BMC Election 2022 : मुंबई महापालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर, प्रभाग 114 मध्ये काय स्थिती, वाचा…
मुंबई महापालिकेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. प्रभाग 114 मध्ये काय स्थिती आहे? पाहुयात...
मुंबई : मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक (Mumbai Municipal Corporation) दरवर्षी पेक्षा वेगळी आणि निर्णायक ठरणार आहे. कारण राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांचा परिणाम या येत्या महानगरपालिका निवडणुकांवर दिसणार आहेत. ज्या ठिकाणी शिवसेनेचे (Shivsena) उमेदवार विजयी झाले आहेत किंवा ज्या ठिकाणी भाजपचे (BJP) उमेदवार विजयी झाले आहेत, ज्या उमेदवारांना आपला मतदार संघ हा पारंपरिक आहे असं वाटत होतं, त्या उमेदवारांसाठी मात्र यंदाची महानगरपालिका निवडणूक जड तर जाणारच आहे मात्र पाच वर्षांनी घेतल्या जाणाऱ्या निवडणुकीपेक्षा धक्कादायक निकाल असणार आहेत एवढं मात्र नक्की आहे. यावर्षीच्या महानगरपालिकांचा निकाल सगळ्यांसाठी धक्कादायक असणार आहे. कारण राज्यातील राजकीय समीकरणं बदलली असून त्याचा फटका मुंबई महानगरपालिका निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे. आतापासूनच सगळ्या पक्षांनी निवडणुकीसाठी फिल्डींग लावण्यास सुरुवात केली असली तरी जिंकणार कोण हे निवडणुकीनंतरच स्परष्ट होईल. प्रभाग क्रमांक 114 मध्ये काय स्थिती आहे, पाहुयात…
प्रभाग व्याप्ती
टाटानगर, किर्तीनगर, फ्रेंड्स कॉलनी, भांडूप व्हिलेज, भवानी नगर या भागात हा प्रभाग पसरलेला आहे. गोरेगाव-मुलुंड लिंक रोड, पूर्वद्रुतगती मार्ग, कांजूरमार्ग डंपिंग ग्राऊंड, ठाणे खाडी या ठिकाणांमध्ये मोडतो.
2017 चा निकाल
शिवसेना रमेश गजानन कोरगावकर 9887
मनसे अमिषा माजगावकर 8302
भाजप मिलिंद कोरगावकर 1773
राष्ट्रवादी विलास मर्गज 1405
काँग्रेस राजेंद्र सावंत 437
पक्ष | उमेदवाराचे नाव | विजयी उमेदवार |
---|---|---|
शिवसेना | ||
काँग्रेस | ||
भाजप | ||
राष्ट्रवादी | ||
मनसे | ||
अपक्ष |