विधान परिषदेची रणधुमाळी, सतेज पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार, कोल्हापूरमध्ये हाय व्होल्टेज लढत

राज्यातील विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरु झालीय. यामध्ये सर्वाधिक लक्षवेधी लढत कोल्हापूरच्या जागेची आहे.

विधान परिषदेची रणधुमाळी, सतेज पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार, कोल्हापूरमध्ये हाय व्होल्टेज लढत
सतेज पाटील, काँग्रेस नेते
Follow us
| Updated on: Nov 18, 2021 | 8:13 AM

कोल्हापूर: राज्यातील विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरु झालीय. यामध्ये सर्वाधिक लक्षवेधी लढत कोल्हापूरच्या जागेची आहे. कारण, विकास आघाडीकडून गृहराज्यमंत्री सतेज पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महाविकास आघाडीचे नेते अर्ज दाखल करताना उपस्थित राहणार आहेत. तर, भाजपकडून अमल महाडिक यांना उमेदवारी देण्यात येणार असल्यानं विधान परिषद निवडणुकीत रंगत आलीय.

राष्ट्रवादी आणि सेनेचे मंत्री उपस्थित राहणार

गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील आज कोल्हापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार संजय मंडलिक यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल केल्यानंतर जिल्हा परिषदेतील महा विकास आघाडीच्या सदस्यांचा मेळावा होणार आहे.

कोल्हापूरमधील आकडेवारी काय सांगते?

विधान परिषद निवडणुकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 421 मतदार आहेत. यातील पाच जण मयत असल्याने 416 मतदार मतदानासाठी पात्र आहेत. भाजपकडे सध्या कोरे आणि आवाडे गटाला एकत्र करत 160 मत आहेत. तर, महाविकास आघाडी कडे जवळपास 250 मत आहेत. म्हणजेच विजयासाठी भाजपला आणखी 50 ते 60 मतांची गोळाबेरीज करावी लागणार आहे.

सतेज पाटील राखणार गड की अमल महाडिक ठरणार वरचढ

राज्यातील विधान परिषदेच्या सहा जागांसाठी 10 डिसेंबरला मतदान होणार आहे. सतेज पाटील विरुद्ध महाडिक एक पारंपारिक प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा आमने-सामने आलेत. महा विकास आघाडीकडून राज्यमंत्री सतेज पाटील या निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं होम ग्राऊंड असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील या जागेसाठी भाजपनं देखील अमल महाडिक यांना उमेदवारी देत कंबर कसली आहे.

इतर बातम्या:

Weather Forecast : कोकण, पश्चिम महाराष्ट्र ते मराठवाडा ते विदर्भात पाच दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, पुणे वेधशाळेचा अंदाज

कधी नाना पटोलेंचा फोटो असलेल्या कार्यालयावर शरद पवार यांचा फोटो, राष्ट्रवादीच्या विभागीय ऑफिसचं उद्घाटन

Maharashtra MLC Election 2021 Kolhapur vidhan parishad congress leader satej patil file nomination today

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.