AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AMC Election 2022, Ward 23 : भाजप ‘मिशन अकोला’ची पुनरावृत्ती करणार का? बालेकिल्ल्यात आव्हान देण्याच्या विरोधकांच्या हालचाली

मागील निवडणुकीत महापालिकेवर सत्ता मिळवून कमाल करणारा भाजप यंदाच्या निवडणुकीत आपल्या पदरी आणखी जागा पाडून घेतो की, भाजपच्या बहुमताला काँग्रेस, शिवसेनेकडून धक्का दिला जातोय, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

AMC Election 2022, Ward 23 : भाजप 'मिशन अकोला'ची पुनरावृत्ती करणार का? बालेकिल्ल्यात आव्हान देण्याच्या विरोधकांच्या हालचाली
अकोला महापालिका निवडणूकImage Credit source: TV9
| Updated on: Aug 21, 2022 | 12:30 PM
Share

अकोला : केंद्रापाठोपाठ राज्यात सत्ता स्थापन करण्यात यशस्वी झालेल्या भाजपने सध्या महापालिका निवडणुकांचा गड आपल्याकडे राखण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यातही पश्चिम विदर्भात पक्ष संघटना मजबूत करण्यावर भाजपने विशेष भर दिल्याचे चित्र आहे. याचदरम्यान अकोला महापालिकेची निवडणूक (Akola Municipal Corporation Election) होत आहे. ही निवडणूक प्रतिष्ठेची मानून भाजप (BJP)ने भक्कम रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. पश्चिम विदर्भाच्या आपल्या बालेकिल्ल्यात विरोधकांची गणिते यशस्वी होऊ न देण्याचा निर्धारच भाजपने केल्याचे बोलले जात आहे. अकोला आणि परिसरात सहकाराचे जाळे विस्तारले आहे. याच सहकाराच्या माध्यमातून मतदारांवर आपली छाप पाडण्यात भाजपने यश मिळवले आहे. आता या जोरावर अकोला महापालिकेची सत्ता आपल्या हाती राखण्यास भाजपने आटोकाट प्रयत्न सुरु ठेवले आहेत. मागील म्हणजेच 2017 च्या निवडणुकीत भाजपने ‘मिशन अकोला‘ राबविले होते. त्यावेळी 80 पैकी 48 जागांवर विजय मिळवून भाजपने ‘मिशन अकोला’ (Mission Akola) फत्ते केले होते. त्याच विजयाने भाजपाला यंदाच्या निवडणुकीसाठी मोठा उत्साह लाभला आहे. त्यामुळे भाजप ‘मिशन अकोला’ची पुनरावृत्ती करतोय का? विरोधक भाजपाला बालेकिल्ल्यात आव्हान देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अकोला महापालिका वॉर्ड 23 अ

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
भाजप
मनसे
अपक्ष/इतर

नवीन प्रभागरचनेनुसार बदल

अकोला महापालिकेचे पूर्वी 20 प्रभाग होते. आता त्यात दहाची भर पडून एकूण 30 प्रभाग झाले आहेत. यापैकी 29 प्रभाग तीन सदस्यीय असणार आहेत, तर 30 वा प्रभाग चार सदस्यीय असणार आहे. पालिकेच्या सर्व 30 प्रभागांतून एकूण 91 सदस्य निवडून महापालिकेवर जाणार आहेत.

प्रभाग क्रमांक 23 ची लोकसंख्या

एकूण लोकसंख्या – 19118 अनुसूचित जाती प्रवर्गातील लोकसंख्या – 3111 अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील लोकसंख्या – 395

अकोला महापालिका वॉर्ड 23 ब

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
अपक्ष/इतर

प्रभाग क्रमांक 23 मधील अंतर्भूत असलेले विभाग

अकोला महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 23 मध्ये सिंधी कॅम्प पक्की खोली, सिंधी कॅम्प कच्ची खोली, कैलास टेकडी, निमवाडी या प्रमुख विभागांचा समावेश होतो.

2017 च्या सार्वत्रिक निवडणुकीतील पक्षीय बलाबल

भारतीय जनता पक्ष – 48 राष्ट्रीय काँग्रेस (INC) – 13 शिवसेना (SS) – 08 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) – 05 भारिप बहुजन महासंघ (BBM) – 03 ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) – 01 अपक्ष/इतर – 02

अकोला महापालिका वॉर्ड 23 क

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
अपक्ष/इतर

मागील निवडणुकीत महापालिकेवर सत्ता मिळवून कमाल करणारा भाजप यंदाच्या निवडणुकीत आपल्या पदरी आणखी जागा पाडून घेतो की, भाजपच्या बहुमताला काँग्रेस, शिवसेनेकडून धक्का दिला जातोय, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.