ईडीची नोटीस, अनिल परब घाईघाईत संजय राऊतांच्या भेटीला, दहा मिनिटात त्याच वेगाने माघारी!
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना ईडीने (ED) धाडी टाकल्यानंतर महाविकास आघाडी आणि शिवसेनेच्या हालचाली वाढल्या आहेत. राजकीय द्वेषातून धाडी टाकल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.
मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना ईडीने (ED) धाडी टाकल्यानंतर महाविकास आघाडी आणि शिवसेनेच्या हालचाली वाढल्या आहेत. राजकीय द्वेषातून धाडी टाकल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. या पार्श्वभूमीवर अनिल परब यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. संजय राऊत यांच्या भेटीसाठी अनिल परब सामना कार्यालयात पोहोचले.
ईडीने पाठवलेल्या नोटीसमुळे संजय राऊत आणि अनिल परब यांच्या भेटीकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या होत्या. अनिल परब घाईघाईने सामना कार्यालयात आले. त्यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. दोघांमध्ये केवळ दहा मिनिटे चर्चा झाली. त्यानंतर परब ज्या वेगाने आले, त्याच वेगाने ते परत गेले. यावेळी माध्यमांनी त्यांना प्रतिक्रियेसाठी विचारणा केली, पण काहीही न बोलता, अनिल परब घाईघाईत निघून गेले.
अनिल परब यांना ED ची नोटीस
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस बजावली आहे. याबाबतची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन दिली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेची नुकतीच सांगता झाली आहे. याआधी राणे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यात चांगलेच वादंग माजले होते. या सर्व गोष्टींवर पडदा पडत असतानाच आता परब यांना ईडीने नोटीस दिली आहे.
शिवसेना आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष टोकाला गेलेला असताना आता ईडीने परिवहनमंत्री अनिल परब यांना नोटीस जारी केली आहे. त्यांना ईडीने येत्या मंगळावरी म्हणजे 31 ऑगस्टला सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितलं आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 100 कोटी वसुली प्रकरणात परब यांना हे समन्स जारी करण्यात आलं आहे.
अनिल परब यांची प्रतिक्रिया
या नोटीसवर परब यांनी पहिली प्रतिक्रिया काल रविवारी दिली. “आज संध्याकाळी मला ईडीची नोटीस मिळाली आहे. त्यात कोणत्याही प्रकरणाचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे नोटीस कशासी संबंधित आहे, हे मला सांगता येणार नाही. जोपर्यंत प्रकरण कळत नाही तोपर्यंत काहीही सांगणं कठीण आहे. नोटीसमध्ये फक्त इन्व्हेस्टीगेशनचा पार्ट असल्याचा उल्लेख केला आहे. नोटीसला आम्ही कायदेशीर पद्धतीने उत्तर देऊ. मला कारणं कळली पाहिजे. मी या प्रक्रियेवर कायदेशीर पद्धतीने अभ्यास करुन ईडी चौकशीला सामोरं जाण्याबद्दल निर्णय घेईन. नोटीस कायदेशीर आलेली आहे त्याला कायदेशीर उत्तर दिलं जाईल. नोटीस मागचं कारण काय हे जेव्हा समजेल तेव्हा आम्ही उत्तर देऊ”, अशी प्रतिक्रिया अनिल परब यांनी दिली.
VIDEO : अनिल परब संजय राऊतांच्या भेटीसाठी सामना कार्यालयात
संबंधित बातम्या
Anil Parab ED Notice | परिवहनमंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस
अनिल परबांना ईडीची नोटीस, राऊत म्हणतात, वरच्या सरकारचं लव्ह लेटर आलं, नॉर्मल माणसं लढाया लढतात