‘शिवसेनेला शह देण्यासाठी मंत्री केलं की कशासाठी माहिती नाही, पण मंत्री केलं हे नक्की’, शिवसेनेबाबतच्या प्रश्नावर राणेंचं मिश्किल उत्तर
राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. तसंच या नेत्यांमुळेच आपण आज केंद्रीय मंत्री झाल्याचंही राणे म्हणाले. त्यावेळी शिवसेनेबाबत विचारलेल्या एका प्रश्नाला राणे यांनी मिश्किल उत्तर दिलंय.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ देण्यात आलीय. शपथविधी सोहळ्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. तसंच या नेत्यांमुळेच आपण आज केंद्रीय मंत्री झाल्याचंही राणे म्हणाले. त्यावेळी शिवसेनेबाबत विचारलेल्या एका प्रश्नाला राणे यांनी मिश्किल उत्तर दिलंय. (Narayan Rane’s first reaction after taking oath as Union Minister)
मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आभारी आहे. त्यांच्यामुळेच मी आज केंद्रीय मंत्री बनलो आहे. पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनात माझ्यावर जी जबाबदारी देण्यात येईल ती योग्यरित्या सांभाळेल. इतक्या वर्षाचा प्रवास दोन वाक्यात सांगणं शक्य नाही. पण आज सांगताना आनंद होतोय की, पहिल्यांदा मुंबई महापालिकेत नगरसेवक झाले. त्यानंतर आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, खासदार आणि आता केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या माध्यमातून महाराष्ट्राला न्याय देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन, असं राणे म्हणाले.
‘..फक्त मंत्री केलं हे नक्की’
शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर अनेक चढउतार आले, त्याबाबत काय सांगाल असं विचारला आहे. 1999 ला मुख्यमंत्री झालो. त्यानंतर अनेक चढउतार आले. आता मोदींच्या नेतृत्वात हे पद मिळालं आहे. त्यांनी टाकलेला विश्वास सार्थकी लावेन, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केलाय. तसंच शिवसेनेला शह देण्यासाठी तुम्हाला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्याची चर्चा असल्याचं एका पत्रकाराने विचारलं. त्यावेळी कुणाला शह देण्यासाठी की अन्य कशासाठी मला मंत्री केलं हे माहिती नाही. फक्त मंत्री केलंय एवढं नक्की, असं मिश्किल उत्तर राणे यांनी यावेळी दिलं.
हे येरागबाळ्याचं काम नाही- निलेश राणे
दरम्यान, शिवसेनेच्या विरोधात राणे यांना प्रमुख अस्त्र म्हणून वापरलं जाईल, असा सवाल पत्रकारांनी विचारला असता केंद्रीय मंत्रिपद ही एक मोठी जबाबदारी आहे. तुम्ही त्याचा राजकीय अर्थ लावत असाल. पण साहेबांन देण्यात आलेली जबाबदारी मोठी आहे. नगरसेवक ते केंद्रीय मंत्री हा प्रवास मोठा आहे, सोपा नक्कीच नाही. हे येरागबाळ्याचं काम नाही. उरला प्रश्न शिवसेनेचा तर त्यांना आम्ही किंमत देत नाही. जे मिळालं त्यात आम्ही समाधानी असल्याचंही निलेश राणे म्हणाले.
भाजपनं राणेंचं महत्वं जाणलं – नितेश राणे
नितेश राणे यांनीही राणे यांना मिळालेल्या केंद्रीय मंत्रिपदाबाबत आनंद व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह राज्यातील आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. राणे कुटुंबासाठी हा मोठा आणि महत्वाचा दिवस आहे. महाराष्ट्राच्या काना कोपऱ्याचा राणे यांचा अभ्यास पक्षासाठी नक्कीच फायद्याचा ठरेल. भारतीय जनता पक्ष पुढील प्रत्येक निवडणुकीत एक नंबरचा पक्ष ठेवण्यासाठी राणे साहेब नक्कीच प्रयत्न करतील. ते महाराष्ट्रातील आजचे दोन तीन नंबरचे सर्वात अनुभवी नेते आहेत. काँग्रेसला 10 वर्षात कळालं नाही. पण भाजपने राणे साहेबांचं महत्वं 2 वर्षात जाणलं. भाजपने मला आमदार केलं. निलेश राणे यांना प्रदेश भाजपात स्थान दिलं, अशी प्रतिक्रिया आमदार नितेश राणे यांनी दिलीय.
संबंधित बातम्या :
Narayan Rane’s first reaction after taking oath as Union Minister