AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SMC Election 2022 ward 15: सोलापूर महापालिका निवडणूक, प्रभाग क्रमांक 15 मध्ये पुन्हा काँग्रेसची साथ प्रभावी ठरणार का?

सध्या महाराष्ट्रातील राजकारणात मोठे बदल घडल्याने स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणं देखील बदलली आहेत. त्यामुळे सोलापूर महापालिकेतील प्रभागांत कोणत्या राजकीय पक्षांचं वर्चस्व राहिल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

SMC Election 2022 ward 15: सोलापूर महापालिका निवडणूक, प्रभाग क्रमांक 15 मध्ये पुन्हा काँग्रेसची साथ प्रभावी ठरणार का?
सोलापूर महापालिकाImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 27, 2022 | 7:00 AM
Share

सोलापूरः राज्यभरातील 14 महानगरपालिकांची निवडणूक (Municipal corporation) पहिल्या टप्प्यात होणार आहे. यात सोलापूर महापालिकेचीही निवडणूक होऊ घातली आहे. राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला जोरदार धक्का देत एकनाथ शिंदे यांनी मोठं बंड केलं. त्यानंतर शिंदे गटाची (Eknath Shinde Group) शिवसेना आणि भाजप यांचे नवे सरकार नुकतेच स्थापन झाले आहे. राज्यातील शिवसेनेत उभी फूट पडली असून याचे पडसाद आगामी महापालिका निवडणुकांवरही होणार आहेत. सोलापूर महापालिका निवडणुकीतही याचे परिणाम दिसू शकतात. सोलापूर महापालिकेत यंदा 113 वॉर्ड असून तीन सदस्यीय प्रभाग रचना आहे. त्यामुळे महापालिकेत एकूण 38 प्रभाग आहेत. महापालिकेत 2017 च्या निवडणुकीत भाजपची सत्ता आहे. प्रभाग क्रमांक 15 चा विचार केल्यास येथे मात्र काँग्रेसची सत्ता होती. यंदा नव्याने प्रभाग रचना केलेली असल्याने आराखड्यात काही बदल झालेले असू शकतात. प्रभागात काही वेगळे परिसर जोडलेले असू शकतात. 2017 मधील निवडणुकांचा विचार करता, प्रभाग 15 चे गणित पुढीलप्रमाणे दिसून येते…

प्रभाग 15 ची लोकसंख्या कशी?

सोलापूर महापालिकेतील प्रभाग 15 मध्ये 23 हजार 921 एवढी लोकसंख्या आहे. यापैकी 1 हजार 67 एवढी अनुसूचित जाती तर 89 मतदार अनुसूचित जमातीतील आहेत.

प्रभाग 15 मध्ये कोणता परिसर?

सोलापूर महापालिकेतील प्रभाग 15 मध्ये जोडभावी पेठ भाग, रविवार पेठ भाग, साखर पेठ, सोमवार पेठ आदी परिसर येतो. पूर्वीची चार वॉर्डांची प्रभाग रचना यंदा तीन वॉर्डात करण्यात आळी आहे. त्यामुळे मागील निवडणुकांपेक्षा यंदा वेगळे परिणाम पहायला मिळण्याची शक्यता आहे.

2017 मध्ये कुणाची सत्ता?

सोलापूर महापालिकेची प्रभाग रचना यंदा नव्याने करण्यात आली आहे. तरीही यापूर्वी 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीचा विचार करता प्रभाग क्रमांक 15 मध्ये काँग्रेसची सत्ता होती. येथील चारही वॉर्डांमध्ये काँग्रेसचे नगरसेवक विजयी झाले होते.  तेव्हाचा निकाल असा-

  • प्रभाग क्रमांक 15अ- चेतन नरोटे- काँग्रेस
  • प्रभाग क्रमांक 15 ब- विनोद भोसले- काँग्रेस
  • प्रभाग क्रमांक 15 क-श्रीदेवी फुलारे- काँग्रेस
  • प्रभाग क्रमांक 15 ड- वैष्णवी करगुळे- काँग्रेस

सध्या महाराष्ट्रातील राजकारणात मोठे बदल घडल्याने स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणं देखील बदलली आहेत. त्यामुळे सोलापूर महापालिकेतील प्रभागांत कोणत्या राजकीय पक्षांचं वर्चस्व राहिल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

यंदाचे आरक्षण कसे?

सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीकरिता प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार प्रभाग क्रमांक 15 मधील वॉर्डांचे आरक्षण पुढीलप्रमाणे-

  • प्रभाग 15 अ- सर्वसाधारण महिलांकरिता
  • भाग 15 ब- सर्वसाधारण महिलांकरिता
  • प्रभाग 15 क-सर्वसाधारण

सोलापूर महापालिका निवडणूक प्रभाग 15 अ

पक्षउमेदवारविजयी-आघाडी
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
शिवसेना
मनसे
इतर

सोलापूर महापालिका निवडणूक प्रभाग 15 ब

पक्षउमेदवारविजयी-आघाडी
भाजप
शिवसेना
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

सोलापूर महापालिका निवडणूक प्रभाग 15 क

पक्षउमेदवारविजयी-आघाडी
भाजप
काँग्रेस
शिवसेना
राष्ट्रवादी
मनसे
इतर
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.