लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांचा निर्णय अंतिम; पुणे, पिंपरी-चिंचवडसाठी वेगळा विचार- अजित पवार

काही भागात शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात वेगळ्या बातम्या आल्या त्यामुळे समज-गैरसमज निर्माण झाल्याचं अजित पवार म्हणाले.

लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांचा निर्णय अंतिम; पुणे, पिंपरी-चिंचवडसाठी वेगळा विचार- अजित पवार
अजित पवार, उपमुख्यमंत्री
Follow us
| Updated on: Jun 04, 2021 | 9:36 PM

अश्विनी सातव-डोके, टीव्ही 9 मराठी, पुणे : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन हटवण्याबाबत आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या बैठकीत तत्त्वत: मान्यता देण्यात आली. त्याबाबत खात्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घाईघाईत पत्रकार परिषद घेत घोषणा केली आणि एकच संभ्रम निर्माण झाला. वडेट्टीवारांच्या पत्रकार परिषदेनंतर मुख्यमंत्री कार्यालयानं एक निवेदन जारी करत नवे नियम फक्त विचाराधीन असल्याचं सांगितलं. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील तोच अंतिम निर्णय असेल असं स्पष्ट केलं आहे. काही भागात शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात वेगळ्या बातम्या आल्या त्यामुळे समज-गैरसमज निर्माण झाल्याचं अजित पवार म्हणाले. (CM Uddhav Thackeray will take the final decision regarding Unlock)

राज्यातील काही भागात शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवस जाऊ देऊन सोमवारी तो जाहीर होईल. ग्रामीण भागातील रुग्णसंख्या कमी होत नसल्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये वेगळा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिलीय. त्याचबरोबर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत नियोजन सुरु आहे. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवरील उपाचाराची बिलं भलीमोठी येत होती. पण आता सरकार रुग्णालयात या रुग्णांवर मोफत उपचार होत आहेत. तसंच खासगी रुग्णालयांनाही दर ठरवून दिले आहेत. त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळेल, असंही अजित पवार म्हणाले. त्याचबरोबर म्युकरमायकोसिसवरील इंजेक्शन्सची अजून कमतरता असल्याचंही त्यांनी सांगितलं.

खडकी कॅन्टॉन्मेंट आणि पुणे कॅन्टॉन्मेंट हे पुणे शहरात धरले जात नाही. त्यामुळे पुण्याला जे नियम लागू होतात ते इथे लागू होत नाहीत. पण आता या दोन्ही कॅन्टॉन्मेंटमध्ये पुणे शहरात जे नियम लागू असतील ते लागू करण्याचे आदेस दिले असल्याची माहितीही अजित पवार यांनी दिलीय.

वारीसाठी स्वतंत्र कमिटी नियुक्त

आषाढी वारीबाबतही अजित पवारांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत वारीसंदर्भात एक कमिटी नियुक्त करण्यात आली आहे. कुंभ मेळ्यानंतर कोरोनाचं संकट वाढल्याचं आपण पाहिलं. वारकऱ्यांनाही ते समजून सांगण्यात आलं. पण वारकऱ्यांचं म्हणणं आहे म्हणून अजून एक संधी देऊन पालखी सोहळ्याचं नियोजन करण्यासाठी समिती गठीत केली आहे. विभागीय आयुक्त, तिन्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचा समावेश या कमिटीमध्ये असेल. या कमिटीचा निर्णय आल्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन वारीबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती अजितदादांनी दिलीय.

‘खेडमधील वाद चर्चेतून मिटवू’

महाविकास आघाडीने सरकारमध्ये काम करताना वरिष्ठ पातळीवर एकोप्यानं राहण्यांचं ठरवलं आहे. तो तळागाळापर्यंत वेळ लागतो. आम्ही राष्ट्रवादीच्या खेडमधील पदाधिकाऱ्यांना सांगू. शिवसेनेनंही तिथल्या पदाधिकाऱ्यांना सांगून हा वाद मिटवला जाईल, असंही अजित पवार यांनी म्हटलंय.

संबंधित बातम्या :

Maharashtra Lockdown Update : ठाकरे सरकारचा गोंधळात गोंधळ, निर्बंध अद्याप हटवले नाहीत, CMO चं स्पष्टीकरण

Maharashtra 5 level unlock plan : 5 टप्पे नेमके कसे? कोणत्या टप्प्यात काय सुरु, काय बंद? सर्व प्रश्नांची उत्तरे

CM Uddhav Thackeray will take the final decision regarding Unlock

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.