AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोहरादेवीच्या चारही बाजूने बॅरिकेटिंग, केवळ 25 लोकांनाच परवानगी, पोलिसांच्या सूचना

पोहरादेवी मंदिर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. Sanjay Rathod Visit Pohradevi

पोहरादेवीच्या चारही बाजूने बॅरिकेटिंग, केवळ 25 लोकांनाच परवानगी, पोलिसांच्या सूचना
पोहरादेवीचे पीआय अनिल ठाकरे
| Updated on: Feb 23, 2021 | 9:07 AM
Share

वाशिम : पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे (Pooja Chavan) संकटात सापडलेले सापडलेले शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) आज पोहरादेवी (pohradevi) मंदिरात दर्शनाला जाणार आहेत. याच पार्श्वभूमीवर पोहरादेवी मंदिर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. (Maharashtra Minister Sanjay Rathod Visit Pohradevi A large contingent of police)

पोहरादेवी मंदिरात येणारे सर्व रस्ते पोलिसांनी केले बंद केले आहेत. बॅरिकेट लावून पोलिसांकडून रस्ते बंद केले आहेत. 200 पोलीस पोहरादेवी मंदिर परिसरात तैनात केले आहेत. तसंच मंदिर परिसरात गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांचे आटोकाट प्रयत्न सुरु आहेत.

वनमंत्री संजय राठोड पोहरादेवीत (Pohradevi) जोरदार शक्तीप्रदर्शन करणार असल्याच्या चर्चा आहेत तसंच पोहरादेवी येथे संजय राठोड बंजारा समाजाला उद्देशून भाषण करण्याची दाट शक्यता आहे. यासाठी जवळपास 15 ते 20 हजार लोक जमतील, अशी शक्यता पोहरादेवी संस्थानचे महंत जितेंद्र महाराज यांनी वर्तवली आहे.

फक्त 25 लोकांनाच परवानगी

महंतांच्या शक्यतेनंतर पोलिस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. पोहोरादेवीत 25 जणांपेक्षा जास्त लोकांना परवानगी नाही, असं पोहरादेवीचे पोलीस निरिक्षक अनिल ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं आहे.

पोहरादेवी येथे सध्या 200 पोलीस कर्मचारी आणि ४० अधिकारीतैनात आहेत. तसंच पोहोरादेवीच्या चारंही बाजूनं बॅरिकेटिंग केलं गेलं आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोहोरादेवीत चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरिक्षक अनिल ठाकरेंनी दिली आहे.

पोलिसांची पोहरादेवी संस्थानला नोटीस

संजय राठोड पोहरादेवी येथे आल्यानंतर मोठे शक्तीप्रदर्शन करणार असल्याचे म्हटले जात आहे. तर दुसरीकडे सध्या कोरोना संसर्ग वाढल्यामुळे सर्वत्र कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे पोहरागडावर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. येथे कोणत्याही कार्यक्रमाला फक्त 50 जणांना जमण्याची परवानगी आहे. पोलिसांनी पोहरादेवी संस्थानला तशी नोटीसही बजावली आहे. तसेच, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रत्येक मार्गावर कसून तपासणी केली जात आहे.

पोहरादेवी मंदिरात पूजा

पोहरादेवीत आल्यावर सुरुवातीला वनमंत्री संजय राठोड जगदंबा मातेचं दर्शन घेतील. त्यानंतर पोहरादेवीतील मंदिरात संजय राठोड यांच्या हस्ते पूजेचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती पोहरादेवीचे महंत जितेंद्र महाराज यांनी दिली.

(Maharashtra Minister Sanjay Rathod Visit Pohradevi A large contingent of police)

हे ही वाचा :

संजय राठोडांकडून जोरदार शक्तीप्रदर्शनाची शक्यता; पोहोरादेवीत 15-20 हजारांची गर्दी जमण्याचा अंदाज, भाषणासाठी स्टेज?

जगदंबेचं दर्शन घेऊन संकटनिवारणाचं साकडं, संजय राठोड पोहरादेवीच्या दर्शनाला

भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.