आम्ही ब्रुक फार्माच्या मालकाची वकिली करु, तुम्ही सचिन वाझेची वकिली करता त्याचं काय? प्रविण दरेकरांचा सवाल

आम्हाला ब्रुक फार्माच्या मालकाची वकिली करावी लागली तरी आम्ही करू मात्र तुम्ही वाझेची वकिली करता त्याचे काय ?, असा सवाल प्रविण दरेकर यांनी केला Pravin Darekar MVA Government

आम्ही ब्रुक फार्माच्या मालकाची वकिली करु, तुम्ही सचिन वाझेची वकिली करता त्याचं काय? प्रविण दरेकरांचा सवाल
प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधानपरिषद.
Follow us
| Updated on: Apr 18, 2021 | 7:14 PM

मुंबई: विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्य सरकर जनतेच्या जिवाचं रक्षण करू शकत नाही, असा आरोप केला. जनतेसाठी 100 गुन्हे दाखल केले तरी मी आणि देवेंद्र फडणवीस त्यासाठी तयार आहोत, असं वक्तव्य दरेकर यांनी केलं आहे. पोलिसांकडे माहिती होती त्यामुळे ब्रुक कंपनीच्या संचालकाची चौकशी, यापुढे सरकारी कामात हस्तक्षेप सहन केला जाणार नाही,गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी इशारा दिला होता. त्यावर दरेकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला ब्रुक फार्माच्या मालकाची वकिली करावी लागली तरी आम्ही करू मात्र तुम्ही वाझेची वकिली करता त्याचे काय ?, असा सवाल प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारला केला. (Maharashtra Legislative Council lop Pravin Darekar Slams MVA Government over investigation of Bruck Pharma Director)

राज्य सरकारला रेमेडेसिव्हीर साठी आवश्यक परवानगीची कल्पना नव्हती. मी स्वतः राजेंद्र शिंगणे यांना भेटून आम्ही हे विकणार नसल्याचे देखील स्पष्ट केलं होतं. ब्रुक फार्माच्या मालकाला पोलिसांनी आरोपीसारखे ताब्यात घेतले. आम्ही पोलीस आयुक्त ,जॉईंट सिपी आणि उपयुक्तांना देखील फोन केला होता. मात्र, त्यांचं वक्तव्य सरकारच्या दबावाखाली असल्यासारखं वाटत होता, असा आरोप प्रविण दरेकर यांनी केला.

आम्ही हस्तक्षेप केला

आम्ही हस्तक्षेप 100 टक्के केला त्यामुळे आम्ही केंद्रातील मंत्र्यांसोबत देखील बोलत होते. रेमेडेसिव्हीर मिळणं हा आमचा उद्देश होता. 100 चौकशा केल्या तरी चालतील. जर तुम्हाला 60 हजाराचा साठा असल्याची माहिती मिळाली होती तर ती जाहीर करा, असं आव्हान दरेकरांनी दिलं आहे. आम्ही रेमेडेसिव्हीरचाधंदा भाजप कार्यालयातून मांडणार नव्हतो, असंही दरेकर म्हणाले.

आभार मानायचे सोडून आडकाठी

रेमेडेसिव्हीर आणायला आम्ही मदत करत असताना आभार करण्याचे सोडून आडकाठी केली जाते आहे. राज्यातील मरणाच्या उंबरठ्यावर असलेल्या नागरिकांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न सरकार करतंय, असं प्रविण दरेकर म्हणाले.

संबंधित बातम्या:

फडणवीसांनी पोलिसांवर दबाव टाकला, सरकारी कामात हस्तक्षेप; दिलीप वळसे-पाटलांनी दिले कारवाईचे संकेत

ज्या कंपनीच्या मालकासाठी फडणवीस अर्ध्या रात्री पोलीस ठाण्यात गेले ती नेमकी कुणाची?, नेमका वाद काय आहे?; वाचा सविस्तर

VIDEO: ‘त्या’ कंपनीच्या मालकासाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते इतक्या तातडीने पोलीस ठाण्यात का गेले?

(Maharashtra Legislative Council lop Pravin Darekar Slams MVA Government over investigation of Bruck Pharma Director)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.