ओबीसींचं राजकीय आरक्षण का गेलं?, मंत्री विजय वडेट्टीवार यांचा सर्वांत मोठा दावा
ओबीसी नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केलाय. केंद्र सरकारमुळेच ओबीसी आरक्षण गेल्याचा आरोप करत केंद्राला 9 पत्रे पाठवूनही केंद्राने इंपेरिकल डाटा दिला नाही, त्यामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण गेलं, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
औरंगाबाद : ओबीसी आरक्षण कुणामुळे गेलं?, यावरुन आतापर्यंत सत्ताधारी आणि विरोधकांनी बरेच आरोप प्रत्यारोप करुन झाले आहेत. आता ओबीसी नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मोठा दावा केलाय. केंद्र सरकारमुळेच ओबीसी आरक्षण गेल्याचा आरोप करत केंद्राला 9 पत्रे पाठवूनही केंद्राने इंपेरिकल डाटा दिला नाही, त्यामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण गेलं, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
केंद्रामुळेच ओबीसींचं राजकीय आरक्षण गेलं
विजय वडेट्टीवार आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी ओबीसी आरक्षणावरच्या एका प्रश्नाला उत्तर देताना आरक्षण गेलं याला केंद्र सरकार कारणीभूत असल्याचा आरोप करत, 9 पत्रे पाठवूनही केंद्राने इंपेरिकल डाटा दिला नाही, म्हणूनच ओबीसींचं आरक्षण गेल्याचं ते म्हणाले.
…तर ओबीसींचं आरक्षण टिकलं असतं!
ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आहे. राजकीय आरक्षण टिकलं पाहिजे ही सरकारची भूमिका आहे. डाटा मिळवण्यासाठी आमच्यासह विरोधी पक्षानेही प्रयत्न केले पण केंद्राने तो डाटा दिला नाही. जर तो डेटा मिळाला असता तर ओबीसी आरक्षण टिकलं असतं, असा दावाही वडेट्टीवार यांनी केला. कपिल सिब्बल यांच्यामार्फत आम्ही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे आणि आम्हाला डाटा देण्याची मागणी केली आहे, असंही वडेट्टीवार यांनी सांगितलं.
संघर्षाशिवाय ओबीसी समाजाला काहीही मिळालं नाही
महाराष्ट्रातील ओबीसी आता आपल्या हक्कासाठी, त्यांच्या संरक्षणासाठी एकत्र येताना दिसत आहे, ही चांगली गोष्ट आहे. संघर्षाशिवाय ओबीसी समाजाला काहीही मिळालं नाही, असं वडेट्टीवार म्हणाले.
महाज्योतीसाठी 40 कोटी रुपये आम्हाला मिळाले आहेत. लवकरच औरंगाबादला महाज्योतिचे उपकेंद्र सुरु करण्याचे आदेश आम्ही दिले आहेत. महाज्योतीमधून यूपीएससीसाठी एक हजार मुलांना सिलेक्ट करण्याचं आम्ही ठरवलं आहे. महाज्योतीसाठी 15 दिवसांत जागेचा प्रश्न सोडवणार आहोत, अशी ग्वाहीदेखील वडेट्टीवार यांनी दिली.
((Maharashtra Minister Vijay Wadettiwar Allegation Modi GOVT Over OBC Reservation))
हे ही वाचा :
राष्ट्रीय ओबीसी महासंघांचं आज नागपुरात अधिवेशन, ओबीसींची पुढची लढाई कशी, विचारमंथन होणार