसन मुश्रीफांवर पलटवार

माझं नाव घेतल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही. माझं नाव घेऊन त्यांना झोप लागत असेल तर बरं आहे. ते नेहमी 100 कोटीच्या दाव्याच्या बाता करतात, त्यापेक्षा जास्त दावा ठोका.  त्यांचं सरकार येऊन २० वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटला. त्यांना कुणी रोखलंय? माझ्यावर खुशाल तक्रार करा, कुठेही करा. मी कशाला घाबरत नाही.

हॅब्रीड अॅनोविटी मध्ये ३० हजार कोटीची कामं निघाली. सरकारकडे पैसे नसल्यामुळे दोन वर्ष ६० टक्के आणि ४० टक्के अशी ती कामं होती, त्याचं टेंडर निघालं, काम पूर्ण होत आहेत. हॅब्रीड अॅनोविटीमध्ये जी कामं झाली ती नॅशनल लेव्हलची झालेत. ती मग थांबवायला हवी होती, का थांबवली नाहीत? मुश्रीफांच्या आरोपांमध्ये बूड असेल तर माझ्यावर कारवाई होईल, मी काय घाबरत नाही.

मागच्या टर्ममध्ये काँग्रेसचा एकही आमदार निवडून आला नव्हता, राष्ट्रवादीचे दोन आले. कालचक्र फिरत असतं आज आम्ही खाली असलो तरी उद्यावर येऊ. शिवसेना-भाजप युतीचे ८ आमदार आले. तुमचे किती होते? बंटी पाटील म्हणतात नामशेष करु.. पण जिल्हा परिषद वगैरे आमच्या ताब्यात आली.

खुलं चॅलेंज आहे, सुटे सुटे लढा, कोण एक नंबरला जातं ते बघू.. एकटं पोरगं चाललं होतं, त्याच्यावर तीन जणांनी हल्ला केला, कसल्या फुशारक्या मारता, असा हल्ला चंद्रकांत पाटील यांनी केला.

मी जसं म्हटलं, मी घाबरत नाही, त्यांनीही म्हणावं. कितीही कोटीचा दावा केला तरी दावा करण्यासाठी 25 टक्क्याची स्टॅम्प ड्युटी लागते, तेवढा व्हाईट मनी आहे का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला.

किरीट सोमय्यांचे आरोप काय?

किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांची पत्नी आणि मुलावर मनी लाँडरिंगचे आरोप केले आहेत. बोगस कंपन्या दाखवून बेनामी संपत्ती जमवल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केला.

बोगस कंपन्या दाखवून हसन मुश्रीफ कुटुंबियांनी पैसे लाटले. सीआरएम सिस्टम प्रा. लि (CRM Systems PVT LTD ) ही कंपनी प्रवीण अग्रवाल ऑपरेटर आहेत. यामध्ये हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नाविद मुश्रीफ (Navid Mushrif) यांनी 2 कोटीचं कर्ज घेतले आहे. ही कंपनी शेल कंपनी/बोगस कंपनी आहे. नाविद मुश्रीफ यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखवलं आहे. त्यामध्ये जी रक्कम दाखवली आहे, 2 कोटीहून जास्त रक्कम दाखवली आहे.

बाप-बेट्यांच्या 127 कोटींच्या घोटाळ्याचे पुरावे

बाप बेटे दोघांच्या 127 कोटींचे पुरावे आमच्याकडे आहेत. हसन मुश्रीफ यांनी पत्नी सायरा हसन मुश्रीफ यांच्या अकाऊंटमध्ये सरसेनापती संताजी धनाजी घोरपडे साखर कारखान्याचे तीन लाख रुपयांचे शेअर्स दाखवले आहे. 2018- 19 मध्ये इन्कम टॅक्सने मुश्रीफांच्या घरावर धाडी टाकल्या होत्या. बेनामी ट्राझॅक्शन 127 कोटींचे व्यवहार समोर आले आहेत.

उद्या मी मुंबई इडीकडे अधिकृत तक्रार करणार आहे. 2700 पानांचे पुरावे देणार आहे. माझ्याकडे 2 मंत्र्यांचे फाईल तयार होते, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे दोन मंत्री होते, त्यापैकी एकाचं प्रकरण आज मी सांगितले.

संबंधित बातम्या  

हसन मुश्रीफ कुटुंबांकडून 127 कोटींचा घोटाळा, किरीट सोमय्यांकडून कथित ‘डर्टी 11’मध्ये राखीव खेळाडूचं नाव!

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.