KDMC Election 2022, Ward 32 : प्रभाग क्रमांक 32 मध्ये कुठल्या राजकीय पक्षाची ‘नारीशक्ती’ बाजी मारणार?; सर्वच राजकीय पक्षांच्या जोरदार हालचाली

कल्याण डोंबिवली परिसरात त्यांचा दबदबा आहे. त्यामुळे मूळ शिवसेनेची पालिकेच्या निवडणुकीत कसोटी लागणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पालिकेच्या प्रत्येक प्रभागातील निवडणुकीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.

KDMC Election 2022, Ward 32 : प्रभाग क्रमांक 32 मध्ये कुठल्या राजकीय पक्षाची 'नारीशक्ती' बाजी मारणार?; सर्वच राजकीय पक्षांच्या जोरदार हालचाली
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 16, 2022 | 11:25 AM

कल्याण : महाराष्ट्रात यंदा अनेक प्रमुख महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणे तसेच 2024 ची लोकसभा निवडणूक या पार्श्वभूमीवर महापालिकांच्या निवडणुका (Municipal Corporation Election) सर्वच राजकीय पक्षांनी गांभीर्याने विचारात घेतल्या आहेत. त्याच दृष्टीकोनातून या निवडणुकांची रणनीती आखली जात आहे. त्यातही बृहन्मुंबई महापालिका निवडणूक तसेच ठाण्यातील पालिकांच्या निवडणुका याकडे सर्व पक्षांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुक (Kalyan-Dombivali Municipal Corporation Election)ही राजकीय पक्षांच्या प्रतिष्ठेचा फैसला करणार आहे. सध्या या महापालिकेवर शिवसेनेचा भगवा होता. परंतु गेल्या काही महिन्यांत बदललेल्या राजकीय समीकरणामुळे शिवसेना (Shivsena) पक्ष ही पालिका आपल्याकडे कसा राखतोय, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शिवसेनेत बंड पुकारून एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र बाणा दाखवला आहे. कल्याण डोंबिवली परिसरात त्यांचा दबदबा आहे. त्यामुळे मूळ शिवसेनेची पालिकेच्या निवडणुकीत कसोटी लागणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पालिकेच्या प्रत्येक प्रभागातील निवडणुकीमध्ये रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. प्रभाग क्रमांक 32 मध्येही ‘कांटे की टक्कर’ होण्याची चिन्हे आहेत. त्याच अनुषंगाने या प्रभागातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर टाकलेला हा एक दृष्टीक्षेप.

कल्याण-डोंबिवली महापालिका वॉर्ड 32 अ

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
अपक्ष/इतर

प्रभाग क्रमांक 32 ची लोकसंख्या

एकूण लोकसंख्या – 31118 अनुसूचित जातीची लोकसंख्या – 820 अनुसूचित जमातीची लोकसंख्या – 149

कल्याण-डोंबिवली महापालिका वॉर्ड 32 ब

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
अपक्ष/इतर

प्रभागाची हद्द कोठून कुठपर्यंत आहे?

हे सुद्धा वाचा

जयहिंद कॉलनी गणेशनगर या नावाने ओळखला जाणाऱ्या प्रभाग क्रमांक 32 ची मोठी व्याप्ती आहे. या प्रभागामध्ये तुलसी राय विहार, कुंडलिक भवन इमारत, नित्यानंद भवन, नव रविराज सोसायटी, प्रगती संकुल, वीर अर्जुन सोसायटी, न्यू जम्बो सोसायटी, लक्ष्मण रेखा इमारत, चंद्रलोक सोसायटी, गोविंद निवास या प्रमुख भागांचा समावेश आहे. उत्तरेला पंडित दीनदयाळ व रेतीबंदर चौकापासून प्रेरणा सोसायटीपर्यंत, पूर्वेला प्रेरणा सोसायटीपासून डोंबिवली रेल्वे स्थानक मध्य रेल्वे लाईनपर्यंत, दक्षिणेला डोंबिवली रेल्वे स्थानक मध्य रेल्वे लाईनपासून जुनी डोंबिवली रस्त्याच्या मध्य रेल्वे लाईनपर्यंत, पश्चिमेला मध्य रेल्वे लाईनपासून पंडित दीनदयाळ व रेतीबंदर चौकापर्यंत.

कल्याण-डोंबिवली महापालिका वॉर्ड 32 क

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजप
राष्ट्रवादी
काँग्रेस
मनसे
अपक्ष/इतर

प्रभाग क्रमांक 32 मधील आरक्षण कसे आहे?

महापालिकेचे एकूण 44 वॉर्ड असून या वॉर्डमधून 133 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. यापैकी 58 जागा सर्वसाधारण महिलांसाठी, 7 जागा अनुसूचित जाती प्रवर्ग तर 2 जागा अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित आहेत. तसेच 6 जागा अनुसूचित जाती आणि 2 जागा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव असतील. 58 जागा खुल्या प्रवर्गासाठी असणार आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या या आरक्षण सोडतीनुसार प्रभाग क्रमांक 32 मधील वॉर्ड 32 अ आणि 32 ब हे दोन वॉर्ड सर्वसाधारण महिला उमेदवारांसाठी राखीव असतील. त्यामुळे राजकीय पक्षांनी या दोन जागांवर लोकप्रिय महिला उमेदवार रिंगणात उतरवण्याची जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 32 ची निवडणूकदेखील संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेणार हे निश्चित आहे.

Non Stop LIVE Update
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड.
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल.
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?.
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?.
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?.
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?.