Sanjay Rathod Resignation Live Updates: पोलीस महासंचालक हेमंत नगराळे पुण्यात दाखल, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची माहिती घेणार

| Updated on: Mar 31, 2021 | 6:43 AM

संजय राठोड यांनी मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाकडे लक्ष लागलं आहे.

Sanjay Rathod Resignation Live Updates: पोलीस महासंचालक हेमंत नगराळे पुण्यात दाखल, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची माहिती घेणार
संजय राठोड

मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्या (Pooja Chavan Suicide Case) प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संजय राठोड यांनी मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा राजीनामा स्वीकारणार की नाकारणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राठोड यांच्या राजीनाम्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. पोलीस महासंचालक हेमंत नगराळे पुण्यात दाखल झाले असून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची माहिती घेणार असल्याचं कळतंय. (Shivsena Forest Minister Sanjay Rathod Resignation live updates Pooja Chavan Suicide Case Pune Police)

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 16 Feb 2021 03:17 PM (IST)

    पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोग गंभीर, पुणे पोलिसांकडून अहवाल मागवला

    – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण,

    – पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोग गंभीर,

    – प्रकरणाचा सविस्तर अहवाल पाठवण्याचे महिला आयोगाचे पुणे पोलिसांना आदेश,

    – पुणे पोलीस लवकर राष्ट्रीय महिला आयोगाला अहवाल सादर करणार,

    – सध्या अहवालावर काम सूरु असल्याची माहिती.

  • 16 Feb 2021 03:11 PM (IST)

    संजय राठोडांची भूमिका शांत राहण्याची, राजीनाम्याची माहिती चुकीची: संजय राऊत

    महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे. कायद्यानुसार तपास सुरु आहे. मुख्यमंत्र्यांनी तापासाचे आदेश दिले आहेत. संजय राठोड शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत. विदर्भातील शिवसेनेचा चेहरा आहेत. विरोधी पक्ष म्हणून हवेत गोळीबार करु नये. संजय राठोडांची भूमिका शांत राहण्याची आहे. वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची माहिती चुकीची असल्याचं वक्तव्य शिवसेना खासदर संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

  • 16 Feb 2021 02:30 PM (IST)

    पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीत ‘दूध का दूध, पाणी का पाणी होईल’: गुलाबराव पाटील

    जळगाव शिवसेना नेते तथा राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याची मला आताच माहिती मिळाली. त्यांचे नाव पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणात घेतले जात सल्याने त्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा पक्षाकडे दिला आहे. त्यावर मुख्यमंत्री निर्णय घेतील. येणाऱ्या काळात या प्रकरणाच्या चौकशीत ‘दूध का दूध, पाणी का पाणी होईल’, असे मत राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले आहे. मंत्री गुलाबराव पाटील हे आज (मंगळवारी) जळगावात होते.

  • 16 Feb 2021 12:14 PM (IST)

    पोलीस महासंचालक हेमंत नगराळे पुण्यात, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची माहिती घेणार

    पूजा चव्हाण प्रकरणाची पूर्ण माहिती घेण्यासाठी आज राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे पुण्यात दाखल झाले आहेत.

  • 16 Feb 2021 11:56 AM (IST)

    संजय राठोड यांच्या राजीनाम्याबद्दल माहिती नाही, कृषीमंत्री दादा भुसे

    संजय राठोड प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. या प्रकरणात जी चौकशी होईल त्यातून सत्य बाहेर येईल. राजीनाम्याबाबत मला काहीही माहिती‌नाही जी वस्तुस्थिती आहे ती चौकशीनंतर समोर येईल, असं कृषी मंत्री दादा भुसे म्हणाले

  • 16 Feb 2021 10:53 AM (IST)

    संजय राठोड यांच्या समर्थनार्थ दिग्रस येथे निषेध रॅलीचं आयोजन

    पूजा चव्हाण अत्महत्या प्रकरणात बंजारा समाजाचे नेते वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर करून बंजारा समाजाची बदनामी होत आहे. त्याविरोधात वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी इथल्या महंतांनी बैठक घेऊन वनमंत्री संजय राठोड यांच्या पाठीशी खंबीरपणे समाज उभा असल्याचं म्हटलं आहे. समाजाची बदनामी थांबवावी असे आवाहन त्यांनी केले होते. आज त्या अनुषंगाने संजय राठोड याच्या समर्थानात यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस इथं बंजारा समाज समन्वय समितीच्या वतीने पोहरादेवी इथल्या सुनील महाराज व जिंतेंद्र महाराज यांच्या नेतृत्वाखाली वसंत शास्त्री पुतळा जवळून निषेध रॅली काढण्यात येणार आहे

  • 16 Feb 2021 10:48 AM (IST)

    निष्पक्ष चौकशीसाठी संजय राठोड यांचा राजीनामा,सूत्रांची माहिती

  • 16 Feb 2021 10:40 AM (IST)

    पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न: अतुल भातखळकर

    पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला, असं वक्तव्य भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केलं आहे.

  • 16 Feb 2021 10:38 AM (IST)

    राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवणार का? प्रविण दरेकर यांचा सवाल

  • 16 Feb 2021 10:34 AM (IST)

    राजीनामा देऊन काय मेहेरबानी केली नाही. त्यांना राजीनामा द्यायलाच लागणार होता : निलेश राणे

    राजीनामा देऊन काय मेहेरबानी केली नाही. त्यांना राजीनामा द्यायलाच लागणार होता. पण आता इथून पुढे चौकशी कशी होणार? याकडे विरोधी पक्षाचं विशेष लक्ष आहे.  राठोड यांच्यावर गुन्हाही दाखल व्हावा, अशी मागणीही निलेश राणे यांनी केली. वनमंत्र्यांनी राजीनामा दिला मात्र तो राजीनामा उद्धव ठाकरे स्वीकारणार का, हे ही पाहावं लागेल, असंही निलेश राणे म्हणाले.

  • 16 Feb 2021 10:32 AM (IST)

    संजय राठोड यांच्या राजीनाम्याबाबत माहिती नाही: संजय राऊत

    वनमंत्री संजय राठोड हे शिवसेनेचे मोठे नेते आहेत. त्यांच्या राजीनाम्याबाबत मला माहिती नाही. संजय राठोड विदर्भातील शिवसेनेचे मोठे नेते, पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.

  • 16 Feb 2021 10:28 AM (IST)

    पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी पुणे पोलिसांनी तीन पथकं तैनात

    पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण,

    – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी पुणे पोलिसांनी तीन पथकं तैनात,

    – पुणे शहर आणि राज्यातील इतर भागात पथकं चौकशीसाठी रवाना,

    – तपास पूर्ण झाल्याशिवाय गुन्हा दाखल करणार नसल्याची पुणे पोलिसांची माहिती.

  • 16 Feb 2021 10:25 AM (IST)

    मुख्यमंत्र्यांनी वनमंत्र्यांचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करावा : प्रविण दरेकर

    मुख्यमंत्र्यांनी वनमंत्र्यांचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करावा: प्रविण दरेकर

Published On - Feb 16,2021 3:17 PM

Follow us
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.