Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bihar Election Result ! बिहार देवेंद्रजींनी आणले, महाराष्ट्रालाही फडणवीसच पाहिजे; नितेश राणेंचं ट्विट

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड यश मिळाल्यानंतर महाराष्ट्र भाजपनेही राज्यात जल्लोष सुरू केला आहे. भाजपचे नेते नितेश राणे यांनी तर, बिहार देवेंद्रजींनी आणले, महाराष्ट्रालाही देवेंद्रजीच पाहिजे, असं ट्विट केलं आहे. (maharashtra needs devendra fadnavis again, says nitesh rane)

Bihar Election Result ! बिहार देवेंद्रजींनी आणले, महाराष्ट्रालाही फडणवीसच पाहिजे; नितेश राणेंचं ट्विट
Follow us
| Updated on: Nov 10, 2020 | 5:16 PM

मुंबई: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड यश मिळाल्यानंतर महाराष्ट्र भाजपनेही राज्यात जल्लोष सुरू केला आहे. भाजपचे नेते नितेश राणे यांनी तर, बिहार देवेंद्रजींनी आणले, महाराष्ट्रालाही देवेंद्रजीच पाहिजे, असं ट्विट केलं आहे. (maharashtra needs devendra fadnavis again, says nitesh rane)

बिहारमध्ये भाजप 73 जागांवर आघाडीवर आहे. या कलानुसार निकाल लागला तर भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येऊ शकतो. मात्र, भाजपने घेतलेल्या या अनपेक्षित आघाडीमुळे पक्षामध्ये एकच जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं आहे. आमदार नितेश राणे यांनी तर बिहार देवेंद्रजींनी आणले. आता महाराष्ट्रालाही देवेंद्रजीच पाहिजे. मी पुन्हा येणार… येणारच, असं ट्विट केलं आहे.

त्याआधी भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनीही बिहारच्या विजयाचं श्रेय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिलं होतं. “बिहार निवडणुकीत ज्या पद्धतीने भाजपनं संघटन उभारलं आणि पाच वर्षांत जे काम झालं. त्याचा परिणाम निकालावर झालेला दिसतो आहे. एनडीएला जनतेने भरभरून मते दिली आहेत. त्यामुळेच बिहारमध्ये एनडीएची सत्ता पुन्हा येणार असल्याचं दिसत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने बिहारमध्ये प्रचाराची धुरा सांभाळली त्याचेच यश बिहार निवडणुकीत दिसून येत आहे.” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते.

तर, फडणवीस यांच्या नियोजनाचा आणि अनुभवाचा आम्हाला मोठ्या प्रमाणावर फायदा झाला. सध्या येत असलेल्या कलानुसार भाजपने जोरदार मुसंडी मारलेली आहे. तिथे फडणवीसांच्या प्रचाराचा आम्हाला फायदा झाला, असं वक्तव्य बिहार भाजपचे प्रदेश प्रवक्ते संजय टायगर यांनी केलं आहे.

“बिहार निवडणुकीच्या प्रचारात देवेंद्र फडणवीस यांनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या, आक्रमक प्रचार केला. पक्षाची बाजू मांडली तसंच विरोधकांच्या चुकीच्या गोष्टींवर फडणवीसांनी बोट ठेवले. एकूणच प्रचार कार्यक्रमात फडणवीसांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या नियोजनाचा आणि अनुभवाचा आम्हाला मोठा फायदा झाला”, असं संजय टायगर म्हणाले.

भाजपने देवेंद्र फडणवीस यांची बिहारच्या प्रभारीपदी नियुक्ती केली होती. अधिकृतरित्या नियुक्ती होताच त्यांनी बिहार जिंकण्याचा इरादा बोलून दाखवला होता. “भारतीय जनता पक्षाने माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. त्या जबाबदारीला निश्चित न्याय देण्याचा प्रयत्न करेन, यंदाच्या निवडणुकीत एनडीए बहुमताने जिंकेल” असा दावा फडणवीस यांनी केला होता.

संबंधित बातम्या:

Bihar Election Result 2020 | फडणवीसांच्या नियोजनाचा आणि अनुभवाचा आम्हाला मोठा फायदा, बिहार भाजपची कृतज्ञता

फडणवीसांनी प्रचाराची धुरा सांभाळल्यानेच भाजपला बिहारमध्ये यश; चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा

भाजपच नव्हे बिहारमध्ये डाव्यांचीही हवा; 18 जागांवर घेतली आघाडी

(maharashtra needs devendra fadnavis again, says nitesh rane)

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.