माझे कार्यकर्ते माझ्यासोबत, जयंत पाटील चांगला निर्णय घेतील शरद पवारांना विश्वास
महाराष्ट्रात कालपासून राजकीय भूकंपाला सुरुवात झाली आहे. काल राष्ट्रवादीचा एक गट भाजपमध्ये सामील झाल्यानंतर शरद पवारांनी साताऱ्यात आपली भूमिका स्पष्ट केली.
सातारा : महाराष्ट्रात (maharashtra) काल राजकीय भूकंप (maharashtra political crisis) झाल्यापासून अनेकांचं लक्ष शरद पवार (ncp sharad pawar)यांच्या प्रतिक्रियेकडं लागलं होतं. आज गुरुपोर्णिमा असल्यामुळे शरद पवारांनी सकाळी कराडमधील प्रीती संगमावर जाऊन यशवंतराव चव्हाणांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण, अनिल देशमुख, श्रीनिवास पाटील, रोहित पवार यांची उपस्थिती होती. कराडमध्ये शरद पवार येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी सुध्दा गर्दी केली होती. तिथं उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांच्यासमोर पवार साहेबांनी पहिल्यांदा आपली भूमिका मांडली. ज्यांनी राष्ट्रवादी पक्ष (ajit pawar) फोडला आहे, त्यांना सोडणार नाही. त्याचबरोबर लवकरचं पक्षाच्या बांधणीसाठी महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं.
भाजप देशात अनेक राज्यात अशा पद्धतीने फुटीचं राजकारण केलं आहे. तो प्रकार महाराष्ट्रात सुरु आहे. दोन जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं सुध्दा प्रमाण अधिक वाढलं आहे. लोकांचा विश्वास राहिलेला नाही. हे कुठेतरी बंद व्हायला हवं यासाठी आजपासून सगळ्यांनी प्रयत्न करुया असेही ते म्हणाले.
पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे असं म्हटलं जातं, त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्ष आतापर्यंत सातारा, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये चांगलाचं वाढला आहे. माझे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. सातारा कोल्हापूरात राष्ट्रवादीला बळ मिळणार असंही वक्तव्य शरद पवारांनी केलं आहे.
देशात अनेक राज्यात दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचा भाजप प्रयत्न करीत आहेत. लोकांना हे सगळं माहितं आहे, त्याचबरोबर वेळ आल्यानंतर लोकं तुम्हाला दाखवून देतील. मी सध्या महाराष्ट्रात दौरा करणार आहे. पुढच्या तीन महिन्यात राष्ट्रवादीसाठी पोषक वातावरण असेल. आजचा दिवस गुरु पोर्णिमेला असल्यामुळे आजपासून पुन्हा नव्या संघर्षाला सुरुवात केल्याचं पवारांनी साताऱ्यात सांगितलं.
पत्र पाठवण्याचा निर्णय जयंत पाटील यांनी जाणीवपूर्वक घेतला असेल, जयंत पाटील पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे ते चांगला निर्णय घेतील अशी मला अपेक्षा आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये होणाऱ्या बैठकीबाबत जयंत पाटील अधिक सांगतील, तो निर्णय त्यांनी घेतला आहे असं पवारांनी सांगितलं.