Maharashtra Lockdown : फडणवीस म्हणाले, लॉकडाऊनमुळे उद्रेक होईल, पंकजा मुंडे म्हणतात, पर्याय काय?

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मात्र सरकारच्या भूमिकेशी सहमती दर्शवणारं आणि स्वपक्षीय नेत्यांच्या भूमिकेशी परस्पर विरोधी मत मांडलं आहे.

Maharashtra Lockdown : फडणवीस म्हणाले, लॉकडाऊनमुळे उद्रेक होईल, पंकजा मुंडे म्हणतात, पर्याय काय?
लॉकडाऊनबाबत देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांची परस्पर विरोधी भूमिका
Follow us
| Updated on: Apr 10, 2021 | 8:19 PM

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात कडक लॉकडाऊन निश्चित असल्याचं आता मानलं जात आहे. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: त्याबाबत संकेत दिले आहेत. राज्यात लॉकडाऊन लावण्याबाबत दोन दिवसांत निर्णय होणार आहे. मात्र, लॉकडाऊन लावताना आधी लोकांचा विचार करा, हातावर पोट असणाऱ्यांसाठी एखादं पॅकेज जाहीर करा, अशी भूमिका भाजप नेत्यांनी मांडली आहे. मात्र, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मात्र सरकारच्या भूमिकेशी सहमती दर्शवणारं आणि स्वपक्षीय नेत्यांच्या भूमिकेशी परस्पर विरोधी मत मांडलं आहे. (Pankaja Munde’s pro-government and anti-party stance on lockdown)

“Lockdown मुळे जरी गरिबांची, व्यापाराची, economy ची परिस्थिती कठीण होईल तरी पर्याय काय आहे?? Coronaची साखळी कशी तोडणार??मजुर आणि उद्योजकांना नोकरदारांना विश्वास देणे आवश्यक आहे.आरोग्य यंत्रणा वरील भार हा गांभीर्याने घेण्याची गरज आहे”, असं ट्वीट पंकजा मुंडे यांनी केलंय. एकीकडे भाजपने लॉकडाऊन करायचा असेल तर आधी गरीब जनता, व्यापारी, छोटे व्यवसायिक, हातावर पोट असणाऱ्यांसाठी काही ठोस भूमिका घ्या, पॅकेज जाहीर करा अशी मागणी केली आहे. तरच भाजप लॉकडाऊनबाबत सकारात्मक विचार करेल असं देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे मात्र पंकजा मुंडे यांनी Lockdown मुळे जरी गरिबांची, व्यापाराची, economy ची परिस्थिती कठीण होईल तरी पर्याय काय आहे? असा प्रश्न विचारला आहे.

देवेंद्र फडणवीसांचं मत काय?

कोरोनाचा प्रादुर्भाव किती दिवस असेल हे सांगता येत नाही. त्यामुळे व्यवस्था तत्काळ उभ्या कराव्या लागतील. जनतेची, व्यापाऱ्यांची भावना लक्षात घ्यायला हवी. त्यांचं मागील वर्ष वाया गेले. कर, वीज बिल, कर्जाचे हप्ते भरावे लागले. त्यामुळे जीवन जगायचं कसं असा प्रश्न जनतेसमोर आहे, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय बैठक मांडलं आहे. त्याचबरोबर कोरोना रिपोर्ट्स तात्काळ कसे मिळतील हे पाहावं लागेल. रेमडेसिव्हीर कसं उपलब्ध होतील हे पाहिलं पाहिजे, असंही फडणवीस म्हणाले.

‘आमदारांचा निधी कमी करा, कामगारांना मदत द्या’

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलताना महत्वाचं मत मांडलं आहे. राज्यातील आमदारांचा विकासनिधी 2 कोटी रुपयांनी कमी करा आणि कामगारांना 5 हजार रुपये द्या, अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी मांडली आहे. तत्पूर्वी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनीही लॉकडाऊनचा विचार करायचा असेल तर आधी लोकांचा विचार करा, असं मत मांडलं आहे.

संबंधित बातम्या :

Maharashtra Lockdown : राज्यात लॉकडाऊन निश्चित! 2 दिवसांत निर्णय होणार, निर्बंध 8 की 14 दिवस?

Maharashtra Lockdown : मुख्यमंत्री लॉकडाऊनसाठी आग्रही, काँग्रेसची भूमिका काय?

Pankaja Munde’s pro-government and anti-party stance on lockdown

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.